मधुमेह आरोग्य

इन्सुलिन म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

इन्सुलिन म्हणजे काय?

1
इन्सुलिन म्हणजे काय

इन्सुलिनचं कार्य
आपल्या शरीरात चालणाबरं इन्सुलिनचं कार्य ज्याला समजलं त्याला मधुमेहाविषयी अर्ध्याहून अधिक ज्ञान प्राप्त झालं असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये इतकं महत्व या जादुई पदार्थाला आहे. आपल्या शरीरात अनेक गोष्टींना योग्य त्या प्रमाणात राखण्यासाठी निसर्गाच्या अनेक स्वचलित यंत्रणा सदैव २४ तास कार्यरत असतात. उदा. शरीराचे तापमान, रक्तदाब, वगैरे असंख्य गोष्टींना योग्य त्या प्रमाणात ठेवण्यासाठी अनेक संप्रेरके किंवा हॉर्मोन्स सक्रीय असतात. रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मुख्यतः दोन संप्रेरके किंवा हॉर्मोन्स कार्यरत असतात:
इन्सुलिन रक्तशर्करा कमी करतं तर ग्लुकॅगाॅन ती वाढवतं. रक्तशर्करा वाढली की स्वादुपिंडातून इन्सुलिन स्त्रवतं आणि ते शरीरभर विविध पेशींचे दरवाजे साखरेला आत शिरण्यासाठी उघडण्याचं काम करतं, त्यामुळे रक्तातली साखर पेशींमध्ये घुसते, आणि रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेली साखर कमी होते. पेशींचे दरवाजे उघडण्याचं काम फक्त इन्सुलिनमुळेच शक्य होतं. (याच कारणामुळे इन्सुलिन नसेल तर साखर पेशींमध्ये न शिरता रक्तातच राहते, त्यामुळे तिची रक्तातली पातळी वाढते, मधुमेहात हीच अवस्था येते). आता याउलट काही कारणाने रक्तशर्करा कमी झाली की स्वादुपिंडातून ग्लुकॅगाॅन स्त्रवतं आणि त्यामुळे कमी झालेली साखर वाढून योग्य पातळीला येते. अर्थात हे सर्व निरोगी व्यक्तीच्या बाबतीत होतं. मधुमेही व्यक्तींच्या बाबतीत इन्सुलिनचं प्रमाण कमी असतं आणि तेही कमी परिणामकारक असतं. परिणामी साखर सतत वाढलेल्या पातळीवर राहते. बाहेरून इन्सुलिनचे इंजेक्शन देऊन ही वाढलेली साखर कमी करता येऊ शकते, पण, मधुमेहाची सुरुवात झालेली असते तेव्हा अनेक वर्षेपर्यंत बाहेरून इन्सुलिनचे इंजेक्शन न घेता आहार-नियंत्रण, व्यायाम आणि औषधांच्या सहाय्याने रक्तातली साखर आटोक्यात ठेवता येते. जेव्हा या तीन गोष्टींनी ती आटोक्यात येत नाही, तेव्हा मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने बाहेरून इन्सुलिनचे इंजेक्शन घेतल्यानेच रक्तातली साखर आटोक्यात येते.
इन्सुलिनचा यकृतावर असलेला प्रभाव
इन्सुलिन हे रक्तातली साखर कमी करण्याचं महत्वाचं काम करतंच पण त्याचबरोबर ते यकृतामध्ये तयार होणाऱ्या साखरेचं प्रमाणही कमी करतं. आपण जेव्हा जेवत खात नसतो, तेव्हा शरीराला लागणारी साखर यकृत तयार करून रक्तात पाठवतं. पण ही साखर जेव्हा मर्यादेबाहेर वाढते, तेव्हा, इन्सुलिन यकृताला साखर तयार करायला अटकाव करतं! मधुमेही व्यक्तीमध्ये इन्सुलिन कमी प्रमाणात किंवा कमी प्रभावी असल्यामुळे किंवा प्रकार १ मध्ये अजिबात नसल्यामुळे, यकृतातला साखर कारखाना सुरूच असतो. इन्सुलिन इंजेक्शनमुळे या साखरेचं उत्पादन कमी केलं जातं.
इन्सुलिनचा चरबी साठवणाऱ्या पेशींवर असलेला प्रभाव
उर्जेच्या वापरासाठी शरीर ग्लुकोज साखर आणि चरबीचा वापर करतं. इन्सुलिन चरबीच्या पेशींमधली चरबी बाहेर काढून रक्तात आणण्याच्या कार्याला विरोध करतं, त्यामुळे ती पेशींमध्येच साठून राहते. आणि रक्तातल्या ग्लुकोजची चरबीच्या पेशींमध्ये चरबीच्या रुपात साठवणूक करायला मदत करतं. यामुळेच इन्सुलिन इंजेक्शनचं प्रमाण वाढलं की अतिरिक्त भूक लागून जास्त खाल्लं जातं आणि वजन (चरबीच्या रूपाने) वाढतं! म्हणून इन्सुलिन योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे.

