राजकारण भारत राजकीय गट

भारतातील दबाव गटांचे स्वरूप स्पष्ट करा?

2 उत्तरे
2 answers

भारतातील दबाव गटांचे स्वरूप स्पष्ट करा?

0
केंद्रसरकारवर दबाव टाकून उद्योगस्नेही धोरण स्वीकारावे यासाठी आग्रही असते तर कामगार संघटना कामगार हिताचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील असतात.

विशिष्ट कारणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या दबाव गटांचा हेतू मुख्यत: आर्थिक हितसंबंध साधने हा नसून ते धार्मिक किंवा विशिष्ट कारणांसाठी लढणाऱ्या गटांपेक्षा व्यापक असतात. सार्वजनिक हितासाठी लढणारे गट हे व्यापक जनहिताच्या रक्षणासाठी काम करतात. मानवी हक्कांसाठी लढणारे, पर्यावरणाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या संघटना या प्रकारच्या दबाव गटामध्ये समाविष्ट होतात. भारतातील Peoples Union for Civil Liberties आणि Association For Protection of Democratic Rights (APDR) या संघटना मानवी हक्कांच्या रक्षणासाठी काम करतात. टेरी (TERI,The Energy and Resources Institutes) ही संस्था पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे.

सार्वजनिक आणि खाजगी संस्थांचे हितसंबंध पाहणारे दबाव गट हे देखील शासनाच्या धोरणावर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरतात. या गटातील सदस्य हे नियमित सदस्य नसतात; परंतु विशिष्ट हितसंबंधासाठी ते कार्यरत असतात. खाजगी उद्योगसमूह किंवा शासकीय कार्यालये ही या प्रकारच्या दबाव गटामध्ये मोडतात. खाजगी संस्थामध्ये विविध खाजगी विद्यापीठे, प्रसारमाध्यमांचे हितसंबंध जोपासणारे आदि गट असतात. शासकीय कार्यालयांमध्ये देखील विविध स्तरांवरुन शासन निर्णयावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जातो. औपचारिक दबाव गटांचा धोरणावर प्रभाव पडत असला तरी बिगर संघटित किंवा अनौपचारिक गटांचा आणि हितसंबंधांचा अनेकदा शासननिर्णयावर प्रभाव पडतो. बिगर संघटित समूहांची कायमस्वरुपी संघटना नसते; अचानक किंवा एखाद्या घटनेमुळे या स्वरुपाचे दबाव गट निर्माण होतात. वरील पाच प्रकारच्या दबाव गटांचे अस्तित्व राजकीय व्यवस्थेच्या स्वरुपावर अवलंबून असते. पाश्चिमात्य उदारमतवादी लोकशाही राष्ट्रांमध्ये वरील पाचही प्रकारचे दबाव गट आढळतात. तर हुकूमशाही देशांमध्ये सार्वजनिक हितसंबंधांचा पाठपुरावा करणारे आढळतीलच असे नाही.

बहुतांशी दबाव गटांची स्थापना ही कोणत्याही राजकीय हेतूने झालेली नसते. त्यांच्या स्थापनेमागील प्रमुख हेतू हा मुख्यत्वे सदस्यांच्या प्रगतीसाठी माहिती प्रसारित करणे, सदस्यांचे व्यावसायिक, सामाजिक, आर्थिक प्रगती घडवून आणण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करणे हा असतो. पत्रकार संघ आपल्या सदस्यांना आरोग्य विमा अत्यल्प दरामध्ये देतात. थोडक्यात कोणत्याही दबाव गटाची निर्मिती सदस्यांच्या कल्याणासाठी झालेली असते. त्यासाठी वैयक्तिक पातळीवर सदस्यांना फायदा होईल यासाठी प्रयत्न केले जातात.

