Topic icon

धार्मिक सण

0
वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय.[२] वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस आहे.[

माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली. यामुळे माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते. वसंत ऋतूही याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी ...
माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली. यामुळे माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते. वसंत ऋतूही याच दरम्यान बहरत असल्यामुळे या पंचमीला वसंत पंचमी म्हटले जाते. विद्येची देवता सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते. वसंत पंचमी साजरी करण्याला हिंदू धर्मात अनेक मान्यता आहेत. वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्त्वही वेगळे आहे. सन २०२२ मध्ये ५ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी आहे. जाणून घेऊया वसंत पंचमीचे महत्त्व आणि मान्यता...








सरस्वती देवी पृथ्वीवर अवतरली


सृष्टीचे निर्माणकर्ता ब्रह्म देवांनी जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली. मात्र, निर्माण केलेल्या सृष्टीकडे पाहिल्यावर ती निस्तेज असल्याचे त्यांना जाणवले. वातावरण अतिशय शांत होते. त्यात कुठलाही आवाज वा वाणी नव्हती. यामुळे ब्रह्म देव उदास आणि निराश झाले. विष्णू देवाच्या आज्ञेवरून ब्रह्म देवांनी आपल्या कमंडलातील पाणी पृथ्वीवर शिंपडले. भूमीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वी कंप पावली आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसर्‍या हात वर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तके आणि माळ होती. ब्रह्म देवाने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला. वीणेच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीवांना, मनुष्याला वाणी प्राप्त झाली. त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले. सरस्वती देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी सर्व जीवांना दिली. माघ महिन्यातील पंचमीला ही घटना घडल्यामुळे सरस्वतीचा जन्मोत्सव रूपात ही पंचमी साजरी केली जाते, अशी मान्यता आहे. या देवीला बागीश्वरी, भगवती, शारदा, वीणावादनी आणि वाग्देवी, अशी अनेक नावे आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे संगीताची देवी म्हणूनही तिचे पूजन केले जाते. विद्या, बुद्धी देणाऱ्या सरस्वती देवीची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी केली जाते.



वसंतोत्सव

वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. वसंत पंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात. सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. वसंत ऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ सुवसंतक, वसंतोत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव, असे उत्सव करण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. या निमित्ताने नृत्य, संगीत, वनविहार, जलक्रीडा आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जातात. वसंताचा उत्सव हे आशावादाचे प्रतीक आहे. वसंत म्हणजे आशा व सिद्धी यांचा सुंदर मिलाफ आहे. कल्पना व वास्तवता यांचा सुगम समन्वय आहे.

महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ऋतूला कुसुमाकर असे म्हणून ऋतुराज वसंताची बिरुदावली गायली आहे. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतमध्ये लोभस बनतो. काही ठिकाणी रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून, रंगांची उधळण करून वसंतोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. वसंत ऋतूमध्ये वृक्षलतांना नवी पालवी फुटते. ते पानाफुलांनी बहरतात. निसर्गाच्या या बदलत्या स्वरुपामुळे मनुष्याची मनोवृत्तीही उत्साही व आनंदी होते. हा उत्सव ह्या संक्रमणस्थितीचा द्योतक आहे.

    

उत्तर लिहिले · 26/1/2023
कर्म · 53710
0
बाप व मुलाचे त्यांच्यातील नाते.
उत्तर लिहिले · 27/11/2021
कर्म · 0
0

शिवजयंतीच्या दिवशी मटणाची दुकाने चालू राहतील की नाही, हे स्थानिक प्रशासनाच्या नियमांवर अवलंबून असते. काही ठिकाणी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले जातात, तर काही ठिकाणी ती चालू ठेवण्यास परवानगी असते.

अधिक माहितीसाठी:

  • आपल्या शहरातील महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या website वर माहिती तपासा.
  • स्थानिक प्रशासनाने जारी केलेले परिपत्रक (circular) पहा.

तुम्ही तुमच्या परिसरातील मटण दुकानदारांकडून माहिती मिळवू शकता.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040
0

धर्मराज बिजी हा सण हिमाचल प्रदेशात साजरा केला जातो.

