2 उत्तरे
2
answers
कापसापासून सरकी बाजूला करण्याचे यंत्र?
1
Answer link
. .
सरकी काढण्याची क्रिया : (जिनिंग). सरकी कारखान्यात आलेला कापूस प्रथम एका यंत्रामध्ये एका यंत्रामध्ये घालुन कापसाबरोबर आलेला कचरा हवेच्या झोकाने काढून टाकतात व नंतर तो सरकी काढण्याच्या यंत्रसत सोडतात. भारतामध्ये शेतातील कापसाची बोंडे हाताने तोडुन त्यातील कापूस पिशव्यांमध्ये किंवा पाट्यांमध्ये भरून नेतात व गाड्यांमध्ये भरतात. त्यात फारसा कचरा मिसळलेला नसतो. त्यामुळे तसा कापूस सरळ सरकी काढण्याच्या यंत्रात टाकता येतो. ज्या देशात मोठ्या शेतातील कापूस निर्यात यंत्राने गोळा करतात तेथील कापसात झाडाचा पाला,काड्या व इतर घाणही मिसळली जाते. असा कापूस प्रथम एका विशेष यंत्रात घालुन स्वच्छ करतात व नंतर तो सरकी काढण्याच्या यंत्रात टाकतात.
कापसातील कचरा काढण्यासाठी वापरीत असलेल्रूा यंत्राचा ण्क प्रकार आ. 1 मध्ये दाखविला आहे या यंत्रात कचरा मिश्रीत

आ. १. कापसातील कचरा काढण्याचे यंत्र
कापूस (1) या तोंडातुन आत टाकतात. तो कापूस नंतर (2), (3), (4), (5) इ. फिरणाऱ्या लाटण्यांवरून सरकविला जाऊन तो स्वच्छ होतो व (6) या मार्गाने बाहेर पडतो. या यंत्रामधील सर्व लाटण्यांच्या पोकळ अक्षातून वाऱ्याचा झोत आत येतो व लाटण्यांच्या गोल पृष्ठातून बाहेर जातो त्यामुळे पृष्ठावरच्या कापसातील कचरा कापसापासून वेगळा केला जातो. तो बाजूला पडून (7) या मार्गाने यंत्राच्या बाहेर जातो.
कचरा काढून स्वच्छ केलेल्या कापसातील सरकी काढण्यासाठी लाटणयंत्र किंवा चक्री करवत यंत्र वापता येते. लाटणयंत्रापासुन मिळणारे उत्पादन कमी असते, परंतु त्यामधुन निघालेल्या रूईचे धागे पूर्वीप्रमाणेच अखंड राहतात. चक्री करवत फार वेगाने चालणारी असते व त्यामधून निघालेल्या रूईचे बरेच धागे तुटलेले असतात परंतु एकंदरीने ते यंत्र फायद्याचे असल्याने अमेरिकेत आणि इतर बऱ्याच ठिकाणी त्याचा जास्त उपयोग करतात. भारतातही चक्री करवत यंत्राचा वापर वाढत आहे.

आ. 2 पायाने दाबून फिरवण्याचे लाटणे आणि पाटा : (1) कच्चा कापूस, (2) रूई, (3) मागे राहिलेली सरकी, (4) पायाने दाब देऊन फिरावयाचा रूळ, (5) लाकडी पाट.
भारतामध्ये कापसातील सरकी काढण्यासाठी हाताने फिरवावयाचे दोन लाकडी लाटण्याचे लहानसे यंत्र फार पूर्वीपासून प्रचारात आहे. त्याच धर्तीवर यांत्रिक लाटणयंत्राची रचना केलेली असते. काही लाटणयंत्रांत दोन लाटणी वापरतात व काही यंत्रांत एक लाटणे व दुसऱ्या लाटण्याऐवजी एक पोलादी पाते बसवितात. यंत्र चालु असताना पोलादी पाते आणि चामडे गुंडाळलेल्या लाटण्याचा पृष्टभाग यांमधील फटीतून रूईचे धागे पुढे ओढले जातात. या फटीमधून सरकी जाऊ शकत नाही. ती मागे राहते व आपल्या वजनाने खाली पडते.

