मुले डोळे बालरोगशास्त्र आरोग्य

लहान बाळाला डोळ्यात काजळ घालणे बरोबर आहे का? असेल तर कोणते वापरावे?

3 उत्तरे
3 answers

लहान बाळाला डोळ्यात काजळ घालणे बरोबर आहे का? असेल तर कोणते वापरावे?

6
नाही, बाळाच्या डोळ्यात काहीही घालू नये. त्याने इन्फेक्शन, डोळे जाणे अशा गोष्टीही होऊ शकतात. कोणताही डॉक्टर असा सल्ला देणार नाही काही घालण्याचा.
उत्तर लिहिले · 10/4/2017
कर्म · 15400
1

बाळाच्या डोळ्यांसाठी काजळ  घालणे बरोबर आहे का 



नवजात बाळाच्या डोळ्यात काजळ घालण्यामागची भारतीय कुटुंबांची सामान्य श्रद्धा
बाळाच्या डोळ्यांसाठी काजळाला पर्याय काय आहे?
बाजारात मिळणारे काजळ वापरणे सुरक्षित आहे का?
बाळांसाठी घरी काजळ तयार करणे
काजळ बाळाच्या डोळ्यांना लावण्याशी संबंधित सामान्य समज आणि सत्यता
बाळाच्या डोळ्यात काजळ घालणे हा पारंपारिक भारतीय विधी आहे, त्यामुळे बाळ वाईट नजरेपासून दूर राहते आणि सूर्यप्रकाशाच्या तीव्र किरणांपासून बाळाला संरक्षण मिळते. काहीजणांचा असा विश्वास आहे की काजळ घातल्याने बाळाच्या डोळ्याचा आकार वाढतो, त्याचे डोळे रोगांपासून दूर राहतात आणि दृष्टी सुधारते. कधीकधी फक्त घरातील मोठे लोक सांगतात म्हणून बाळाला काजळ लावले जाते. परंतु बऱ्याच मातांच्या मनात हा प्रश्न असतो की काजळ बाळाच्या डोळ्यांसाठी सुरक्षित आहे कि नाही?
काजळ बाळाच्या डोळ्यांसाठी चांगली असते का?
जरी अनेक भारतीय कुटुंबाद्वारे नवजात बाळाला काजळ लावणे चांगले असे मानले जात असले तरी सत्य हे आहे की ही अत्यंत हानिकारक प्रथा आहे.
काजळ बाळाच्या डोळ्यांसाठी चांगली असते का?
बाळाला काजळ लावणे का टाळावे ह्याची कारणे
बाळासाठी बाजारात मिळणाऱ्या बऱ्याच काजळात शिशाची पातळी जास्त असते. शिसे बाळासाठी अत्यंत हानिकारक आहे कारण दीर्घकाळापर्यंत ते वापरल्यास बाळाच्या शरीरात शिसे जास्त प्रमाणात वाढते. हे अवयव, मेंदू आणि अस्थिमज्जावर परिणाम करू शकते, ज्यामुळे कमी आयक्यू, अशक्तपणा इत्यादी समस्या येऊ शकतात.
बाळाच्या डोळ्यांना काजळ लावताना, जर तुमचे हात स्वच्छ नसतील तर त्यामुळे बाळाला संसर्ग होऊ शकतो. तसेच, काजळ लावताना चुकून तुमच्या बोटामुळे किंवा नखामुळे तुमच्या बाळाच्या डोळ्याला इजा होऊ शकते.
आंघोळ करताना काजळ पाण्यामुळे खाली ओघळू शकते, त्यामुळे बाळाचे डोळे आणि नाकादरम्यानची पोकळी ब्लॉक होऊ शकते आणि त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो.
काजळामुळे बाळाच्या डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यांना खाज सुटणे आणि इतर एलर्जी होऊ शकतात. सर्वात वाईट प्रकरणांमध्ये, ह्यामुळे आपल्या बाळाची दृष्टी देखील खराब करू शकते.
नवजात बाळाच्या डोळ्यात काजळ घालण्यामागची भारतीय कुटुंबांची सामान्य श्रद्धा
बाळाच्या डोळ्यात काजळ घातल्याने त्याचे किंवा तिचे डोळे चमकदार, प्रकाशमय आणि आकर्षक बनतील
नवजात बाळाच्या डोळ्यात काजळ घातल्याने बाळाला दृष्ट लागणार नाही
काजळ घातल्याने तीव्र सूर्यकिरणांपासून बचाव होतो आणि संसर्ग होत नाही
बाळाच्या डोळ्यांसाठी काजळाला पर्याय काय आहे?
बाळाला नजर लागू नये म्हणून तुम्हाला अगदीच काळजी वाटत असेल तर सर्वात चांगला आणि सुरक्षित उपाय म्हणजे बाळाच्या कपाळावर कडेला किंवा बाळाच्या पायाच्या टाचेवर तुम्ही काजळाची ठिपका लावू शकता
जरी बाळाच्या डोळ्यावर काजळ लावण्याची शिफारस केली जात नाही आणि तरीही तुम्हाला बाळाला काजळ लावायचेच असेल तर काजळ घरी करणे चांगले. तसे केल्याने काजळातील घटकांवर तुमचे नियंत्रण असेल आणि बाजारात मिळणाऱ्या काजळात असणाऱ्या उच्च प्रमाणातील शिश्यापासून तुमच्या बाळाचे संरक्षण होऊ शकेल. व्हिटॅमिन ई समृद्ध असलेल्या बदाम तेलाचा वापर करून हे करता येते, जे काहीसे सुरक्षित असेल. स्वतः काजळ करण्याची कृती खाली दिलेली आहे.
बाजारात मिळणारे काजळ वापरणे सुरक्षित आहे का?
