Topic icon

केसांची काळजी

0

लहान वयात केस पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • आनुवंशिकता (Genetics):

    जर तुमच्या कुटुंबात लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या असेल, तर तुम्हालाही होण्याची शक्यता असते. आनुवंशिकतेमुळे मेलॅनिन (melanin) नावाच्या रंगद्रव्याची निर्मिती कमी होते, ज्यामुळे केस पांढरे होतात.

  • व्हिटॅमिनची कमतरता (Vitamin Deficiency):

    शरीरात व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन डी3, बायोटिन (B7) आणि इतर आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असल्यास केस पांढरे होऊ शकतात. व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात.

  • तणाव (Stress):

    जास्त तणाव घेतल्याने केसांवर परिणाम होतो आणि ते लवकर पांढरे होऊ शकतात. तणावामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते.

  • रोग (Medical Conditions):

    काही वैद्यकीय परिस्थिती, जसे की थायरॉईड (thyroid) विकार, ऑटोइम्यून रोग (autoimmune diseases) आणि ऍनिमिया (anemia), यामुळे केस पांढरे होऊ शकतात. थायरॉईडमुळे केस पांढरे होतात.

  • रसायनांचा वापर (Chemical Exposure):

    केसांसाठी वापरले जाणारे काही रासायनिक उत्पादने, जसे की रंग (dyes), शॅम्पू (shampoos) आणि इतर उत्पादने, केसांतील मेलॅनिन कमी करू शकतात.

  • धूम्रपान (Smoking):

    धूम्रपान केल्याने रक्तवाहिन्या (blood vessels) संकुचित होतात, ज्यामुळे केसांच्या कूपांना (hair follicles) पुरेसा रक्तपुरवठा होत नाही आणि केस पांढरे होतात.

याव्यतिरिक्त, काही विशिष्ट जीवनशैलीतील सवयी आणि पर्यावरणीय घटकांमुळे देखील लहान वयात केस पांढरे होऊ शकतात.

उत्तर लिहिले · 1/4/2025
कर्म · 980
0

केस काळे राहण्यासाठी काही उपाय:

  • आहार:
    • आहारात लोह, जस्त, तांबे आणि प्रथिने यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश करा.
    • आवळा, दही आणि कडुलिंब नियमित खा.
  • तेलाने मालिश:
    • नारळ तेल, बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा तिळाच्या तेलाने नियमितपणे केसांची मालिश करा.
    • तेलामध्ये आवळा किंवा कढीपत्ता उकळून ते तेल लावा.
  • नैसर्गिक रंग:
    • केसांना रंग देण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करा जसे की मेंदी, कॉफी, चहा आणि बीट.
  • केसांची काळजी:
    • केस नियमितपणे धुवा आणि स्वच्छ ठेवा.
    • केसांना जास्त गरम पाण्याने धुवू नका.
    • केसांना धूळ आणि प्रदूषणपासून वाचवा.
  • घरगुती उपाय:
    • आवळा आणि लिंबाचा रस केसांना लावा.
    • कांद्याचा रस केसांना लावा.
    • कढीपत्त्याची पेस्ट केसांना लावा.

हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही आपले केस नैसर्गिकरित्या काळे ठेवू शकता.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980
2
मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र काही जण स्टाईलच्या नादात, वेळेच्या अभावी किंवा निष्काळजीपणामुळे हेल्मेट घालणे टाळतात. हेल्मेटच्या वापरामुळे केसगळती होते असादेखील काहींचा समज आहे. परंतू हा केवळ गैरसमज आहे. केसगळती वाढण्यामागे तसेच टक्कल पडण्याचा धोका ओळखण्यासाठी या लक्षणांकडे सजगतेने पहा. दीर्घकाळ हेल्मेट, हेड गियर, टोपी किंवा हॅट वापरण्याचा आणि केसगळती वाढण्याचा काहीच थेट संबंध नाही. असे डॉक्टरांचे स्पष्ट मत आहे.
हेल्मेट किंवा हेड गियर वापरल्यामुळे टाळूजवळ घुसमट होते. त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी केसगळतीची समस्या वाढते असा काहींचा समज आहे. मात्र वास्तवात हेअर फॉलिसेल्स हवेतून मिळणार्या ऑक्सिजनवर अवलंबून नसतातⓂहेअर फॉलिसेल्सना ऑक्सिजनचा पुरवठा रक्ताद्वारे होतो. जसे केस खूप घट्ट बांधल्यास किंवा विशिष्ट प्रकारच्या हेअर स्टाईलमुळे केसांचे नुकसान होते. तसेच पुरूषांमध्ये खूप घट्ट स्वरूपात घातलेल्या हेल्मेटमुळे रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो. परिणामी केसगळतीची समस्या वाढते. वापरत असलेली हॅट, टोपी किंवा हेल्मेट अस्वच्छ राहिल्यास टाळूला संसर्ग होऊ शकतो. त्याचा परिणाम केसगळती हा असतो. त्यामुळे केवळ स्टाईलचा भाग म्हणून न पाहता वापरत असलेली हेल्मेट्स, टोपी, स्कार्फ हे स्वच्छ ठेवा. अन्यथा केसगळतीचा त्रास वाढून टक्कलपणाचा त्रास उद्भवू शकते♏
1
लांब काळेभोर दाट केस कुणाला नाही आवडत, पण आज काल सर्वच जण केसांची नीगा राखण्यासाठी साठी कुठलाही प्रयोग करतात.केसांना वेगवेगळे कलर किंवा डाय लाऊन केसांचे आरोग्य खराब करताहेत आज काल 10 -12 वय असणारे लहान मुल मुली केसांना विविध प्रकार चे जेल लाऊन hair स्टाइल करताना दिसतात. आणि आहार सुद्धा नीट घेत नाहीत . 


