3 उत्तरे
3
answers
पत्र लेखन अनौपचारिक आहे का?
0
Answer link
अनौपचारिक पत्र म्हणजे काय?
अनौपचारिक पत्र हा पत्र लेखनाचा एक उपप्रकार आहे. अनौपचारिक पत्र आपण आपल्या कुटुंबियांना, मित्र मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना लिहीत असतो. या पत्रातून आपण आपल्या भावभावना, खुशाली दुसर्यांपर्यंत पोहोचवत असतो. अनौपचारिक पत्राचे काही नमुने / उदाहरणे पुढे पाहुयात.
अनौपचारिक पत्र कसे लिहावे?
अनौपचारिक पत्र लिहिण्याचे विशिष्ट असे नियम संकेत नाहीत.
उजवीकडच्या कोपऱ्यात दिनांक, वार, गावाचे नाव लिहावे.
मध्यभागी ओम / श्री असेही लिहावे.
डावीकडे प्रिय, तीर्थरूप, आदरणीय इ. योग्य भावना लिहून पुढे व्यक्तीचे नाव लिहून पत्र लेखनाला सुरुवात करवी.
शेवटी व्यक्तीनुरूप नमस्कार, आशीर्वाद लिहून तुझा/तुझी/तुमचा इ. लिहून समारोप करावा.
पत्रातील भाषा संवाद केल्यासारखी, गप्पा मारल्यासारखी, साधी, सोपी, मनमोकळी असावी.
पत्रातील भाषा वर्णनात्मक, खेळकर, दिलखुलास आपलेपणाची असावी.
पत्रातील भाषा प्रेमळ असावी.
अनौपचारिक पत्राचे नमुने उदाहरण
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या शिबिरात सहभागी झालेला मुलगा आपल्या वडिलांना आपले अनुभव कळवत आहे असे पत्र लिहा.
उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे राहण्यास गेलेल्या मुलीचे आपल्या आईला पत्र.
सपना पळसकर,
मु. पाथर्डी,
ता. गाणगापूर,
जि. छत्रपती संभाजीनगर,
दिनांक – 20/05/2023
प्रिय आईस,
साष्टांग नमस्कार,
आई तु माझ्यावर खूप रागावली असशील, कारण मी मामाकडे येऊन पंधरा दिवस झाले. तरी तुला पत्र लिहिले नाही. पण मी तुला खात्रीने सांगते की, मी इथे खूप आनंदात आहे. माझी काळजी करू नकोस. मी इथे चांडोळ पक्षाप्रमाणे मुक्त फिरत असते. आम्ही रोज नदीवर पोहायला जातो. आम्ही कॅरम, लपाछपी, लंगडी इत्यादी खेळ रोज खेळतो. रोज वाचन देखील करतो.
इथे मी आनंदात आहे. पण मला घराची, माझ्या मैत्रिणींची, बाबांची आणि छोट्या सोणुची खूप आठवण येते.
सर्वांना मी आठवण केली म्हणून सांग. मी पुढच्या आठवड्यात मामासोबत परत येणार आहे.
तुझी प्रिय मुलगी,
सपना पळसकर.
0
Answer link
पत्र लेखन दोन प्रकारचे असते:
- औपचारिक पत्र (Formal Letter): हे पत्र व्यावसायिक किंवा शासकीय कामासाठी लिहिले जाते. यात विशिष्ट नियमांचे पालन करावे लागते.
- अनौपचारिक पत्र (Informal Letter): हे पत्र कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा नातेवाईकांना लिहिले जाते. यात भाषेची जास्त औपचारिकता नसते.
म्हणून, पत्र लेखन अनौपचारिक असू शकते, जेव्हा ते कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा नातेवाईकांना लिहिले जाते.