इन्सुलिनची रासायनिक रचना
इन्सुलिन हा एक प्रथिन पदार्थ असून तो अ‍ॅमिनो अम्‍लांच्या दोन शृंखलांचा मिळून बनलेला आहे. A शृंखलेमध्ये २१ अ‍ॅमिनो अम्‍ले असून B शृंखलेमध्ये ३० अ‍ॅमिनो अम्‍ले असतात. नेहमीच्या अ‍ॅमिनो अम्‍लांपैकी मिथिओनाइन, ट्रिप्टोफॅन, हायड्रॉक्सिप्रोलीन ही अ‍ॅमिनो अम्‍ले मात्र इन्सुलिनच्या रेणूमध्ये नसतात. या दोन शृंखला दोन ठिकाणी एकमेकीस जोडलेल्या असून हे जोड दोन गंधक अणूंच्या —S—S— या दुव्याने जोडलेले असतात. इन्सुलिनचा रेणूभार (molecular weight = 5734) ५७३४ असतो.
इन्सुलिनचा शोध
इन्सुलिनचा शोध लागण्यापूर्वी म्हणजेच इ. स. १९२१ च्या आधी मधुमेही रुग्ण फार काळ जगत नसत. आणि त्यावेळी फारशी औषधेही नव्हती. डॉक्टर्स फार काही करू शकत नसायचे. पाश्चात्य देशांत त्या काळची सर्वात परिणामकारक उपाययोजना म्हणजे रुग्णाला अतिशय कमी कर्बोदकांचा आणि कमी कॅलरीज असलेला आहार दिला जायचा. यामुळे रुग्ण फक्त काही वर्षे किंवा महिने जास्त जगायचा, पण अकाली मरण हे ठरलेलेच असायचे! भारतातही काही फारसे वेगळे चित्र नव्हते. मेथ्या, जांभूळ, दालचिनी, कारले वगैरे गोष्टींचा औषधासारखा उपयोग केला जायचा! (दुर्दैवाने तो अजूनही केला जातो! एवढे प्रचंड ज्ञान, एवढी औषधे, इन्सुलिन असे सर्व उपलब्ध असूनही अज्ञान आणि भीतीमुळेहे केले जाते.) इन्सुलिन हा खरोखरच एक अद्भुत असा जैविक पदार्थ असून तो शरीरातच तयार होतो

उत्तर लिहिले · 4/3/2023
कर्म · 53715
0

इन्सुलिन (Insulin) म्हणजे काय:

इन्सुलिन हे स्वादुपिंडात तयार होणारे एक संप्रेरक (hormone) आहे. रक्तातील साखरेची पातळी (blood sugar level) नियंत्रित ठेवण्याचे काम इन्सुलिन करते.

इन्सुलिनचे कार्य:

  • इन्सुलिन रक्तातील ग्लूकोजला (glucose) पेशींमध्ये (cells) पाठवते, जिथे त्याचा ऊर्जा (energy) निर्मितीसाठी वापर केला जातो.
  • जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते, तेव्हा इन्सुलिन स्वादुपिंडाला अधिक इन्सुलिन तयार करण्यास उत्तेजित करते.
  • इन्सुलिन यकृतामध्ये (liver) ग्लूकोज साठवण्यास मदत करते, जे आवश्यकतेनुसार नंतर वापरले जाते.

इन्सुलिनची कमतरता:

जेव्हा शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही, तेव्हा मधुमेह (diabetes) होतो. मधुमेहामध्ये, रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

इन्सुलिनचे प्रकार:

  • लवकरAction घेणारे इन्सुलिन: हे इन्सुलिन इंजेक्शन घेतल्यानंतर 15 मिनिटांत कार्य करण्यास सुरवात करते आणि त्याचा प्रभाव 2-4 तास टिकतो.
  • मध्यम गतीचे इन्सुलिन: हे इन्सुलिन इंजेक्शन घेतल्यानंतर 2-4 तासांनी कार्य करण्यास सुरवात करते आणि त्याचा प्रभाव 12-18 तास टिकतो.
  • दीर्घकाळ टिकणारे इन्सुलिन: हे इन्सुलिन इंजेक्शन घेतल्यानंतर काही तासांनी कार्य करण्यास सुरवात करते आणि त्याचा प्रभाव 24 तास किंवा त्याहून अधिक काळ टिकतो.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

शरीरातील साखर वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात?
माझे वडील ६१ वर्षांचे आहेत, त्यांना शुगर आहे. परंतु काही दिवसांपासून त्यांना अचानक घबराट आणि चक्कर येते आणि नेहमी छातीत दुखते, ब्लॉकेज नाही. यावर उपाय सुचवावा?
शुगर कंट्रोलमध्ये आल्यावर शुगरच्या गोळ्या सुरू ठेवायला पाहिजे का?
मधुमेही रोग्यांनी भात खाणे योग्य आहे का?
लठ्ठपणा आणि मधुमेह बाबत व्याख्यान?
बालमधुमेह (type 1 diabetes) यावर उपचार आहेत का? सध्या लहान मुलांमध्ये बाल मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे.
इन्सुलिन आणि ग्लुकागॉनची पातळी नियंत्रित करते?