
पीक व्यवस्थापन
0
Answer link
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute - VSI) यांच्या कृषी पुष्पमुद्रेचे (Agricultural Logo) चिन्ह खालीलप्रमाणे आहे:
- मध्यभागी: ऊसाचे चित्र (Sugarcane Image).
- आजूबाजूला: संस्थेचे नाव (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट) आणि ब्रीदवाक्य (ध्येय - संशोधन, विकास आणि विस्तार) लिहिलेले आहे.
- रंग: हिरवा आणि सोनेरी रंग वापरलेले आहेत, जे समृद्धी आणि कृषी विकासाचे प्रतीक आहेत.
अधिक माहितीसाठी, आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: www.vsisugar.com
1
Answer link
कापणीच्या आधी कोणकोणती कामे करावी लागतात त्या अनुक्रमे
1)जमिनीची मशागत
2) पेरणी
3)बेननी (म्हणजे शेतात उगवणारे तण(गवत) म्हणजे बेननी) तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सांग
4)कापणी
१) मशागत -मशागतीसाठी गोवर, पालापाचोळा,गवत हे टाकून मशागत केली जाते.
२) मशागत केल्या नंतर त्या जमिनीत ले दगड वगैरे काढून पाला पाचोळा राहिलेला परत जाळलं जात
२) १. नांगरणीः शेतकरी शेतजमिनीत बिया पेरण्यासाठी लोखंडी नांगराने जमीन नांगरतो. कधी बैलजोडीच्या तर कधी ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी केली जाते.
2. पेरणी : नांगरणी झाल्यानंतर शेतकरी जे पीक घ्यायचे त्या बियांची पेरणी करतो.
3. पिकाला गरज पडेल तेवढे पाणी दिले जाते.
4. खते घालणेः पीक चांगले यावे यासाठी पिकाला खते घातली जातात.
३ ) बेननी -बीज उगवल्यावर त्यात तण उगवलं जात ते तण काढले नाही तर कापणी च्या वेळेस अडचण होते म्हणून साफ करणे गरजेचे असते.
४) कापणी
५)मळणी
0
Answer link
वर्षाच्या हातावर तुरी देण्याचा वाक्प्रचार एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला फसवले किंवा तिच्यापेक्षा जास्त चलाख असल्याचे दर्शवण्यासाठी वापरला जातो.
हा वाक्प्रचार नेमका कधीपासून रूढ झाला हे सांगणे कठीण आहे, पण तो मराठी भाषेत अनेक वर्षांपासून वापरला जातो.
या वाक्प्रचाराचा अर्थ आणि उपयोग खालीलप्रमाणे आहे:
- अर्थ: एखाद्याला cleverness ने हरवणे, फसवणूक करणे.
- उपयोग: जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला हुशारीने फसवते, तेव्हा म्हणतात की त्याने/तिने 'वर्षाच्या हातावर तुरी दिली'.
1
Answer link
जिथे वेलीची पिक असतात तिथे बांबूचा आधार लागतो
कारले, दोडका, काकडी, भोपळा, दुधी, घेवडा, कोहळा, टरबूज, फुल कोबी, फळभाज्या, फुल या रोपांना आधार देण्यासाठी बांबूचा आधार लागतो.
कारली व दोडका या सारख्या वेलभाज्यांना मांडव, बांबू इत्यादी प्रकारांचा आधार द्यावा. वेलवर्गीय भाज्यांना आधारासाठी बांबूच्या साहाय्याने मंडप तयार करावा.
टोमॅटोमध्ये फळ लागल्यावर वजनाने झाड वाकते. याकरिता त्यास बांबूचा आधार देणे गरजेचे आहे.
रोप वाढत असताना जेव्हा वाढ होते तेव्हा जमिनीवर आडवी पडतात, पाने वाळतात. म्हणून रोपांना आधार द्यावा लागतो.
1
Answer link
मका ही वनस्पती २-३ मी. उंच वाढते. खोड १८–२० पेरांनी बनलेले असते. त्या पेरांना संधिक्षोड म्हणतात. त्याची आगंतुक मुळे तंतुमय असतात. जमिनीलगतच्या २३ पेरांपासून जाड आधारमुळे वाढलेली असतात. खोडाच्या प्रत्येक पेरावर एक साधे, मोठे, लवदार, लांब आणि रुंद पान असते. पान सु. १०० सेंमी. लांब आणि ८–१० सेंमी. रुंद असते. मक्याच्या रोपावर नर-फुले आणि मादी-फुले वेगवेगळ्या ठिकाणी फुलोऱ्यात येतात. या फुलोऱ्यांना सर्वसाधारणपणे तुरे म्हणतात. नर-फुलोरा स्तबक प्रकारचा असून तो झाडाच्या शेंड्याला येतो, तर मादी-फुलोरा पानांच्या बगलेत येतो.

