शिक्षण प्रक्रिया शिक्षणशास्त्र

ज्ञानरचनावादी पद्धतीमधील अध्ययन ही प्रक्रिया आहे?

2 उत्तरे
2 answers

ज्ञानरचनावादी पद्धतीमधील अध्ययन ही प्रक्रिया आहे?

0


 

(१) ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धतीमधील अध्ययन ही सक्रीय प्रक्रिया असून विद्यार्थी स्वत: अध्ययन करतात. म्हणजेच ज्ञानाची निर्मिती हे स्थिर नसून गतिशिल आहे.
(२) ज्ञानरचनावादी शिक्षणात पूर्वज्ञान आणि पूर्वानुभव यांच्या आधारे विद्यार्थी स्वत: आपल्या ज्ञानाची रचना करून अध्ययन करीत असतो.
(३) विद्यार्थी स्वत:हून आपल्या संकल्पनेची मांडणी करीत असतो. ही प्रक्रिया सतत करून त्याच संकल्पनेत नवीन भर घालून तिची पुनरमांडणी तरीत असतो.
(४) सामाजिक, भाषिक व सांस्कृतिक या आंतरक्रीयेमुळे विद्यार्थ्यांना ज्ञानाची निर्मिती करण्यास फायदा होतो.
(५) ज्ञानाची निर्मिती होत असताना स्थानिक वातावरण व परिस्थिती यांचा त्यामध्ये मोठा वाटा असतो.
ज्ञानरचनावादी विचारसरणी :

(१) ही विचारसरणी मुलांच्या शिक्षणावर भर देते. त्यामुळे शिक्षकांची वाटचाल ‘शिकविण्याकडून शिकण्याकडे’ होण्यास मदत होते.
(२) मुलांचे अध्ययन पूर्णाकडून भागाकडे या अध्ययन सूत्रानुसार घडते.
(३) ही विचारसरणी शिकणाऱ्या मुलामुलींविषयी शास्त्रीय माहिती सांगते.
(४) प्रत्येक मुलामुलींच्या पातळीवर घडणारी शिकण्याची प्रक्रिया कशी भिन्न असते, याचे ज्ञान आपल्याला देते.
(५) व्यवहाराशी जुळवून घेऊन मुलांना शिक्षण कसे द्यावे, याचे मार्गदर्शन याद्वारे होते.
(६) ही विचारसरणी आपल्याला पुस्तकी अभ्यासाकडून वास्तव अनुभवाकडे वळण्याचा दृष्टिकोन बहाल करते.
(७) ज्ञानरचनावादाचे महत्त्वाचे ध्येय म्हणजे वास्तव जगाशी निगडित अध्ययनातून समाजाची निर्मिती करणे हे आहे.
अधिक व्यक्तिनिष्ठ असणे, वेळखाऊ व खर्चिक असणे, मुलांकडे यशस्वी होण्यासाठी उच्च प्रतीची स्वव्यवस्थापनक्षमता असलीच पाहिजे, जी प्रत्येक मुलाकडे असतेच असे नाही. अशा प्रकारचे आक्षेप काहिंनी घेतले असले, तरी याची उपयुक्तता अधिक असल्याचे दिसून येते.


उत्तर लिहिले · 9/8/2023
कर्म · 53700
0

ज्ञानरचनावादी पद्धतीमध्ये अध्ययन ही एक सक्रिय आणि अर्थपूर्ण प्रक्रिया आहे.

यामध्ये विद्यार्थी:
  • स्वतःच्या अनुभवांवर आधारित ज्ञान तयार करतात.
  • माहितीचे विश्लेषण करतात आणि त्यातून निष्कर्ष काढतात.
  • समस्येचे निराकरण करण्यासाठी विविध उपाय शोधतात.
  • नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी सक्रियपणे सहभागी होतात.

ज्ञानरचनावादी शिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानात भर घालण्यास आणि ते अधिक प्रभावीपणे वापरण्यास मदत करते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

ज्ञानरचनावादाचा अर्थ, स्वरूप व महत्त्व (मराठी)
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

औपचारिक शिक्षण म्हणजे काय?
मुक्त शाळा शिक्षणशास्त्र काय आहे?
शिक्षणातील गुणात्मक आणि संख्यात्मक पैलू काय आहेत?
पर्यावरण संवर्धनासाठी शिक्षकांनी कोणती कार्ये करायला हवी?
कुमारवयीन मुलामुलींमधील भावनिक बदलांवर चर्चा करा आणि बहुस्तरीय अध्यापन प्रक्रियेबद्दल आपले विचार सांगा.
दोन अंकी संख्यांचा गुणाकार या घटकाची ब्लेंडेड मॉडेल प्रणालीचा उपयोजनात्मक वापर कसा कराल?
शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी DIET व NCERT ची भूमिका व कार्ये काय आहेत?