सण धार्मिक सण

वसंत पंचमी म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

वसंत पंचमी म्हणजे काय?

0
वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय.[२] वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस आहे.[

माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली. यामुळे माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते. वसंत ऋतूही याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी ...
माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली. यामुळे माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते. वसंत ऋतूही याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी म्हटले जाते. विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते. वसंत पंचमी साजरी करण्याला हिंदू धर्मात अनेक मान्यता आहेत. वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्त्वही वेगळे आहे. सन २०२२ मध्ये ५ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी आहे. जाणून घेऊया वसंत पंचमीचे महत्त्व आणि मान्यता...








सरस्वती देवी पृथ्वीवर अवतरली


सृष्टीचे निर्माणकर्ता ब्रह्म देवांनी जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली. मात्र, निर्माण केलेल्या सृष्टीकडे पाहिल्यावर ती निस्तेज असल्याचे त्यांना जाणवले. वातावरण अतिशय शांत होते. त्यात कुठलाही आवाज वा वाणी नव्हती. यामुळे ब्रह्म देव उदास आणि निराश झाले. विष्णू देवाच्या आज्ञेवरून ब्रह्म देवांनी आपल्या कमंडलातील पाणी पृथ्वीवर शिंपडले. भूमीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वी कंप पावली आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसर्‍या हात वर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तके आणि माळ होती. ब्रह्म देवाने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला. वीणेच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीवांना, मनुष्याला वाणी प्राप्त झाली. त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले. सरस्वती देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी सर्व जीवांना दिली. माघ महिन्यातील पंचमीला ही घटना घडल्यामुळे सरस्वतीचा जन्मोत्सव रूपात ही पंचमी साजरी केली जाते, अशी मान्यता आहे. या देवीला बागीश्वरी, भगवती, शारदा, वीणावादनी आणि वाग्देवी, अशी अनेक नावे आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे संगीताची देवी म्हणूनही तिचे पूजन केले जाते. विद्या, बुद्धी देणाऱ्या सरस्वती देवीची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी केली जाते.



वसंतोत्सव

वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. वसंत पंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात. सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. वसंत ऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ सुवसंतक, वसंतोत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव, असे उत्सव करण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. या निमित्ताने नृत्य, संगीत, वनविहार, जलक्रीडा आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जातात. वसंताचा उत्सव हे आशावादाचे प्रतीक आहे. वसंत म्हणजे आशा व सिद्धी यांचा सुंदर मिलाफ आहे. कल्पना व वास्तवता यांचा सुगम समन्वय आहे.

महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ऋतूला कुसुमाकर असे म्हणून ऋतुराज वसंताची बिरुदावली गायली आहे. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतमध्ये लोभस बनतो. काही ठिकाणी रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून, रंगांची उधळण करून वसंतोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. वसंत ऋतूमध्ये वृक्षलतांना नवी पालवी फुटते. ते पानाफुलांनी बहरतात. निसर्गाच्या या बदलत्या स्वरुपामुळे मनुष्याची मनोवृत्तीही उत्साही व आनंदी होते. हा उत्सव ह्या संक्रमणस्थितीचा द्योतक आहे.

    

उत्तर लिहिले · 26/1/2023
कर्म · 53710
0
वसंत पंचमी हा एक हिंदू सण आहे. हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी (पंचमी) साजरा केला जातो.

वसंत पंचमी कशासाठी साजरी करतात?
  • वसंत पंचमी हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे.
  • या दिवशी, लोक देवी सरस्वतीची पूजा करतात.
  • वसंत पंचमी हा दिवस नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी शुभ मानला जातो.

वसंत पंचमी कशी साजरी करतात?
  • लोक पिवळे कपडे घालतात.
  • देवी सरस्वतीला पिवळे ফুল अर्पण करतात.
  • घरी पिवळे पदार्थ बनवतात.
  • पतंग उडवतात.

वसंत पंचमी हा सण आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो.
यूट्यूब वर याबद्दल अधिक माहिती दिलेली आहे.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040

Related Questions

कोणत्या मराठी महिन्यात दिवाळी सण येतो?
दिवाळीतील एका दिव्याचा भावार्थ हिंदीमध्ये स्पष्ट करा?
पिठोरी अमावस्या म्हणजे काय?
नारळी पौर्णिमा म्हणजे काय?
रक्षाबंधन म्हणजे काय?
गुरुपौर्णिमा/व्यास पौर्णिमा (गुरुपौर्णिमा) बद्दल माहिती?
मकर संक्रांत या दिवशी काळे कपडे का घालतात?