3 उत्तरे
3 answers

GDP म्हणजे काय?

6
जीडीपी म्हणजे देशाच्या भूमीवर एका आर्थिक वर्षात तयार झालेल्या वस्तू व सेवा यांचे पैशातील बाजारी मूल्य होय. केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्पातील महत्त्वाची आकडेवारी जीडीपीच्या टक्केवारीत मांडतात, ज्यायोगे त्या आकड्यांच्या तीव्रतेचा अंदाज घ्यावा..

देशात रोज अगणित व्यवहार होत असतात. लोक खरेदी करत असतात, विक्री करत असतात. बॅंकेत पैसे ठेवत असतात, काढत असतात. कर गोळा केला जात असतो. त्यातून जमा झालेले पैसे कल्याणकारी योजनांमध्ये खर्च होत असतात. या सर्व व्यवहारांचा ढोबळ हिशेब ठेवला नाही, तर देशाची आर्थिक प्रगती होत आहे की अधोगती याचा थांगपत्ताही लागणार नाही. यासाठी देशाने एका वर्षांत किती माल व किती सेवा यांचे उत्पादन केले, याची आकडेवारी आवश्‍यक असते. हे वाटते तेवढे सोपे काम नाही. विविध संस्था या कामांत कार्यरत असतात. वर्षांत देशाने जो माल तयार केला व सेवा दिल्या, त्यांना प्राथमिक (शेती आदी), दुय्यम क्षेत्र (उद्योग, व्यवसाय आदी) व सेवा क्षेत्र यांत विभागून गुणले जाते. अशी गणना करताना एकच उत्पादित माल दोनदा गणला जात नाही, हे तपासावे लागते. अशा वार्षिक उत्पादनाला बाजारी किमतीने गुणले, की जे उत्तर येईल ते म्हणजे जीडीपी.
उत्तर लिहिले · 19/3/2017
कर्म · 2605
2
 




GDP म्हणजे काय?

कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं सकल राष्ट्रीय उत्पादनासाठी जीडीपी खूप महत्त्वाची ठरते. एका विशिष्ट कालावधीमध्ये देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच जीडीपी होय.



जीडीपीची आकडेवारी ही देशभरामध्ये दर तीन महिन्याला प्रदर्शित होते. देशांतर्गत झालेल्या उत्पादनांचा आणि सेवेचा जीडीपी चा दर ठरविण्यासाठी विचार केला जातो.

एखाद्या देशाचा जीडीपी हा सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच Gross Demotic Product हा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती प्रदर्शित करीत असतो. प्रत्येक देशामध्ये देशाचा जीडीपी चा अंक पाहून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये घसरण झाली किंवा वाढ झाली हे ठरवले जाते. कोण कोणत्या क्षेत्रातून sectors देशाला आर्थिक लाभ झाला आहे जीडीपी द्वारे ठरवली जाते.



GDP चा दर कसा ठरविला जातो:
जीडीपी चा दर हा मुख्यता दोन पद्धतीने निश्चित केला जातो. कारण चलन वाढीसह उत्पादनात घट होते. हे प्रमाण कॉन्स्टंट प्राइस म्हणजे कायमस्वरूपी दर आहे आणि यानुसारच जीडीपी चा दर आणि उत्पादनाचा मूल्य एका वर्षाच्या उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चावरून ठरविले जातं.

वार्षिक जीडीपी (Annual GDP):
वार्षिक जीडीपी मध्ये चालू वर्षातील सकल देशांतर्गत उत्पादनाची मागील वर्षातील सकल उत्पादनाशी तुलना केली जाते.

हे देखील वाचा: BDO full form in Marathi | बिडिओ म्हणजे काय?
उदाहरणार्थ: 2020 च्या वार्षिक सकल देशांतर्गत उत्पादनाचे तुलना 2021 च्या सकल देशांतर्गत उत्पादनाशी केली जाते.

तिमाही जीडीपी (Quarterly GDP):
तिमाही जीडीपी मध्ये मागील वर्षाचे कोणत्याही तीन महिन्यातील सकल देशांतर्गत उत्पादनाची तुलना चालू वर्षातील तीन महिन्यांच्या सकल देशांतर्गत उत्पादनाशी केली जाते.

उदाहरणार्थ: 2020 च्या जानेवारी,फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनाची तुला 2021 च्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनाशी केली जाते.

या तुलनेने वरून आलेल्या निष्कर्षावरून देशाचा जीडीपी चा दर ठरवला जातो म्हणजेच गेल्या वर्षीच्या सकल देशांतर्गत उत्पादनापेक्षा यावर्षीच्या सकल देशांतर्गत उत्पादन वाढले असेल तर जीडीपी चा दर वाढला असे समजले जाते याउलट गेल्या वर्षीच्या सकाळ देशांतर्गत उत्पादनापेक्षा यावर्षीच्या सकाळ देशांतर्गत उत्पादनामध्ये घट झाली असेल तर जीडीपी चा दर घसरला असे म्हणतात.

