2 उत्तरे
2
answers
स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व कसे स्पष्ट कराल?
2
Answer link
स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्य | Features Of Macro Economics...-
स्थूल अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील समग्र घटकांचा अभ्यास केला जातो . उदा. राष्ट्रीय उत्पन्न , राष्ट्रीय उत्पादन , राष्ट्रीय रोजगार , सर्वसाधारण किंमत पातळी , व्यापारचक्र इत्यादी .
२] उत्पन्न सिद्धांत :-
स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना त्याचे विविध घटक , मापन पद्धती इत्यादीचा अभ्यास करते . हे एकूण मागणी व एकूण पुरवठाशी संबंधित आहे . तसेच यात राष्ट्रीय उत्पन्नातील चढ-उतार , व्यापारचक्रतील तेजी-मंदी या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण करते .
३] सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण :-
स्थूल अर्थशास्त्राच्या सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण केले जाते . यामध्ये एकूण घटकांचा वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे . सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेत मागणी , पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडित आहे .
४] परस्परावलंबन :-
स्थूल विश्लेषणात उत्पन्न , उत्पादन , रोजगार , गुंतवणूक , किंमतपातळी यांसारख्या आर्थिक परस्परावलंबन विचारात घेतले जाते . उदा. गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम , उत्पन् , एकूण उत्पादन , रोजगार आणि आर्थिक वृद्धीवर होतो .
५] राशी पद्धत :-
स्थूल अर्थशास्त्रात राशी पद्धधतीचा अवलंब केला जाते . यामध्ये केवळ एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो . प्रा . बोल्डींग यांच्या मते ,
" जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समूच्चय असतो . परंतू त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाही " यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्रातील यांमधीत फरक दर्शविला जातो .
६] वृद्धीची प्रारूपे :-
स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते . आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात . उदा . देशांच्या आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी मूलभूत व अवजड उद्योगांवर भर देणारे महालनोबीस वृद्धी प्रारूप .
७] सर्व साधारण किंमत पातळी :-
स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चित त्यातील बदलांचा अभ्यास केला जातो . सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सदस्यस्थितील उत्पादित केलेले सर्व वस्तू व सेवांच्या किंमतीची सरासरी होय .
८] धोरणाभिमुख :-
लॉर्ड केन्सच्या मते " स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविण्याच्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे " . उदा . भाववाढ नियंत्रण , रोजगारनिर्मिती , अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढाणे इ.
धन्यवाद...!!
0
Answer link
स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल:
- आर्थिक धोरणे तयार करणे: स्थूल अर्थशास्त्र सरकारला देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी योग्य धोरणे तयार करण्यास मदत करते. राष्ट्रीय उत्पन्न, एकूण मागणी, आणि एकूण पुरवठा यांचा अभ्यास करून सरकारला कर धोरण, खर्च धोरण, आणि व्यापार धोरण ठरवता येतात.
- आर्थिक समस्यांचे निराकरण: महागाई, बेरोजगारी, आणि मंदी यांसारख्या आर्थिक समस्या समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे.
- अर्थव्यवस्थेची कामगिरी: स्थूल अर्थशास्त्रामुळे अर्थव्यवस्थेची कामगिरी मोजता येते. GDP (Gross Domestic Product), महागाई दर, आणि बेरोजगारी दर यांसारख्या निर्देशकांच्या आधारावर अर्थव्यवस्था किती चांगली कामगिरी करत आहे हे समजते.
- भविष्यवाणी: स्थूल अर्थशास्त्रज्ञांना आर्थिक मॉडेल वापरून भविष्यातील आर्थिक घटनांचा अंदाज लावता येतो. यामुळे व्यवसायांना आणि सरकारला योजना बनवण्यासाठी मदत होते.
- गुंतवणूक निर्णय: गुंतवणूकदारांना कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करावी हे ठरवण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरते.macroeconomics helps investors decide where to invest.macroeconomics helps investors decide where to invest.
थोडक्यात, स्थूल अर्थशास्त्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे.