2 उत्तरे
2
answers
नारळाच्या झाडाला नारळ येत नाही, काय उपाय आहे?
8
Answer link
☙ नारळाच्या झाडांना चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची गरज असते. खते आणि पाणी नियमित दिले तर नारळाची वाढ होऊन झाड ५ ते ६ वर्षांतच फुलोर्यावर येते. पहिल्यावर्षी शेणखत १० किलो, नत्र २०० ग्रॅम , स्फुरद १०० ग्रॅम, पालाश २०० ग्रॅम आणि कल्पतरू सेंद्रिय खत ५०० ग्रॅम या प्रमाणात द्यावे. नंतर पुढे तेवढेच प्रमाण वाढवून दरवर्षी खते द्यावीत.नत्र व पालाश ह्या खतांच्या मात्रा जून, सप्टेंबर आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये तीन वेळा विभागून द्याव्यात. तर शेणखत, कल्पतरू सेंद्रियखत आणि स्फुरद संपूर्ण मात्रा जूनमध्ये द्यावी.
☙ खते कशी द्यावीत :झाडाच्या बुंध्यापासून एक मीटर अंतरावर ३० सेंमी रुंदीचा व १५ सेंमी खोलीचा चर काढून त्यात खते द्यावीत आणि चर पुन्हाबुजवावा. जसजसे रोप मोठे होईल तसतसा चर बुंध्यापासून दूर काढावा.
☙मिठाचा वापर :कोकणातील काही शेतकरी नारळाच्या झाडाला खत म्हणून काही प्रमाणात मिठाचा वापर करतात. परंतु खत म्हणून मिठाची उपयुक्तात सिद्ध झालेली नाही. यामुळे खत म्हणून मिठाच वापर करू नये. देशावरील भागात तर मिठाचा वापर अजीवात करू नये.
☙पाणी :नारळाच्या झाडांना नियमितपणे पाणी दिले तर त्यांचे उत्पादन बर्याच प्रमाणात वाढते. नारळाच्या झाडांना मुख्यत्वेकरून उन्हाळ्यात पाणी देण्याची जास्त आवश्यकताही असते. काही ठिकाणी पावसाळ्यानंतर नारळाच्या झाडांना पाणी दिले जात नाही. परिणामी झाडांची योग्य वाढ होत नाही आणि उत्पादन कमी मिळते.
______________☙_____________

0
Answer link
नारळाच्या झाडाला नारळ येत नसल्यास खालील उपाय केले जाऊ शकतात:
- झाडाची तपासणी: सर्वप्रथम झाडाची व्यवस्थित तपासणी करा. झाडाला कीड लागलेली आहे का, पाने पिवळी पडली आहेत का, किंवा इतर काही समस्या आहेत का ते तपासा.
- खत आणि पाणी: नारळाच्या झाडाला नियमित खत आणि पाण्याची आवश्यकता असते. झाडाला आवश्यक पोषक तत्वे मिळत आहेत की नाही ते तपासा. शेणखत आणि कंपोस्ट खत उपयुक्त ठरू शकते.
- माती परीक्षण: माती परीक्षण करून घ्या. मातीमध्ये कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे हे तपासा आणि त्यानुसार खत टाका.
- सूर्यप्रकाश: नारळाच्या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. झाडाला दिवसातील किमान ६-८ तास सूर्यप्रकाश मिळायला हवा.
- रोग आणि कीड नियंत्रण: झाडाला रोग किंवा कीड लागली असेल, तर त्यावर योग्य उपाय करा.
- कलम आणि नवीन झाडे: चांगल्या प्रतीची नारळाची कलमे लावा.
अधिक माहितीसाठी, आपण कृषी तज्ञांचा सल्ला घ्या किंवा कृषी विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.
टीप: नारळाच्या झाडाला फळ येण्यासाठी काही वर्षे लागू शकतात, त्यामुळे संयम ठेवा.