आ. ३. चरखा लाटणयंत्र
चक्री करवत यंत्रात वरील प्रमाणेच एक पोलादी पाते असते व त्याच्या जवळच अनेक पोलादी चक्री करचती एका अक्षावर बसवलेल्या असतात व त्या यांत्रिक शक्तीने फिरतात. प्रत्येक चक्री करवतीचा थोडा भाग एका पष्यामधील फटीतून पोलादी पात्यापर्यंत जातो व फिरताना रूईचे धागे ओढून फटीतूनच परत येतो. करवतीच्या दातांत अडकून पुढे जाणारे रूईचे धागे वाऱ्याच्या झोताने करवतीपासून सुटतात व एका बाजूस पडतात. पात्याजवह अडकून राहणारी सरकी साठत जाऊन आपलया वजनाने खाली पडते व दुसऱ्या मार्गाने बाहेर जाते.
कपसातील सरकी नुसत्या हाताने किंवा पायानेही काढता येते व कित्येक ठिकाणी ही पद्धत अजूनही वापरात आहे. या पद्धतीने आठ तास काम केले तर एक किग्रॅ. कापसातील सरकी अलग काढता येते. यापेक्षा जलद काम होण्यासाठी थोडा थोडा कापूस एका पाटावर पसरतात व तयावर एक लाकडी रूळ दाबून लाटतात व कापसातून सरकी बाहेर काढतात. हे प्राथमिक स्वरूपाचे याधन आ. 2 मध्ये दाखविले आहे. यापेक्षाही जलद व सुबक काम देणारे चरखा लाटणयंत्र आ. 3 मध्ये दाखविले आहे. या यंत्राच्या एका बाजूने कापूस लाटण्याच्या मधल्या फटीवर एका हाताने दाबून धरतात. लाटणी फिरू लागली म्हणजे फटीतून रूईचे धागे ओढले जाऊन पुढे सरकतात.ते हातानेच एकत्र करतात. कापसातील सरकी लाटण्यामधील फटीतून पुढे जाऊ शकत नाही. ती आपल्या वजनानेच खाली पडते. या साध्या यंत्राने कापसातील सरकी काढण्यास बराच वेळ लागतो.

आ. ४. एका लाटण्याचे सरकी काढण्याचे यंत्र
यंत्रयुग सुरू झाल्यावर इंग्लंडमध्ये 1770-85 च्या दरम्यान कापसातील सरकी काढण्यासाठी कित्येक लोकांनी निरनिराळ्या पद्धतीची यंत्रे तयार केली. त्यानंतर 1897 साली मॉरीस, जॉन व विल्कीनसन यांनी एका लाटण्याचे यंत्र तयार केले. त्याची अंतर्गत रचना आ. 4 मध्ये दाखविली आहे.
भारतात बहुतेक ठिकाणी या जातीची यंत्रे बसवितात व ती कित्येक वर्षे चांगले समाधानकारक काम देतात. या यंत्रात (1) या भागातून कापूस खाली सरकतो व (2) या यांत्रिक शक्तीने फिरणाऱ्या लाटण्यावर जातो. या लाटण्याच्या जवळच (3) ही पोलादी पट्टी बसविलेली असते. ती थोडी पुढे मागे अशी हलत असल्यामुळे कापसातील सरकी लवकर सुटते. वरच्या बाजूने (4) हे पोलादी पाते लाटण्याला लागूनच बसविलेले असते. खालच्या (4) या पात्यामध्ये व लाटण्यामध्ये रूईचे धागे पुढे जाण्यासाठी थोडी फट असते, ती कमी जास्त करता येते. या फटीमधून लाटण्याने ओढलेली रूई पुढे जाते व (5) या भागात पडते. फटीतून सरकी पुढे जाऊ शकत नाही. ती साठत जाऊन (6) या भागात पडते.

आ. ५. सरकी काढण्याचे चक्री करवत यंत्र
आ.5 मध्ये दाखविलेल्या चक्री करवत यंत्रात (1) या मार्गाने कापूस आत टाकतात. तेथून तो कापूस वाऱ्याच्या झोताने (2) या भागात जातो. तेथे कापसातील कचरा सुटा होऊन खाली पडतो व स्व्च्छ कापसाचे गोळे (3) या भागातून पुढे जाऊन (4) या करवतीवर जातात. या यंत्रात एका फिरणाऱ्या दंडावर अंतराअंतराने बसवलेली पातळ पोलादी पष्याची अनेक करवती चक्रे असतात. त्यापैकी (5) हे एकच चक्र वरील आकृतीत दिसत आहे. ही चक्रे फिरू लागली म्हणजे रूईचे धागे करवतीच्या दातांत अडकून ओढले जातात. हे धागे वाऱ्याच्या झोताने करवतीच्या दातांतून युटे होतात व खाली पडून (6) या मार्गाने यंत्राच्या बाहेर जातात. कापसातील सरकी करवतीच्या फटीतून पुढे जाऊ शकत नाही. ती मागे पडून (7) या मार्गाने यंत्राच्या बाहेर येते.
0
Answer link
कापसापासून सरकी बाजूला करण्याचे यंत्र म्हणजे जिनिंग मशीन (Ginning Machine). या यंत्राद्वारे कापूस आणि सरकी वेगळी केली जाते.
जिनिंग मशीनची कार्यप्रणाली:
- यांत्रिक पद्धतीने कापूस पिंजून सरकी वेगळी केली जाते.
- वेगवेगळ्या प्रकारच्या जिनिंग मशीन उपलब्ध आहेत, जसे की रोलर जिन (Roller Gin) आणि सॉ जिन (Saw Gin).
अधिक माहितीसाठी:
टीप: ही माहिती केवळ आपल्या ज्ञानासाठी आहे. अधिक माहितीसाठी आपण तज्ञांचा सल्ला घ्यावा.