संत संत साहित्य इतिहास

संताजी महाराजांनी कोणत्या संतांचे अभंग लिहून काढले?

2 उत्तरे
2 answers

संताजी महाराजांनी कोणत्या संतांचे अभंग लिहून काढले?

0
संताजी महाराजांनी तुकाराम महाराजांचे अभंग लिहून काढले.
गुरुभेट

त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनांच्या आणि अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून संताजींवर तुकारामांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा तुकारामांनी संताजीना समजावून सांगितले, की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. आणि तेव्हापासून संताजी जगनाडे महाराज (संतू तेली ) हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली.

गाथांचे पुनर्लेखन

संत तुकाराम महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता, ते त्या काळातील काही लोकांना सहन होत नव्हता. कारण त्यामुळे त्यांच्या व्यवसाय कमी होत होता. त्यांनी तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून काढले.
उत्तर लिहिले · 17/2/2023
कर्म · 53720
0

संताजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग लिहून काढले.


अधिक माहिती:

  • संताजी महाराज हे संत तुकाराम महाराजांचे शिष्य होते.
  • ते त्यांच्यासोबत नेहमी असत आणि त्यांनी अनेक अभंग स्वतःच्या अक्षरात उतरवून घेतले.
  • संताजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या कार्याला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीतून गृहस्थाश्रमातील नीती व तत्त्व, मूल्यदृष्टी, जीवन यांविषयी माहिती द्या?
संत ज्ञानेश्वराचे सांस्कृतिक कार्य विशद करा?
मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत तुकाराम विठ्ठल आहेत का?
संत रामदास यांच्या वाङ्मय कार्याचा आढावा द्या?
संत रामदास यांच्या वाङ्मयीन कामगिरीचा आढावा घ्या.
संत रामदास यांच्या वाड्मयीन कामगिरीचा आढावा घ्या?
मनाचे श्लोक ही रचना कोणी केली?