सकलदेशांतर्गत उत्पन्न म्हणजे जीडीपी चा दर काढण्यासाठी वापरले जाणारे सूत्र;

GDP = C + I + G + ( X – M )

जीडीपी = उपभोग + गुंतवणूक + सरकारी खर्च +

( निर्यात – आयात )

उपभोग (C):
Consumption म्हणजेच ज्याला आपण मराठी भाषेमध्ये उपभोग असे म्हणतात. यामध्ये देशातील लोकांचा वैयक्तिक खर्चाचा समावेश होतो.

गुंतवणूक (I):
Investment म्हणजेच ज्याला आपण मराठी भाषेमध्ये गुंतवणूक असे म्हणतात. देशांतर्गत वस्तू आणि सेवांवर सर्व संस्थानी एकुण केलेला खर्च म्हणजेच गुंतवणूक होय.

सरकारी खर्च (G):
Government Expenses ज्याला आपण मराठी भाषेमध्ये सरकारी खर्च असे म्हणतात. यामध्ये सरकार द्वारे करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या खर्चाचा समावेश होतो.

निर्यात (X):
Export ज्याला आपण मराठी भाषेमध्ये निर्यात असे म्हणतो. या मध्ये तयार केलेल्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन जीडीपी द्वारे सामाविष्ट असलेल्या दुसर्‍या देशाच्या वापरासाठी केले जाते

आयात (M):
Import ज्याला आपण मराठी भाषेमध्ये आयात असे म्हणतात. यामध्ये समाविष्ट होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन हे आपल्या देशाच्या सीमा अंतर्गत होतं नसते.

हे देखील वाचा: NRI full form in Marathi | एन आर आय म्हणजे काय?
GDP चे प्रकार:
जीडीपीचे मुख्यता दोन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे;

1.Nominal GDP:

जेव्हा वर्षभरात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या मूल्यांची गणना ही बाजार मूल्य किंवा चालू किमतीची केली जाते तेव्हा त्या वस्तूंना किंवा सेवेला जो जेडीपी प्राप्त होतो त्याला Nominal GDP असे म्हणतात.

Nominal GDP मध्ये महागाईचे मुले सामाविष्ट केलेले असते त्यामुळे Real GDP पेक्षा Nominal GDP मध्ये देशाचा जीडीपी हा नेहमी अधिक पाहायला मिळतो.

Real GDP: जेव्हा वर्षभरामध्ये उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या मूल्यांची गणना ही आधारित वर्षाचे मूल्य किंवा स्थिर किंमती वर केली जाते व तेव्हा त्या वस्तू आणि सेवांना नजीडीपी प्राप्त होतो, त्याला Real GDP असे म्हणतात. 
उत्तर लिहिले · 2/12/2021
कर्म · 121765
0

GDP म्हणजे Gross Domestic Product. याला मराठीमध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणतात.

सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे एका विशिष्ट कालावधीत (quarterly or annually) देशाच्या सीमेमध्ये उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचं एकूण आर्थिक मूल्य.

GDP चा उपयोग देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार आणि वाढ मोजण्यासाठी होतो. GDP आकडेवारीवरून कोणत्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढलं आहे आणि कोणत्या क्षेत्रांमध्ये घट झाली आहे, हे समजतं.

GDP मोजण्याच्या मुख्य तीन पद्धती आहेत:

  1. उत्पादन पद्धत (Production Approach): ह्या पद्धतीत देशातील उत्पादित वस्तू आणि सेवांचं एकूण मूल्य मोजलं जातं.
  2. खर्च पद्धत (Expenditure Approach): ह्या पद्धतीत उपभोग, गुंतवणूक, सरकारी खर्च आणि निव्वळ निर्यात यांचा समावेश होतो.
  3. उत्পন্ন पद्धत (Income Approach): ह्या पद्धतीत कर्मचाऱ्यांचे वेतन, कंपन्यांचा नफा आणि इतर उत्पन्नांचा समावेश होतो.

GDP चे दोन मुख्य प्रकार आहेत:

  • Nominal GDP: ह्यामध्ये वस्तू आणि सेवांचं मूल्य Current Market Prices नुसार मोजलं जातं.
  • Real GDP: ह्यामध्ये वस्तू आणि सेवांचं मूल्य Base Year Prices नुसार मोजलं जातं, ज्यामुळे Inflation चा प्रभाव कमी होतो.

GDP देशाच्या आर्थिक आरोग्याचं एक महत्त्वाचं निर्देशक आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 1620

Related Questions

स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा?
स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये सांगा?
स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व कसे स्पष्ट कराल?
स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो का?
स्थुल अर्थशास्त्राच्या मुलभूत संकलपना स्पष्ट करा?
प्रवेग तत्त्व म्हणजे काय?
प्रवेग तत्व म्हणजे काय?