रसायनशास्त्र घरगुती उपाय डोळे विज्ञान

कांदा चिरताना/कापताना डोळ्यात पाणी का येते, ते येऊ नये म्हणून काही उपाय आहे का?

7 उत्तरे
7 answers

कांदा चिरताना/कापताना डोळ्यात पाणी का येते, ते येऊ नये म्हणून काही उपाय आहे का?

29
*या टीप्सने कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येणार नाही*
----------------------------    

अनेक जण मोठ्या हौशीने जेवण बनवण्यासाठी सज्ज होतात. मात्र जेवणची तयारी करताना कांदा कापण्याची वेळ आली की अनेकांना नकोसे वाटते. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणं, डोळे चुरचुरणे अत्यंत त्रासदायक असते. त्यामुळे यापासून अनेकजण लांब पळतात. पण काही पदार्थांची लज्जतच कांद्यामुळे वाढते परिणामी कांदा कापणं अटळ असते. मग कांदा कापताना त्रास होऊ नये म्हणून या काही टीप्स नक्कीच तुम्हांला फायदेशीर ठरतील. 
कांदा कापताना कांद्याचे साल डोक्यावर ठेवावे..
किंवा कांदा कापून लगेच पाण्यात टाकावा.. हे तर तुम्हाला माहीत असेलच.

*कांदा कापताना डोळ्यांना त्रास का होतो?*
जेवणात लाल कांदा प्रामुख्याने वापरला जातो. कापल्यानंतर त्यामधील काही घटक वातावरणात पसरतात. शरीरात गेल्यास किंवा डोळ्यांजवळ या वेपर्स पसरल्यास त्रास होऊ शकतो. परिणामी डोळ्यात जळजळ होणं, डोळ्यातून पाणी वाहणं हा त्रास होऊ शकतो.

*कांदा कापताना त्रास होऊ नये म्हणून ...*
*पाण्यात भिजवा*
कांदा कापताना डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून त्याचे तुकडे करा. ताबडतोब हे तुकडे पाण्यात भिजवा. 5-7 मिनिटांनी हे तुकडे बारीक बारीक चिरावेत.
कांदा पाण्यात भिजवल्याने त्यामुळे त्रासदायक घटक पाण्यातच विरघळतात. यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही. 

*च्युईंगम चघळा -*
कांदा कापताना च्युईंग गम चघळल्याने डोळ्यातून पाणी येत नाही. कारण च्युईंग चघळताना आपण तोंडाद्वारेही श्वास घेतो. परिणामी

*गरम पाणी -*
कांदा कापल्यानंतर त्याचे तुकडे गरम पाण्याजवळ ठेवा. यामुळे कांद्यातून येणारे उग्र घटक रोखण्यास मदत होते.
उत्तर लिहिले · 24/8/2018
कर्म · 569245
15
"कांदा कापताना डोळ्यातून पाणी का येते?" 😊👇

कांद्यात उडून जाणारे द्रव (Volatitle Oil) असते. कांद्याला चिकटपणा त्याच्यामुळेच येतो. या द्रवात अलिलप्रोफील सल्फाईड (Allylpropyl Sulphide)
​ हे रसायन असते. कांदा कापताना हे रसायन आपल्या डोळ्यात जाते. आणि डोळ्यातील अश्रुग्रंथी उद्दीपित होऊन त्या स्रवू लागतात. व डोळ्यात पाणी जमा होते.

कांदा नळाच्या पाण्याखाली धरून कापला अथवा एक मिनिट गरम पाण्यात ठेवून कापला असता डोळ्यात पाणी येत नाही...

उत्तर लिहिले · 9/11/2019
कर्म · 77165
0
कांदा चिरताना डोळ्यात पाणी येण्याचे कारण:
कांद्यामध्ये 'प्रोपेनेथियल एस-ऑक्साइड' नावाचे रसायन असते. जेव्हा आपण कांदा चिरतो/कापतो, तेव्हा हे रसायन हवेत मिसळते. ह्या रसायनामुळे डोळ्यांतील अश्रू ग्रंथी उत्तेजित होतात आणि डोळ्यातून पाणी यायला लागते.
डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून उपाय:
  • कांदा थंड करा: कांदा चिरण्यापूर्वी 30 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. थंड तापमानामुळे त्यातील रसायन कमी प्रमाणात बाहेर पडते.
  • तीक्ष्ण चाकू वापरा: तीक्ष्ण (sharp) चाकूने कांदा कापल्यास पेशी कमी प्रमाणात फुटतात आणि रसायन कमी बाहेर पडते.
  • पाण्यात कांदा चिरा: कांदा चिरताना तो पाण्यात बुडवून घ्या. पाण्यामुळे रसायन हवेत मिसळण्याऐवजी पाण्यात विरघळते.
  • एअर व्हेंटजवळ कांदा चिरा: पंखा किंवा एअर कंडीशनर चालू करून त्याच्या जवळ कांदा चिरा, जेणेकरून रसायन लगेच हवेत विरघळून जाईल आणि डोळ्यांपर्यंत पोहोचणार नाही.
  • व्हिनेगरचा वापर: कांदा कापताना एका वाटीत व्हिनेगर (vinegar) घेऊन ते जवळ ठेवा. व्हिनेगरमुळे हवेतील रसायन शोषले जाते.
  • लिंबाचा रस: कांद्याला लिंबाचा रस लावल्यास डोळ्यातून पाणी येणे कमी होते.
  • च्युइंग गम चघळा: कांदा चिरताना च्युइंग गम चघळल्याने डोळ्यातून पाणी येणे कमी होते, कारण त्यामुळे तोंडाने श्वास घेणे वाढते आणि डोळ्यांवर कमी परिणाम होतो.
उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 1780

Related Questions

डोळे ही कथा कोणी लिहिली आहे?
माणसाचे डोळे किती मेगापिक्सलचे असतात?
रात्री मोबाईल वापरावे का व वापरल्यास दुष्परिणाम काय?
डोळे येणे म्हणजे काय?
गोधूम वन्य तिच्या हरी हरिणाच्या साबरी डोळे?
डोळ्याची समायोजन शक्ती म्हणजे काय?
डोळ्यांमध्ये असणारे कोण?