2 उत्तरे
2
answers
लेखन म्हणजे काय?
0
Answer link
लेखन ..लिहिणे..मनातील ओठांवर.. ओठांवरील लेखनीद्वारे सादर करण्यात आपले मन मेंदू मनगट मजबूत हवे .आणि ते विवेकी विचार ठेवून, अंतर्मुख होऊन, जी स्वच्छ निर्मल मांडणी करावी लागते.यासाठी सूत्रबद्ध पद्धतीने शिस्तबद्ध रीतीने कागदावर लिहून काढणे ..याला लेखन म्हणणे संयुक्तिक आहे.
मानव मी मानवासारिखा इतरां जैसा देह मला ज्ञानांजन घालून गुरूने ज्ञानदान दिधले मजला...मग हे ज्ञान अज्ञान दूर करण्यासाठी स्थिर विश्वासाची भावना हवी आणि विचार प्रगल्भ असावेत..लेखन ही शुद्ध सात्विक मनाची एकाग्रतेने उमटलेली भक्कम विचारांची शिदोरी आहे, ती समाजमनाला दिशा प्रकाश देते ... यासाठी समर्पित भावनेने लेखन सेवा दर्जेदार उत्कृष्ट नमुना बनते.
वास्तव यथार्थ वर्णन करून सहजतेने विशालतेकडे झेपावत जाते.ज्यांच मन मोकळं खुलं निर्मळ त्याची नोंद शुद्ध सात्विक मनाची बक्षीस आहे.त्यामुळे मनाला नम्रता एकत्व सत्य अबाधित राखावे लागते.
आपलं मन सुदर तर लेखन सुंदर ..आणि म्हणूनच आविष्कार प्रकटीकरणाचे माध्यम लेखन सेवा आहे.
धन्यवाद जी.
0
Answer link
लेखन म्हणजे भाषा वापरून अक्षरे, चिन्हे किंवा इतर प्रतीकांच्या माध्यमातून माहिती, विचार, भावना किंवा कल्पना व्यक्त करण्याची प्रक्रिया आहे.
लेखनाचे काही मुख्य प्रकार:
- निबंध लेखन: एखाद्या विषयावर विस्तृत आणि सखोल माहिती देणे.
- कथा लेखन: काल्पनिक किंवा वास्तविक घटनांवर आधारित कथा तयार करणे.
- पत्र लेखन: व्यक्तिगत किंवा व्यावसायिक कारणांसाठी पत्र लिहिणे.
- कविता लेखन: भावना आणि कल्पनांना काव्यात्मक रूपात व्यक्त करणे.
- वृत्त लेखन: बातम्या आणि घटनांची माहिती देणे.
लेखन हे संप्रेषणाचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. यामुळे ज्ञान आणि माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करता येते.