दबाव गट सदस्यांसाठी अनेक प्रकारचे अराजकीय कार्ये करतात; परंतु हे गट जेव्हा राजकीय बनतात तेव्हा त्यांचे एकमेव उद्दिष्ट हे आपल्या सदस्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे असते.शासनाच्या धोरणाला सदस्यांसाठी अनुकूल बनविण्यासाठी ते प्रयत्न करतात. लोकशाहीमध्ये दबाव गटांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. दबाव गट समाजातील हितसंबंधाचे एकत्रीकरण करुन व्यवस्थेपुढे मांडतात.व्यवस्था एखाद्या व्यक्तीच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही; परंतु जर समूहच ती मागणी करु लागला तर तिच्याकडे दुर्लक्ष करणे शक्य होत नाही. उदा. एखादा कामगार कायद्यातील बदलांना विरोध करु शकत नाही;परंतु जर कामगार संघटनेने जर त्यात लक्ष घातले तर मात्र शासनाला त्याची दखल घ्यावी लागते.त्यामुळे राजकीय व्यवस्थेपुढे समाजातील विविध घटकांचे प्रश्न आणण्याची भूमिका दबाव गट पार पाडत असतात. तसेच दबाव गट धोरण निर्माण करण्यासाठी आवश्यक ती माहिती पुरवित असतात. सदस्यांच्या प्रश्नांची आणि समस्यांची जाणीव राज्यकर्त्यांना करुन देतात. याचबरोबर काही सदस्यांना दबाव गट कायदेमंडळात त्यांची बाजू मांडण्यासाठी पाठवित असतात.
उत्तर लिहिले · 10/2/2023
कर्म · 45
0

भारतातील दबाव गटांचे स्वरूप खालीलप्रमाणे स्पष्ट केले आहे:

  1. व्याख्या आणि स्वरूप:

    दबाव गट म्हणजे समान उद्दिष्ट्ये असणाऱ्या लोकांचा समूह, जो सरकारवर धोरणे आणि निर्णय घेण्यासाठी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो. हे गट निवडणुकीत भाग घेत नाहीत, परंतु राजकीय प्रक्रियेत सक्रिय भूमिका घेतात.

  2. उद्दिष्ट्ये:

    दबाव गटांचे मुख्य उद्दिष्ट आपल्या सदस्यांच्या हितांचे रक्षण करणे आणि त्या दृष्टीने सरकारला धोरणे बनवण्यास प्रवृत्त करणे असते.

  3. प्रकार:

    भारतात विविध प्रकारचे दबाव गट आढळतात:

    • व्यावसायिक गट: फिक्की (FICCI) आणि सीआयआय (CII) सारख्या संस्था उद्योजकांच्या हितासाठी काम करतात.
    • कामगार संघटना: कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या समस्यांसाठी आवाज उठवतात.
    • शेतकरी संघटना: शेतकऱ्यांच्या समस्या व कृषी धोरणांवर लक्ष केंद्रित करतात.
    • विद्यार्थी संघटना: विद्यार्थ्यांच्या समस्या व शैक्षणिक धोरणांवर लक्ष केंद्रित करतात.
    • जातीय आणि धार्मिक गट: विशिष्ट जात आणि धर्माच्या लोकांच्या हितासाठी कार्य करतात.
    • पर्यावरण गट: पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि पर्यावरणीय समस्यांवर आवाज उठवण्यासाठी काम करतात.
  4. कार्य करण्याची पद्धत:

    दबाव गट विविध मार्गांनी सरकारवर प्रभाव टाकतात:

    • निवेदन देणे: सरकारला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करणे.
    • जनमत तयार करणे: आपल्या बाजूने जनमत तयार करण्यासाठी प्रचार करणे.
    • Lobbying: राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या ध्येयांसाठी समर्थन मिळवणे.
    • Court cases: काही गट आपल्या मागण्यांसाठी न्यायालयात याचिका दाखल करतात.
  5. सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव:

    दबाव गटांचे काही सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव दिसून येतात:

    • सकारात्मक: हे गट सरकारला विविध विषयांवर माहिती देतात आणि धोरणे अधिक लोकाभिमुख बनण्यास मदत करतात.
    • नकारात्मक: काही वेळा हे गट केवळ आपल्या सदस्यांच्या हिताचा विचार करतात आणि त्यामुळे समाजाच्या व्यापक हिताकडे दुर्लक्ष होऊ शकते.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5240

Related Questions

राजकीय पक्ष व इतर संबंधित गट यातील फरक स्पष्ट करा?
भारतातील विविध दबावगटांचे स्वरूप विषद करा?
भारतातील विविध दबावगटांचे स्वरूप विशद करा?
भारतातील दबाव गटाचे स्वरूप थोडक्यात सांगा?