औषधोपचार आरोग्य

Cervical spondylitis मुळे होणारा दुखण्याचा त्रास नेहमीच्या पेन किलरने थांबत नाही. त्यासाठी कोणती पेन किलर वापरावी?

2 उत्तरे
2 answers

Cervical spondylitis मुळे होणारा दुखण्याचा त्रास नेहमीच्या पेन किलरने थांबत नाही. त्यासाठी कोणती पेन किलर वापरावी?

0
सर्व्हायकल स्पाॅन्डॅलिटिसमुळे होणाऱ्या दुखण्याचा त्रास नेहमीच्या पेन किलर ने थांबत नाही तर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.पण अशा दुखण्यावर पेन किलर मेडिकल मध्ये मिळतात.पण ते पेन किलर तुम्हाला तात्पुरता आराम देईल. त्या ऐवजी घरगुती उपाय करावेत.सर्व्हायकल स्पाँडिलिसिसची उपचार

औषधोपचार-वेदनाशामक औषधांनी तात्पुरते बरे वाटते.परंतु नंतर पुन्हा त्रास सुरू होतो.
कॉलर बेल्ट
व्यायाम
 मसाज 
आयुर्वेदिक औषधे
पंचकर्म-नस्यकर्म-नाकात विशिष्ट पद्धतीने औषधी द्रव्य सोडण्याची पद्धत.,मन्याबस्ती-मानेवर औषधीद्रव्यांचे पाळे तयार करून त्यात औषधीयुक्त तेल सोडतात.
सर्व्हायकल स्पाँडिलिसिसमध्ये काय काळजी घ्याल

डोक्याखाली जाड उशी घेऊ नये,
अधिक प्रवास,
ओझे उचलणे टाळावे.
योगा किंवा व्यायामास सुरुवात करावी .
कॉम्प्युटरवर काम करणाऱ्यांनी ठरावीक वेळेनंतर मानेच्या हालचाली कराव्यात.
आहारात कॅल्शियम व फॉलकि अ‍ॅसिडयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
मान जास्तवेळ पुढच्या किंवा एका विशिष्ट कोनात झुकवून कामे करणे टाळावे.
व्यायाम प्रकार 

हलासन,धनुर्वासन,चक्रासन,मत्स्यासन,भुजंगासन,नौकासन,उत्तरासन,उशत्रासान इ.



सर्व्हायकल स्पॉन्डेलिसीसच्या दुखण्यावर '5' घरगुती रामबाण उपाय
मानेचे दुखणे कमी करतील हे नैसर्गिक आणि घरगुती उपाय


सर्व्हायकल स्पॉन्डॅलिसिसचा त्रास हा मानेजवळील सांध्यांमध्ये बिघाड झाल्यास वाढतात. वयोमानानुसार हा त्रास उतारवयात आढळतो. पण त्यासोबतच चूकीच्या स्थितीत खूप वेळ बसणे, मानेजवळ इजा होणे, मानेवर ताण येणे अशा काही गोष्टींमुळे मानेचे दुखणे आणि सर्व्हायकल स्पॉन्डॅलिसिस वाढू शकते. सौम्य स्वरूपातील हे दुखणे काही घरगुती उपायांनी आटोक्यात ठेवणे शक्य आहे.


गाईचे तूप - आयुर्वेदानुसार गाईचे तूप हे अनेक अनेक आजारांना दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. गाईचे तूप सांध्यांमधील नैसर्गिक वंगण आहे. शरीरात वाताचे प्रमाण वाढल्यास स्पॉन्डॅलिसिसचा त्रासही वाढतो. मात्र तूपामुळे हे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.


कोल्ड / हॉट पॅक - सर्व्हायकल स्पॉन्डॅलिसिसच्या त्रासामध्ये मानेजवळचया सांध्यामध्ये वेदना आणि सूज वाढते. तेथील स्नायू आखडतात. त्यांना मोकळे करण्यासाठी गरम किंवा थंड पाण्याने शेकवावे. यामुळे स्नायू मोकळे होण्यास मदत होते.




आहाराचे पथ्य - शरीरात वात दोष वाढवणारे पदार्थ जसे की, मैदा, डाळी, तेलकट, खारट, आंबट पदार्थ खाणे नियंत्रणात ठेवा. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी फायबरयुक्त भाज्यांचा आहारात समावेश करा.


हळद, मेथी, अश्वगंधा, यांसारख्या औषधी आणि दाहशामक वनस्पतींचे सेवन करा. मात्र वैद्यकीय सल्ल्यानेच त्याचा आहारात समावेश करावा. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होईल.


योगासनं - ताडासन, पद्मासन यासारखी योगासनं स्पॉन्डेलिसिसचा त्रास कमी करण्यास मदत करतात. मानेचे व्यायाम करूनही तेथील स्नायू मोकळे होण्यास मदत होते.


उत्तर लिहिले · 9/6/2022
कर्म · 53715
0
मला माफ करा, मी तुम्हाला याबद्दल मदत करू शकत नाही. वैद्यकीय सल्ला देणे माझ्या क्षमतेच्या बाहेर आहे. योग्य निदानासाठी आणि उपचारांसाठी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते तुमच्या वैद्यकीय इतिहासाचे मूल्यांकन करू शकतील आणि योग्य औषधोपचार ठरवू शकतील.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

इलायचीचे फायदे काय?
इलायचीचे फायदे काय आहेत?
शिर्डीमध्ये मोफत उपचार केले जातात का, काही माहिती मिळणार का?
कुत्रा चावल्यावर काय खावे?
शरीरातील साखर वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात?
ब्रह्मचर्य पालन केल्यास किती दिवसात फरक दिसतो व कशाप्रकारे हालचाली दिसतात?
मन शांत कसे करायचं?