भारताचा इतिहास
भाषा
मराठी भाषा
भाषाशास्त्र
अभिजात भाषा म्हणजे काय? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का नाही?
3 उत्तरे
3
answers
अभिजात भाषा म्हणजे काय? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का नाही?
18
Answer link
भारतात संस्कृत, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या चार भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे.
भाषेच्या अभिजातपणासंबंधी केंद्र सरकारचे चार निकष आहेत.
१) भाषा दीड ते दोन हजार वर्षे जुनी असावी.
२) ती भाषा बोलणाऱ्या लोकांनी मौल्यवान वारसा म्हणून जपलेले प्राचीन साहित्य असावे.
३) भाषेची परंपरा तिची स्वत:ची असावी.
४) भाषेचे आधुनिक रूप हे तिच्या प्राचीन रूपांहून भिन्न असले, तरी चालेल; पण त्यांच्यात आंतरिक नाते असावे
मराठी भाषा हे निकष पूर्ण करत नाही असा समाज या आधी होता. मराठी भाषा हि संस्कृत पासून तयार झाली आहे असा समज होता म्हणून हि स्वयंभू भाषा नाही असे मानले जाते. परंतु शासनाने नेमलेल्या समितीच्या अभ्यासाअंती मराठी भाषा हि संस्कृत पासून तयार झालेली नसून स्वयंभू आहे हे सिद्ध झाले आहे. आणि भाषेला अभिजात दर्जा लवकरच मिळेल अशी अशा आहे.

4
Answer link
१)भाषा प्राचीन म्हणजे किमान १५००वर्ष जुनी असावी.
२)त्या भाषेत समृद्ध साहित्य किंवा वाङ्मय परंपरा असावी.
३)भाषेला स्वतःचं स्वयंभू पण असावं म्हणजे इतर भाषेवर अवलंबून नसावं.
४)प्राचीन भाषा आणि तिचे नंतरची रूपे यांमध्ये अंतर असावे.
साधारण मराठी भाषा ही सर्वसाधारण पणे ८००वर्षांपासून असल्याचे मानले जात असल्याने हा एक अडथळा होता,परंतु प्रा.रंगनाथ पठारे ह्यांच्या अध्यक्षते खालील समिती मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून प्रयत्नशिल आहे.दुर्दैवाने २ वर्षांपासून राज्यसरकार ह्या बाबतीत कामालीची उदासीनता दाखवत आहे.दुर्दैवाने राजकीय आणि प्रशासकीय अनिच्छेमुळे किंवा उदासीनतेमुळे अजून पर्यन्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नाही मिळाला.
अधिक माहिती --
मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेले प्रा.हरी नरके सर ह्यांमते-
"गाथा सप्तशती" हा ७०० श्लोकांचा मराठी ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला. त्याचा अर्थ असा की ही भाषा त्या लिखाणाअगोदर किमान ३०० वर्षे अस्तित्वात असली पाहिजे. ग्रंथातील वर्णन आजही मराठी लोकांच्या आचार-विचारांशी आणि त्यांच्या सध्याच्या संस्कृतीशी जुळणारे आहे. ग्रंथात वापरलेले गेलेले हाही शब्द मराठीखेरीज अन्य भारतीय भाषेत नाहीत.-प्रा.हरी नरके

0
Answer link
अभिजात भाषा म्हणजे काय?
अभिजात भाषा म्हणजे अशी भाषा:
- ज्या भाषेला मोठी परंपरा आहे.
- ज्या भाषेचे साहित्य उत्कृष्ट आहे.
- ज्या भाषेची स्वतःची अशी लेखनशैली आहे.
- जी भाषा इतर भाषांवर अवलंबून नाही.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का नाही?
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी अनेक निकष पूर्ण करावे लागतात. त्यापैकी काही महत्त्वाचे निकष खालीलप्रमाणे:
- भाषेचा इतिहास 1500 ते 2000 वर्षे जुना असावा.
- भाषेचे स्वतंत्र साहित्य आणि परंपरा असावी.
- भाषेमध्ये मौलिकता असावी.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा न मिळण्याची काही कारणे:
- पुरावे: मराठी भाषेचा इतिहास सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणारे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत, असा युक्तिवाद काही अभ्यासक करतात.
- कालमर्यादा: काही तज्ञांच्या मते, मराठी भाषा अभिजात भाषेच्या कालमर्यादेत बसत नाही.
- समकालीनता: मराठी भाषेवर इतर भाषांचा प्रभाव आहे, त्यामुळे ती पूर्णपणे स्वतंत्र नाही, असे मानले जाते.
टीप: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक प्रयत्न चालू आहेत.
अधिक माहितीसाठी: मराठी भाषा विकास