2 उत्तरे
2
answers
स्वतःच्या मनाने औषध घेण्याचे काय परिणाम होतात?
0
Answer link
स्वतःच्या मनाने औषध घेण्याचे काय परिणाम होतात
अनेकदा आपणही डॉक्टरांना न विचारता स्वतःच औषधं घेत असतो. पण ही सवय योग्य नाही. ते का

वेदनाशामक औषधे
औषधाच्या दुकानात ज्याला सगळ्यात जास्त मागणी असणारी औषधं कोणती तर ही वेदनाशामक औषधं म्हणजेच पेन किलर. डॉक्टरांच्या सल्ला विचारात न घेताच या गोळ्या मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात. या गोळ्या घेण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीचीही दुकानदार विचारपूस करत नाहीत म्हणून सतर्क रहायला हवं. डोकेदुखीसाठीही सतत या गोळ्या घेत राहू नये. सगळ्यात जास्त प्रसिद्ध वेदनाशामक औषध आहे, ते म्हणजे पॅरासिटामॉल. याच्या अतिसेवनाने अनेक दुष्परिणाम होतात.
●पॅरॅसिटॅमोलमधील वेदनाशमन करणाऱ्या घटकामुळे झोप, मरगळ येते. म्हणूनच ही गोळी किती प्रमाणात घ्यायची हे स्वतः ठरवू नका.
●पॅरॅसिटॅमोलच्या गोळ्या सतत घेतल्यास गॅस्ट्रायटीस म्हणजे जठराला सूज येऊ शकते. म्हणजेच पचनक्रियेत बिघाड होण्याचीही शक्यता असते.
●काही जणांना पॅरॅसिटॅमोल वरचेवर घेतल्यामुळे हायपरसेन्सिटीव्हीटीचा त्रास होऊ शकतो. यामुळे त्वचेवर अॅलर्जी येऊ शकते.
● अतिप्रमाणात याचे सेवन केल्यामुळे यकृतावर याचा विपरीत परिणाम होतो. याबद्दल पाकीटाच्या मागे लिहलेलं सुद्धा असतं. म्हणून डॉक्टरांनी सल्ला दिल्याशिवाय ही गोळी बिलकुल घेऊ नका.
अॅन्टीबायोटिक्स -
सर्दी, खोकला यासारखे वरचेवर होणारे आजार बरे करण्यासाठी प्रतिजैविके म्हणजेच अॅन्टीबायोटिक्स घेतली जातात. ही औषधे जंतू संसर्गामुळे होणारे आजार बरे करण्यासाठी घेतली जातात. इथं जंतू म्हणजे जीवाणू किंवा बॅक्टेरियामुळे होणारे आजार असं अपेक्षित आहे. यासाठीही डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो. सर्दी-खोकला यासारखे आजार विषाणूंमुळे होतात. विषाणूंवर जीवाणूविरोधी औषधे उपयोगी येणार नाहीत. याप्रकारची औषधे जी आपण घेत असू ती दुसऱ्या कोणाला देऊ नयेत. अशी औषधे दुध पितानाही घेऊ नका.
बद्धकोष्ठता
बद्धकोष्ठता हा पचनसंस्थेचा आजार बऱ्याच लोकांना होणारा आहे. शौच कठीण होऊन सहजगत्या उत्सर्जित होण्यास अडचण येणे म्हणजे बद्धकोष्ठता. हा त्रास आपल्याला साधारण वाटू शकतो. म्हणून आपणच स्वतःच्या मनानेच औषधे घेत राहतो. पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. यावर उपचार करण्यासाठी घेतली जाणारी औषधे ही लॅक्झॅटिव्ह म्हणून ओळखली जातात. ही औषधे बाकी औषधांबरोबरही घेऊ नयेत, कारण त्यांचं मिश्रण वेगळाच परिणाम करण्याची शक्यता असते. मूत्रपिंडाचे विकार, हृदयविकार यांवर औषधे चालू असणाऱ्यांनी डॉक्टरांना विचारूनच ही औषधे घ्यावीत.
म्हणून आपण औषधं जरी तब्येत बरी व्हावी म्हणून घेत असलो तरी त्याची योग्य मात्रा, गरज आणि परिणाम याविषयी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. नाहीतर तात्पुरता आराम मिळवण्याच्या नादात आपण एखादा मोठा दुर्धर आजार मागे लावून घेऊ. हा लेख शक्य होईल तितक्या अधिक लोकांपर्यंत पोहोचवा आणि स्वतःची व तुमच्या जवळच्या लोकांची काळजी घ्या.
0
Answer link
स्वतःच्या मनाने औषध घेण्याचे अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. काही सामान्य परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
- चुकीचा औषधोपचार: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेतल्यास, ते औषध तुमच्या लक्षणांसाठी योग्य नसेल.
- दुष्परिणाम: प्रत्येक औषधाचे काही दुष्परिणाम असतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेतल्यास, तुम्हाला त्या दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो.
- ॲलर्जी: काही लोकांना विशिष्ट औषधांची ॲलर्जी असते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेतल्यास, तुम्हाला ॲलर्जीचा धोका असू शकतो.
- औषधांचा परस्परसंबंध: तुम्ही घेत असलेल्या इतर औषधांशी या औषधाचा नकारात्मक संबंध येऊ शकतो.
- आजाराचे निदान करण्यात अडथळा: स्वतःच्या मनाने औषध घेतल्यास, डॉक्टरांना तुमच्या आजाराचे योग्य निदान करणे कठीण होऊ शकते.
- गंभीर गुंतागुंत: काहीवेळा, स्वतःच्या मनाने औषध घेतल्याने गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते, ज्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची किंवा मृत्यूची शक्यता वाढते.
म्हणून, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेणे टाळा.
अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: