5 उत्तरे
5
answers
जागतिकीकरण म्हणजे काय ?
27
Answer link
1) "जागतिकीकरण" याचा अर्थ सर्व राष्ट्रांची एक बाजारपेठ निर्माण करणे होय.
2) "जागतिक आर्थिक व्यवहारांचा झालेला विस्तार म्हणजेच जागतिकीकरण होय", असे "दीपक नायर" म्हणतात.
3) जगात एककेंद्रीय आर्थिक व्यवस्था निर्माण करणे, अधिक गुंतवणूक करून औद्योगिकीकरण वाढवणे व आयात-निर्यात सुलभतेने करता येण्याची स्थिति निर्माण करणे, या बाबींचा समावेश जागतिकीकरणात होतो.....
2) "जागतिक आर्थिक व्यवहारांचा झालेला विस्तार म्हणजेच जागतिकीकरण होय", असे "दीपक नायर" म्हणतात.
3) जगात एककेंद्रीय आर्थिक व्यवस्था निर्माण करणे, अधिक गुंतवणूक करून औद्योगिकीकरण वाढवणे व आयात-निर्यात सुलभतेने करता येण्याची स्थिति निर्माण करणे, या बाबींचा समावेश जागतिकीकरणात होतो.....
8
Answer link
🌐जागतिकीकरण🌐जागतिकीकरणम्हणजे स्थानिक वस्तूंची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावर स्थानांतरणाची प्रक्रिया. ह्या संज्ञेचा उपयोग सहसा आर्थिक जागतिकीकरणाच्या संदर्भात केला जातो, ज्यात व्यापार, विदेशी थेट गुंतवणूक, भांडवल प्रवाह, प्रवास आणि तंत्रज्ञान यांच्या प्रसाराच्या माध्यमाने राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला अंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थांसाठी उघडे केले जाते.भारतात १९९० च्या सुमारास जागतिकीकरणाला सुरुवात झाली. ह्या काळात देशावरचे विदेशी कर्ज एवढे वाढले होते कीजागतिक बँक (World Bank),आंतरराष्ट्रीय नाणे निधी (International Monetary Fund)ह्या खाजगी संघटनांनी भारताला आणखी कर्ज देणे नाकारले व कर्जमिळवण्यासाठी भारतावर काही अटी लादल्या. ह्या अटींमध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काही धोरणात्मक बदल करून तिला विदेशी कंपन्यांसाठी खुले करणे समाविष्ट होते. अर्थव्यवस्थेमधील ह्या बदलांना"आर्थिक सुधारणा" म्हटले गेले व त्यात जागतिकीकरणासोबतच उदारीकरण व खाजगीकरण ह्यांचा पण समावेश होतो. ह्यांनाच एकत्रितपणे खा.ऊ.जा. धोरण असे संबोधले जाते.🌐
0
Answer link
जागतिकीकरण (Globalization) म्हणजे काय?
जागतिकीकरण म्हणजे जगभरातील लोकांचे, कंपन्यांचे आणि सरकारांचे परस्परांशी वाढते एकत्रीकरण. ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संस्कृती आणि माहितीची देवाणघेवाण वाढते.
जागतिकीकरणामुळे काय होते:
- आर्थिकIntegration (एकात्मता): जगातील अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडल्या जातात.
- सांस्कृतिक देवाणघेवाण: वेगवेगळ्या संस्कृती एकमेकांच्या संपर्कात येतात.
- तंत्रज्ञानाचा प्रसार: नवीन तंत्रज्ञान जगभर पसरते.
- राजकीय संबंध: देशांमधील राजकीय संबंध सुधारतात.
जागतिकीकरणाचे फायदे:
- विकासाला चालना.
- उत्पादनांची उपलब्धता वाढते.
- रोजगाराच्या संधी वाढतात.
जागतिकीकरणाचे तोटे:
- स्थानिक उद्योगांना स्पर्धा करणे कठीण होते.
- पर्यावरणाची हानी होऊ शकते.
- गरिबी वाढू शकते.
अधिक माहितीसाठी आपण खालील Wikipedia लिंकला भेट देऊ शकता: जागतिकीकरण - विकिपीडिया