ह्याचे उत्तर आहे 'नाही' - स्टोअर मधून विकत आणलेले काजळ वापरणे सुरक्षित नाही. आधी स्पष्ट केल्याप्रमाणे, बहुतेक व्यावसायिक काजळ उत्पादनांमध्ये शिसे जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे मुलांमध्ये अशक्तपणा, बुद्ध्यांक कमी होणे इत्यादी समस्या होतात. स्टोअरमधून विकत घेतलेल्या काजळातील घटकांमुळे बाळाच्या डोळ्यांना खाज सुटणे आणि डोळ्यातून पाणी येणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
बाळांसाठी घरी काजळ तयार करणे
बाळाला काजळाच्या दुष्परिणामांपासून वाचवायचे असेल आणि पारंपारिक श्रद्धा सुद्धा पाळायच्या असतील तर बाळांसाठी घरी तयार केलेले काजळ वापरणे हा एक योग्य मार्ग आहे. घरी काजळ बनविणे खूप सोपे आहे आणि त्यासाठी कोणत्याही फॅन्सी घटकांची आवश्यकता नाही. आपण घरी काजळ कसे बनवू शकता ते येथे दिलेले आहे.
आपल्याला काय पाहिजे
दोन सारख्या आकाराच्या सपाट वाट्या (आपण स्टील किंवा उष्णता प्रतिरोधक काहीही वापरू शकता)
एक जाड प्लेट (शक्यतो पितळाने बनलेली)
टीप: प्लेट आणि वाट्या वापरण्यापूर्वी त्यांचे निर्जंतुकीकरण केले आहे याची खात्री करा.
तूप (काही थेंब)
काडेपेटी
दिवा (एक तेलाचा दिवा) आणि एक वात
एरंडेल तेल (दिव्यात घालण्यासाठी)
चाकू
काजळ ठेवण्यासाठी एक छोटी डबी
कृती
दोन्ही वाट्यांमध्ये अंतर कमी ठेवून जमिनीवर सपाट पृष्ठभागावर पालथ्या ठेवा.
आता त्या दोन्ही वाट्यांवर प्लेट पालथी ठेवा जेणेकरून पूल तयार होईल. म्हणूनच सपाट वाट्यांचा वापर करणे आवश्यक आहे जेणेकरून प्लेट त्यांच्यावर संतुलन राखू शकेल. गोलाकार तळ असलेल्या वाट्यांवर प्लेटचे संतुलन राखणे कठीण होईल.
दिव्यात वाट ठेवून त्यामध्ये एरंडेल तेल घाला. दिवा पेटवून प्लेट मुळे तयार झालेल्या पुलाखाली ठेवा.
दिव्याची ज्योत प्लेटला स्पर्श करणारी असावी. जर तसे झाले नाही तर उंची कमी करण्यासाठी लहान आकाराची वाटी वापरा.
सुमारे २० मिनिटे थांबा.
तुम्हाला चटका बसणार नाही ह्याची काळजी घेऊन प्लेट हळूच उचला
प्लेटच्या आतील पृष्ठभागावर गोळा झालेली काळी काजळी तुम्हाला दिसेल.
लहान डबीमध्ये ती काजळी चाकूने काळजीपूर्वक स्क्रॅप करा.
पेस्ट बनवण्यासाठी काही तूप थेंब घाला.
हे काजळ थंड, कोरड्या जागी ठेवा.
काजळ बाळाच्या डोळ्यांना लावण्याशी संबंधित सामान्य समज आणि सत्यता
जरी काजळ वापराचे बरेचसे दुष्परिणाम असले तरीही लोक बाळाला काजळ लावतात. या प्रथेशी संबंधित काही मिथके आणि तथ्ये खाली दिलेली आहेत.
काजळामुळे बाळाचे डोळे आणि पापण्या मोठ्या होतात.
नाही, असे होत नाही. बाळाच्या चेहर्‍याची वैशिष्ट्ये फक्त आणि फक्त गुणसूत्रांद्वारे निर्धारित केली जातात. म्हणून काजळ लावल्याने बाळाच्या डोळ्याच्या सभोवतालचे स्नायू ताणले जाऊन डोळे मोठे होणार नाहीत.
काजळामुळे बाळ झोपी जाण्यास मदत होते
या कल्पित गोष्टीस समर्थन देणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. दिवसाकाठी बाळे १८-१८ तास झोपतात, त्यापेक्षा जास्त वेळ बाळाला झोपवण्यात काही अर्थ आहे का?
घरी केलेले काजळ सुरक्षित आहे
नाही. घरगुती काजळ कदाचित बाजारात मिळणाऱ्या काजळापेक्षा अधिक सुरक्षित असेल परंतु तरीही त्यात कार्बन आहे जो बाळाच्या डोळ्यांसाठी असुरक्षित आहे. तसेच, काजळ लावताना तुमच्या बोटामुळे बाळाच्या डोळ्याला संसर्ग होऊ शकतो.
काजळ लावल्यास बाळाला दृष्ट लागत नाही
हा निव्वळ पारंपारिक विश्वास आहे आणि त्याचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
काजळ डोळ्यांचा आकार सुधारण्यास मदत करते
नाही. जर हे खरे असते तर डॉक्टरांनी बाळाला काजळ लावण्यास सांगितले असते. काजळ बाळाच्या डोळ्याच्या स्वरूपात कुठलाही परिणाम करत नाही तुम्ही कुठलाही निर्णय घेतलात तरीसुद्धा बाळाची काळजी घेताना स्वच्छता पाळणे महत्वाचे आहे हे लक्षात ठेवा. तुमच्या बाळाचे डोळे नैसर्गिकरित्या सुंदर आहेत आणि काजळ लावल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते. जेव्हा आपल्या छोट्या बाळाच्या डोळ्याला धोका असेल तेव्हा जोखीम घेण्यापेक्षा त्याचा वापर टाळणे चांगले. 
उत्तर लिहिले · 28/5/2022
कर्म · 53750
0

