कृषी पीक व्यवस्थापन

कापणीच्या आधी कोणकोणती कामे करावी लागतात, ती अनुक्रमे लिहा?

2 उत्तरे
2 answers

कापणीच्या आधी कोणकोणती कामे करावी लागतात, ती अनुक्रमे लिहा?

1
कापणीच्या आधी कोणकोणती कामे करावी लागतात त्या अनुक्रमे 
1)जमिनीची मशागत
2) पेरणी 
3)बेननी (म्हणजे शेतात उगवणारे तण(गवत) म्हणजे बेननी) तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सांग
4)कापणी
१) मशागत -मशागतीसाठी गोवर, पालापाचोळा,गवत हे टाकून मशागत केली जाते.
२) मशागत केल्या नंतर  त्या जमिनीत ले दगड वगैरे काढून पाला पाचोळा राहिलेला परत जाळलं जात 

२) १. नांगरणीः शेतकरी शेतजमिनीत बिया पेरण्यासाठी लोखंडी नांगराने जमीन नांगरतो. कधी बैलजोडीच्या तर कधी ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी केली जाते.
2. पेरणी : नांगरणी झाल्यानंतर शेतकरी जे पीक घ्यायचे त्या बियांची पेरणी करतो.

3. पिकाला गरज पडेल तेवढे पाणी दिले जाते.

4. खते घालणेः पीक चांगले यावे यासाठी पिकाला खते घातली जातात.
३ ) बेननी -बीज उगवल्यावर त्यात तण उगवलं जात ते तण काढले नाही तर कापणी च्या वेळेस अडचण होते म्हणून साफ करणे गरजेचे असते.
४) कापणी 
५)मळणी 

उत्तर लिहिले · 20/2/2024
कर्म · 53710
0
खाली कापणीच्या आधी करावयाच्या कामांची क्रमवार यादी दिली आहे:
  1. पिकाची पाहणी: कापणी करण्यापूर्वी, आपले पीक पूर्णपणे तयार झाले आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे.

    1. धान्य पिकांसाठी: बहुतेक धान्य पिकांमध्ये, जेव्हा दाणे कडक होतात आणि त्यातील ओलावा कमी होतो, तेव्हा ते कापणीसाठी तयार असतात.
    2. कडधान्य पिकांसाठी: कडधान्ये पूर्णपणे वाळल्यानंतर आणि त्यांची पाने पिवळी झाल्यावर कापणी करावी.

  2. मजुरांची उपलब्धता: कापणीसाठी पुरेसे मजूर उपलब्ध आहेत का, हे तपासावे. आवश्यक असल्यास, त्यांची व्यवस्था करावी.
  3. उपकरणांची तपासणी: कापणीची उपकरणे, जसे की विळे, कोयते किंवा हार्वेस्टर (harvestor), व्यवस्थित आहेत का, हे तपासावे. ती व्यवस्थित काम करत आहेत की नाही, याची खात्री करावी.
  4. कापणीनंतरची तयारी: कापणी झाल्यावर धान्य साठवण्यासाठी योग्य जागा तयार ठेवावी. खळ्याची जागा स्वच्छ करून घ्यावी.
  5. हवामानाचा अंदाज: कापणीच्या वेळेस हवामान कसे असेल, याचा अंदाज घ्यावा. त्यानुसार कापणीचे नियोजन करावे.
  6. बाजारभाव: कापणीच्या वेळेस आपल्या पिकाला बाजारात काय भाव मिळेल, याची माहिती घ्यावी, जेणेकरून कापणी कधी करायची हे ठरवता येईल.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1820

Related Questions

एका एकरमध्ये किती कपाशीचे झाडं बसतात?
कॅरोलिना रीपर या मिरचीचे बियाणे भारतात कुठे मिळते?
सर्वात तिखट मिरची कोणती?
जगातील सर्वात मोठे फळ कोणते?
जगातील सर्वात जास्त तुरट फळ कोणते?
जगातील सर्वात जास्त खारट फळ कोणते?
जगात सर्वात आंबट फळ कोणते?