मादी-फुलोरा छदकणिश प्रकारचा असून तो मोठ्या छदांनी वेढलेला असतो. मादी-फुले सहपत्री, लहान व बिनदेठाच्या किंवा देठाच्या लहान फुलोऱ्यात (कणिशकात) जोडीने येतात. मादी-फुलोऱ्यातील सर्व कणिशके बिनदेठाची असतात. प्रत्येक कणिशकातील दोन्हींपैंकी एक फूल (पुष्पक) वंध्य असून त्यात परिदलक नसतात; ही सर्व कणिशके एका रांगेत असून छदकणिशाच्या जाड दांड्यावर त्यांच्या ८–१६ आणि क्वचित प्रसंगी ३० पर्यंत रांगा असतात आणि त्या सर्वांवर मोठ्या, चिवट व काहीशा चौकोनी छदांचे आवरण असते. प्रत्येक मादी-फुलात एक अंडाशय, त्यावर ४०–५० सेंमी. लांब व मऊ केसासारखा कुक्षिवृंत आणि टोकाला लांब पण दुभागलेली कुक्षी असते. मादी-फुलातील सर्व कुक्षिवृंताचा शेंडीसारखा झुबका छदांच्या आवरणातून बाहेर लोंबत असतो. यालाच मक्याचे ‘रेशीम’ म्हणतात.
नर-फुलोऱ्याच्या कणिशकांच्या जोड्यांतील प्रत्येक कणिशकात दोन लहान फुले (पुष्पके, फुलोऱ्यातील एक फूल), दोन पुष्पी तुषे (तुष म्हणजे पातळ, परंतु कठीण उपांगासारखे आवरण), दोन बाह्यसहपत्रे, दोन अंत:स्तुषे व तळात दोन-दोन परिदलके असतात. प्रत्येक नर-फुलात तीन पुंकेसर असतात. नर-फुलोऱ्यातील परागकण वाऱ्यावर पसरत जाऊन अन्य कुक्षींवर पडतात आणि परपरागण घडून येते. मक्याची शुष्क दाणे छदकणिशावर तयार होतात.
0
Answer link
पीक रचना म्हणजे शेतामध्ये विविध पिकांची योजनाबद्ध पद्धतीने लागवड करणे.
पीक रचनेचे फायदे:
- जमिनीची सुपीकता टिकून राहते.
- रोग आणि किडींचे नियंत्रण होते.
- उत्पादनात वाढ होते.
- नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर होतो.
पीक रचनेचे प्रकार:
- एक पीक पद्धती: एकाच शेतात वर्षानुवर्षे एकच पीक घेणे.
- आंतरपीक पद्धती: दोन किंवा अधिक पिके एकाच वेळी एकाच शेतात घेणे.
- पीक फेरपालट: जमिनीच्या सुपीकतेनुसार वेगवेगळ्या पिकांची लागवड करणे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:
3
Answer link
जमिनीची धूप -कमी करण्यासाठी भुईमूग मटकी कुंडलीत अशी इत्यादी पीक घेतली जातात
उपाययोजना
मातीचे कण जमिनीपासून वेगळे होऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पावसाच्या पाण्याबरोबर किंवा वाऱ्याबरोबर वाहत जाणे म्हणजे जमिनीची धूप होय. शेतात अयोग्य रानबांधणी, पाण्याचा अयोग्य वापर, पाणी मुरवण्याची व्यवस्था नसणे, अपधाव सुरक्षितपणे वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसणे इत्यादींमुळे जमिनीची धूप होते. ती कमी करण्यासाठी पॅरा गवताची लागवड फायदेशीर ठरते. त्याचा उपयोग दुभत्या गुरांना हिरवा चारा म्हणून तर होतोच; शिवाय जमिनीवर आच्छादन निर्माण होऊन जमिनीची धूप थांबते.
उपाययोजना
जमिनीवर पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत जिरविले जाईल किंवा शोषले जाईल व भूपृष्ठावरून वाहणाऱ्या अपधाव पाण्याचे प्रमाण कमी होईल अशी व्यवस्था करावी.
पाण्याबरोबर वाहत येणाऱ्या गाळाचे स्थापन घडवून आणण्याची व्यवस्था करावी. पिकांची फेरपालट करून वेगवेगळ्या प्रकारची पिके आलटून-पालटून घ्यावीत.
पट्टा पेर पद्धतीचा वापर करून सर्वत्र सलग एकच पीक न घेता वेगवेगळ्या प्रकारची पिके वेगवेगळ्या पट्ट्यांमधून घ्यावीत.
शेतीसाठी करावयाच्या संपूर्ण मशागती, जसे नांगरणी, कुळवणी, पेरणी, कोळपणी इ. उताराच्या आडव्या व समपातळी रेषेत समांतर करावी.
उताराच्या जमिनीची धूप थांबविण्यासाठी समपातळीतील बांधबंदिस्ती, ढाळीचे वरंबे , उताराला आडवे वाफे, पायऱ्यांचे मजगीकरण, नाला विनयन, तसेच समपातळीत चर खोदणे या उपाययोजना कराव्यात.
धूपनियंत्रण करण्यासाठी भुईमूग, मटकी आणि कुळीथ ही पिके अत्यंत कार्यक्षम आहेत.