4 उत्तरे
4
answers
मक्याच्या पानाचा प्रकार कोणता?
1
Answer link
मका ही वनस्पती २-३ मी. उंच वाढते. खोड १८–२० पेरांनी बनलेले असते. त्या पेरांना संधिक्षोड म्हणतात. त्याची आगंतुक मुळे तंतुमय असतात. जमिनीलगतच्या २३ पेरांपासून जाड आधारमुळे वाढलेली असतात. खोडाच्या प्रत्येक पेरावर एक साधे, मोठे, लवदार, लांब आणि रुंद पान असते. पान सु. १०० सेंमी. लांब आणि ८–१० सेंमी. रुंद असते. मक्याच्या रोपावर नर-फुले आणि मादी-फुले वेगवेगळ्या ठिकाणी फुलोऱ्यात येतात. या फुलोऱ्यांना सर्वसाधारणपणे तुरे म्हणतात. नर-फुलोरा स्तबक प्रकारचा असून तो झाडाच्या शेंड्याला येतो, तर मादी-फुलोरा पानांच्या बगलेत येतो.

मादी-फुलोरा छदकणिश प्रकारचा असून तो मोठ्या छदांनी वेढलेला असतो. मादी-फुले सहपत्री, लहान व बिनदेठाच्या किंवा देठाच्या लहान फुलोऱ्यात (कणिशकात) जोडीने येतात. मादी-फुलोऱ्यातील सर्व कणिशके बिनदेठाची असतात. प्रत्येक कणिशकातील दोन्हींपैंकी एक फूल (पुष्पक) वंध्य असून त्यात परिदलक नसतात; ही सर्व कणिशके एका रांगेत असून छदकणिशाच्या जाड दांड्यावर त्यांच्या ८–१६ आणि क्वचित प्रसंगी ३० पर्यंत रांगा असतात आणि त्या सर्वांवर मोठ्या, चिवट व काहीशा चौकोनी छदांचे आवरण असते. प्रत्येक मादी-फुलात एक अंडाशय, त्यावर ४०–५० सेंमी. लांब व मऊ केसासारखा कुक्षिवृंत आणि टोकाला लांब पण दुभागलेली कुक्षी असते. मादी-फुलातील सर्व कुक्षिवृंताचा शेंडीसारखा झुबका छदांच्या आवरणातून बाहेर लोंबत असतो. यालाच मक्याचे ‘रेशीम’ म्हणतात.
नर-फुलोऱ्याच्या कणिशकांच्या जोड्यांतील प्रत्येक कणिशकात दोन लहान फुले (पुष्पके, फुलोऱ्यातील एक फूल), दोन पुष्पी तुषे (तुष म्हणजे पातळ, परंतु कठीण उपांगासारखे आवरण), दोन बाह्यसहपत्रे, दोन अंत:स्तुषे व तळात दोन-दोन परिदलके असतात. प्रत्येक नर-फुलात तीन पुंकेसर असतात. नर-फुलोऱ्यातील परागकण वाऱ्यावर पसरत जाऊन अन्य कुक्षींवर पडतात आणि परपरागण घडून येते. मक्याची शुष्क दाणे छदकणिशावर तयार होतात.
0
Answer link
मक्याच्या पानाचा प्रकार 'समांतर शिराविन्यास' (Parallel Venation) आहे.
समांतर शिराविन्यास: या प्रकारात, पानांमधील शिरा एकमेकांना समांतर (parallel) असतात आणि त्या पानाच्या देठापासून टोकापर्यंत सरळ रेषेत जातात. मक्याच्या पानात हे स्पष्टपणे दिसून येते.
अधिक माहितीसाठी, तुम्ही विकिपीडिया (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE) किंवा इतर विश्वसनीय वनस्पतीशास्त्रावरील वेबसाइट्स पाहू शकता.