        सतत mobile मध्ये राहून राहून पण आरोग्य कडे दुर्लक्ष होत आहे.


     केसांचे आरोग्य नीट राहावे या साठी केसांची तेल मालिश किंवा कोरडी मालिश पण उपयुक्त ठरते, त्यासाठी आठवड्यातून निदान दोन वेळा तरी केसांना मालीश करावी. मोबाईल बाजूला ठेऊन स्वतःसाठी तरी 5 - 10 मिनिट काढावीत 


      तेल मालिश करताना तेल नेहमी कोमट करूनच उपयोगात आणावे 


     लहान मुला - मुलीची डोक्याची मालिश रोज रात्री झोपताना करावी. हळुवार केसातून हात फिरवावा जेणे करुन त्यांना शांत झोप लागेल यामुळे त्यांची चीड चीड कमी होउन अभ्यासात मन लागेल, बरेच मुल अभ्यासाचं टेन्शन घेतात त्यासाठी हा प्रयोग करावा. 


      केसात कोंडा असेल तर मालिश करताना

https://asyn24.blogspot.com/2021/02/blog-post_6.html
उत्तर लिहिले · 19/4/2021
कर्म · 795
3
नियम
1) ¹ च शाम्पू
²) ¹ साबण
³) आयुवेर्दिक product
4) पोषक आहार
5) योग्य ते केस ऑईल
6)कोंडा पासून मुक्ती
7)स्वच्छ केस मोकळे
8) कोणताही ट्रीमेंट नको
9) नजर अंदाज करणे नको
¹0) खेचा खीची नको

अँड मजबूत आणि काळे केस करण्यासाठी मेंदी किव्वा colourmet वापर करणे गरजेचे आहे 
जर मोट्याप्रमात व्हाइट असेल तर नाही तर काहीही गरज नाही .
Naturaly टिकत आलेला आहे 

किती वेळा पण chemicaly ट्रीटमेंट करा नुकसान होत 
त्यामुळे नातुरली प्रयोग करा....

धन्यवाद..🙏🙏🙏🙏🙏
उत्तर लिहिले · 15/1/2021
कर्म · 70
1
दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर अनेकजणी केसांचा आंबाडा बांधून घरातल्या कामाला लागतात.
पण असेच केस बांधून तुम्ही रात्री झोपता का ? केस बांधून झोपल्याने केसगळतीची समस्या वाढते असे काहीजण मानतात तर केस मोकळे ठेवल्यानेही गुंता वाढतो. मग अशावेळी नेमके काय करावे ? हा प्रश्न तुम्हांला पडलाय ? मग सेलिब्रिटी मेकअप आर्टीस्ट पायल बालसे यांनी दिलेला हा खास सल्ला नक्कीच तुम्हांला मदत करू शकेल.
रात्री झोपताना केस मोकळे ठेवावेत की त्याची वेणी बांधावी हे व्यक्तीपरत्वे बदलते. झोपताना केस मोकळे ठेवणे त्रासदायक नाही मात्र यामूळे केस गुंतण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सैलसर वेणी किंवा आंबाडा बांधावा. पण तुमच्या केसानुसार ते कसे सांभाळावेत हे सविस्तरपणे वाचण्यासाठी या खास टीप्स -:
स्ट्रेट केस असल्यास -
तुमचे केस मोकळे आणि सरळ असतील तर रात्रीच्या वेळेस तुम्ही सैलसर पोनीटेल बांधून ठेऊ शकता. म्हणजे ते सकाळी फ्रिझी होत नाहीत. सैलसर वेणी बांधून ठेवल्यास केसांमध्ये गुंता होणार नाही. तसेच त्यांना नॅचरल टॅंग्स मिळतील.
तुमचे केस लांब असतील ते बांधून ठेवणे सोयीस्कर ठरते. पण खूप वेळ आणि घट्ट बांधून ठेऊ नका. यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक आहे.माहिती  सेवा गृप पेठवड़गाव
केस कुरळे असल्यास -
तुमचे केस कुरळे असतील तर डोक्यावर त्याचा आंबाडा बांधा किंवा एका बाजूला बांधून ठेवा. यामुळे तुमची झोपमोड होणार नाही याची काळजी घ्या. पण तो खूप घट्ट बांधू नका.
केस ओले असताना ते मूळीच बांधून ठेऊ नका. परंतू केसांमधील गुंतागुंत कमी करण्यासाठी तुम्हांला ते बांधून ठेवणे गरजेचे वाटत असेल तर ते 80 % सुकल्यानंतरच बांधा. यामुळे ते तुटण्यापासून बचावतील. हाच नियम ब्लो ड्रायसाठीदेखील लागू होतो. शक्य असेल तर नैसर्गिकरित्याच सुकवण्याचा प्रयत्न करा.♍
http://anilpatilmahitiseva.blogspot.com/2020/07/blog-post_523.html

5
सरसोंच्या
  • तेलाचा वापर केल्याने केस वाढतात..!!
कांद्याचा रस लावल्याने केसांची झपाट्याने वाढ होते....!!

तुळशीचा रस, गुलाबाचे पाणी व आवळा पावडर मिसळून तयार केलेले मिश्रण केसात लावा.. टकल्याच्या डोक्यावर सुद्धा केस येतील....!!
उत्तर लिहिले · 25/6/2020
कर्म · 410