कृषी पीक व्यवस्थापन

जमिनीची धूप कमी करण्यासाठी पहिले कोणते पीक घेतले जाते?

2 उत्तरे
2 answers

जमिनीची धूप कमी करण्यासाठी पहिले कोणते पीक घेतले जाते?

3


जमिनीची धूप -कमी करण्यासाठी भुईमूग मटकी कुंडलीत  अशी इत्यादी पीक घेतली जातात
उपाययोजना
मातीचे कण जमिनीपासून वेगळे होऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पावसाच्या पाण्याबरोबर किंवा वाऱ्याबरोबर वाहत जाणे म्हणजे जमिनीची धूप होय. शेतात अयोग्य रानबांधणी, पाण्याचा अयोग्य वापर, पाणी मुरवण्याची व्यवस्था नसणे, अपधाव सुरक्षितपणे वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसणे इत्यादींमुळे जमिनीची धूप होते. ती कमी करण्यासाठी पॅरा गवताची लागवड फायदेशीर ठरते. त्याचा उपयोग दुभत्या गुरांना हिरवा चारा म्हणून तर होतोच; शिवाय जमिनीवर आच्छादन निर्माण होऊन जमिनीची धूप थांबते.

उपाययोजना
जमिनीवर पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत जिरविले जाईल किंवा शोषले जाईल व भूपृष्ठावरून वाहणाऱ्या अपधाव पाण्याचे प्रमाण कमी होईल अशी व्यवस्था करावी.
पाण्याबरोबर वाहत येणाऱ्या गाळाचे स्थापन घडवून आणण्याची व्यवस्था करावी. पिकांची फेरपालट करून वेगवेगळ्या प्रकारची पिके आलटून-पालटून घ्यावीत.
पट्टा पेर पद्धतीचा वापर करून सर्वत्र सलग एकच पीक न घेता वेगवेगळ्या प्रकारची पिके वेगवेगळ्या पट्ट्यांमधून घ्यावीत.
शेतीसाठी करावयाच्या संपूर्ण मशागती, जसे नांगरणी, कुळवणी, पेरणी, कोळपणी इ. उताराच्या आडव्या व समपातळी रेषेत समांतर करावी.
उताराच्या जमिनीची धूप थांबविण्यासाठी समपातळीतील बांधबंदिस्ती, ढाळीचे वरंबे , उताराला आडवे वाफे, पायऱ्यांचे मजगीकरण, नाला विनयन, तसेच समपातळीत चर खोदणे या उपाययोजना कराव्यात.
धूपनियंत्रण करण्यासाठी भुईमूग, मटकी आणि कुळीथ ही पिके अत्यंत कार्यक्षम आहेत.
 


उत्तर लिहिले · 25/11/2021
कर्म · 121765
0

जमिनीची धूप कमी करण्यासाठी पहिले पीक म्हणून शेंगावर्गीय (Leguminous) पीक घेतले जाते.

शेंगावर्गीय पिकांचे फायदे:

  • जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण वाढवतात.
  • जमिनीची धूप कमी करतात.
  • जमीन सुपीक बनवतात.

उदाहरण:

  1. मूग
  2. उडीद
  3. सोयाबीन
  4. गवार

शेंगावर्गीय पिके जमिनीची धूप कमी करण्यास कशी मदत करतात?

  • या पिकांच्या मुळांमध्ये रायझोबियम (Rhizobium) नावाचे जीवाणू असतात, जे हवेतील नायट्रोजन शोषून घेतात आणि तो जमिनीत स्थिर करतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.
  • शेंगावर्गीय पिकांमुळे जमिनीला नैसर्गिकरित्या नायट्रोजन मिळाल्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होतो, ज्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते.
  • या पिकांची मुळे जमिनीत खोलवर जातात, त्यामुळे माती घट्ट धरून ठेवली जाते आणि धूप कमी होते.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1820

Related Questions

वसंतच्या कृषी पुष्पमुद्राचे चिन्ह?
कापणीच्या आधी कोणकोणती कामे करावी लागतात, ती अनुक्रमे लिहा?
वर्षाच्या हातावर तुरी कधी दिली?
कोणकोणत्या पिकांना बांबूचा आधार लागतो?
मक्याच्या पानाचा प्रकार कोणता?
पीक रचना म्हणजे काय?
मेथी पीक नियंत्रण?