लहान बाळाला डोळ्यात काजळ घालणे योग्य आहे की नाही, याबद्दल अनेक मतभेद आहेत.

पारंपारिक दृष्टिकोन:

  • अनेक वर्षांपासून लहान मुलांना काजळ लावण्याची प्रथा आहे.
  • असे मानले जाते की काजळ लावल्याने डोळे मोठे आणि सुंदर दिसतात.
  • काही लोकांचा असा विश्वास आहे की काजळ डोळ्यांना थंड ठेवते आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्यांचे संरक्षण करते.
  • असेही मानले जाते की काजळामुळे 'नजर' लागत नाही.

आधुनिक दृष्टिकोन:

  • डॉक्टरांच्या मते, लहान मुलांना काजळ लावणे सुरक्षित नाही.
  • बाजारात मिळणाऱ्या काजळमध्ये शिसे (lead) आणि इतर हानिकारक रासायनिक घटक असू शकतात, जे बाळाच्या डोळ्यांसाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक असतात.
  • काजळ लावल्याने डोळ्यांमध्ये ऍलर्जी (allergy) किंवा संक्रमण (infection) होण्याची शक्यता असते.

जर तुम्हाला काजळ लावायचेच असेल, तर खालील गोष्टी लक्षात ठेवा:

  • घरगुती, नैसर्गिक काजळ वापरा.
  • काजळ लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • बाळाला ऍलर्जी होत नाही ना, याची खात्री करा.

घरी काजळ बनवण्याची पद्धत:

  1. एका मातीच्या दिव्यामध्ये तेल (एरंडेल तेल उत्तम) घालून तो दिवा लावा.
  2. दिव्याच्या ज्योतीवर ताट किंवा वाटी धरा.
  3. ज्योतीमुळे ताट किंवा वाटीवर काजळी जमा होईल.
  4. ती काजळी खरवडून घ्या आणि त्यात काही थेंब तूप टाका.
  5. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून हवाबंद डब्यात ठेवा.

टीप: घरी बनवलेले काजळ देखील पूर्णपणे सुरक्षित आहे असे नाही, त्यामुळे ते वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे आहे. कृपया कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 3060

Related Questions

योनीमध्ये पोटली ठेवायची माहिती द्यावी?
दातांसाठी सर्वात चांगली टूथपेस्ट कोणती?
वयात येताना योनीची काळजी कशी घ्यावी?
आम्ही दोघेच बहिण भाऊ राहतो व माझ्या लहान बहिणीला पहिली मासिक पाळी आली, तर काय करू आणि पॅडसुद्धा नाही आहे?
मुस्लिम मुली पिरियड मध्ये काय वापरतात?
मला भरपूर दूध येते आणि माझे बाळ व पती यांनी पिऊन सुद्धा खूपच शिल्लक राहते, त्यामुळे छाती व स्तन दुखतात, तर काय करावे?
माझे पती मुखमैथुन करत असताना माझ्या योनीतून खुपच चिकट पाणी येते तर काय करावे?