केस त्वचा आणि सौंदर्य आरोग्य

केस गळती थांबवण्यासाठी काय उपाय करावा?

2 उत्तरे
2 answers

केस गळती थांबवण्यासाठी काय उपाय करावा?

1
तुमचे केस गळत असतील आणि तुम्हांला टक्कल पडत असेल तर घाबरू नका. तुम्हाला आम्ही असे काही उपाय सांगणार आहे त्याने तुमची केस गळती थांबेल.

१. तुमचा खुराक चांगला असला पाहिजे. चांगले केस चांगल्या तब्येतीवर सजलेले दिसतात. प्रोट्रीनयुक्त अन्न खा. दूध, मासे, पनीर खा
२. ओल्या केसांना रगडून पुसू नका. केस सुकल्यानंतर त्यावर कंगवा फिरवा.
३. केसांना तेलाने मसाज करा. मसाज करताना बोटे डोक्याच्या पृष्ठभागावर रगडा, केसांवर नको.
४. पातळ केस असल्यास ऑलिव्ह तेल वापरा. तसेच मोहरीच्या (सरसो) तेलात मेथी गरम करून लावल्यास लाभ होतो.
५. तेल सामान्य तापमान किंवा गरम नसावे. कोमट असावे.
६. कांद्याचा रस लावा. अर्धा तासानंतर धुऊन टाका. यामुळे डोक्याची तब्येत चांगली होतील.
7. शिर्षासन करा.शिर्षासनाने तुमच्या केसांना रक्तपुरवठा चांगला होतो.
8. मुल्तानी माती लावा. केसांचं टेकश्चर चांगलं होण्यास मदत होते. केसांची चमक वाढते.
9. आवळा आणि शिकाकायी लोखंडाच्या कढईत भिजत घाला. दोन दिवसांनी ते काढूण वाटून घ्या. त्यातील बिया काढून टाका. त्यात दही आणि मेंहंदी घाला. ते डोक्याला लावा आणि नंतर चार तासांनी धुवून काढा.
10. कंडिशनिंग आणि डैंड्रफ दूर करण्यासाठी दही लावा.
11. खोट्या जाहिरातींना बळी पडू नका. चांगले प्रोड्क्टस वापरा.
12. बाबा रामदेवच्या म्हणण्यानुसार हातांची नखे एकमेकांवर घासा.
13. व्हिटॅमिन ई गोळ्या घेऊ शकता. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
14. केस कधी कधी धुतल्यावर ते कमीच गळतात अशा भ्रमात राहू नका. अस्वच्छ केस जास्त त्रासदायक ठरतात.

15. डोकंवर करून आणि पद्धतशीर चाला. घाम जास्त आला तर तो सुकण्याची वाट बघु नका ओल्या कपड्याने तो पुसून टाका.
16. अळशीच्या बिया खा.
17. गरम पाण्यात टॉवेल भिजवून तो डोक्यावर ठेवा.
18. केसांमधून सतत हात फिरवू नये.
19. केसांना नेहमी  फणीने विंचरले पाहीजे.
20. जास्त गरम पाण्याने केस धुवू नये.

21. केसांचा मसाज : रोजच्या रोज काही मिनिटांसाठी केसांना मसाज करा. यामुळं डोक्यातील रक्त प्रवाह नियंत्रित होण्यास मदत होते. डोक्यातील त्वचेला रक्त प्रवाह सुरळीत झाल्यास केसांची मुळं घट्ट होतात. केसांच्या मसाजसाठी खोबरेल तेलात दोन थेंब लिंबूचा रस टाका आणि एका तासानंतर शॅम्पूनं केस चांगले धुवा.
घरगुती हेयर स्पा : गरम पाण्यात ऑलिव्हचे तेल काही थेंब घाला आणि त्यात दोन मिनिटांसाठी टॉवेल भिजवून ठेवा. नंतर ह्या टॉवेलनं केसांना झाकून घ्या. हा एक प्रकारचा नैसर्गिक स्पा आहे.
22. नैसर्गिक रस : तुम्ही तुमच्या डोक्यातील त्वचेला लसूण, कांदा आणि आलं यांचा रस लावू शकता. हे रात्रभर लावून ठेवा आणि सकाळी केस धुवून टाका.
ओले केस विंचरू नये : केसांना मजबूत ठेवण्यासाठी ओले केस विंचरू नये, हे खूपचं उपयुक्त आहे. ओले केस विंचरल्यामुळं जास्त तुटतात. जर बाहेर जायची फारचं घाई असेल तरीही केस थोडे सुकवून नंतर ते विंचरा. 

उत्तर लिहिले · 27/10/2016
कर्म · 15105
0
केस गळती थांबवण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
  • आहार:

    प्रथिने (proteins), लोह (iron), जस्त (zinc) आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड (omega-3 fatty acids) युक्त आहार घ्या.

    उदाहरणार्थ: मासे, अंडी, पालक, नट्स आणि बीन्स.

  • तेल मालिश:

    नियमितपणे केसांच्या मुळांना तेल लावा आणि मालिश करा.

    उदाहरणार्थ: नारळ तेल, बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल (olive oil).

  • केसांची निगा:

    केसांना सौम्य شامبو (shampoo) वापरा आणि गरम पाण्याने केस धुणे टाळा.

    केसांना जास्त जोर देऊनdrying करणे टाळा.

  • ताण टाळा:

    तणाव कमी करण्यासाठी योग (yoga) आणि ध्यान (meditation) करा.

  • नैसर्गिक उपाय:

    आवळा, शिकेकाई आणि रीठा यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करा.

  • डॉक्टरांचा सल्ला:

    जर केस गळती जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 5300

Related Questions

माझ्या डोक्यात/केसात नेहमी कोंडा होतो. त्यावर काय उपाय करावा? (मी केसांना तेल लावत नाही)
केसगळती वर हमखास उपाय काय?
माझ्या नखाला इन्फेक्शन झाले आहे, लाल छोटा फोड आहे तर त्याच्यावर उपाय सुचवा?
केस गळतीवर चांगला उपाय काय?
अंघोळीसाठी मिठाचे पाणी वापरले तर काय होते?
माझे केस खूप गळत आहेत, त्यासाठी काहीतरी उपाय सांगा. मला एक गोष्ट कळत नाही की जे रस्त्यावरचे भिकारी लोक असतात, त्यांना नीट खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही आणि आंघोळही करायला मिळत नाही, तरीही त्यांचे केस गळत नाहीत आणि आम्ही रोज आंघोळ करून चांगलं खाऊन असतो, तरीही आमचे केस का गळतात?
पांढरे केस उपटल्याने नवीन पांढरे केस येतात काय?