हा सण का साजरा करतात याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • पाऊस आणि समृद्धीसाठी प्रार्थना: चांगला पाऊस यावा आणि शेतीत समृद्धी यावी यासाठी या सणादरम्यान धर्मराजाची पूजा केली जाते.
  • नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी: नैसर्गिक आपत्ती येऊ नयेत, यासाठी देवाला प्रार्थना केली जाते.
  • गावाचे रक्षण: धर्मराज गावाला वाईट शक्तींपासून वाचवतो, अशी लोकांची श्रद्धा आहे.

हा सण अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे आणि आजही तेथील लोक तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040
1
तिथे’ तरंगते साडेसात किलोची दगडी मूर्ती 
  .         *_देवास-(म. प्र) मध्यप्रदेशातील देवासच्या नृसिंह घाटावरील भमोरी नदीत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘डोल ग्यारस’ (एकादशी)ला म्हणजेच गुरुवारी भगवान नृसिंहाची साडेसात किलो वजनाची पाषाणातील मूर्ती तरंगली. हे दृश्य पाहण्यासाठी दूरवरून हजारो श्रद्धाळू येत असतात. सायंकाळी मिरवणुकीने ही मूर्ती नदीवर नेण्यात आली आणि पावणेसहा वाजता ती पाण्यावर ठेवण्यात आली. यावेळीही ही मूर्ती तीनवेळा पाण्यावर तरंगली.



*तीनवेळा ही मूर्ती पाण्यावर तरंगल्यास आगामी वर्ष सुखाचे ठरते, असे तिथे मानले जाते. नृसिंह मंदिरातून ही मूर्ती पालखीतून नदीवर आणण्यात आली. त्यावेळी अन्यही मंदिरांच्या पालख्या नदीकाठावर आल्या होत्या.*
*_⸾⸾मा ⸾⸾हि ⸾⸾ती ⸾⸾ ° ⸾⸾से ⸾⸾वा ⸾ ⸾° ग्रू ⸾⸾प ⸾⸾, ⸾⸾पे ⸾⸾ठ⸾ ⸾व ⸾⸾ड ⸾⸾गा⸾ ⸾व ⸾⸾_*
नदीवर पुजार्यांनी स्नान करून आरती केल्यावर ही पाषाण मूर्ती नदीत सोडण्यात आली. त्यावेळी ती पाण्यावर तरंगू लागली. तीनवेळा असे झाल्यानंतर मूर्तीला हार अर्पण करण्यात आले. हा हार अर्पण करण्यासाठी तिथे बोली लावली जाते. उद्योगपती यशराज टोंग्या यांनी सर्वाधिक म्हणजे एक लाख एक हजार रुपयांची बोली लावून सर्वप्रथम हार अर्पण करण्याचा मान मिळवला. नदीत मूर्ती तरंगवण्याच्या या प्रथेला 151 वर्षांपेक्षाही अधिक काळाचा इतिहास आहे.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛
1
                               
                        🐍नागपंचमी🐍
उत्तर लिहिले · 16/8/2020
कर्म · 47820
2
*शीख धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले गुरुनानक*

*✡️गुरू नानक जयंती*

🙏गुरू नानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त देशातील असंख्य भाविक अमृतसरमध्ये दाखल झाले आहेत. शीख धर्माचे संस्थापक आणि शीखांचे पहिले गुरू नानक देव यांचा आज जन्मदिवस आहे.
🙏आजचा दिवस शिखधर्मियांसाठी पवित्र मानला जातो. गुरू नानक यांच्या जयंतीनिमित्त असंख्य शीख बांधव माथा टेकण्यासाठी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसरात आले आहेत.
🙏ईश्वर एक आहे आणि त्याचे वास्तव्य चराचरात असल्याचा संदेश गुरु नानकांनी समाजाला दिला.
गुरू नानक यांचा जन्म 1469 मध्ये पंजाबमध्ये झाला. सध्या हा भाग पाकिस्तानात येतो.
🙏संसारात रमलेले गुरू नानक वयाच्या 30 व्या वर्षी अध्यात्म यात्रेला निघाले. देव हा एक असतो आणि त्याच्यासाठी सर्व समान असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणूनच त्यांनी शीख धर्माची स्थापना केली आणि ते शिखांचे पहिले गुरू बनले.
🙏कार्तिक पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी नोव्हेंबर महिन्यात त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी शीख भाविक एकत्र येऊन सर्वांसाठी जेवण बनवतात. हजारो भाविक लंगरमध्ये पोटभर जेवतात.

शीख धर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले पहिले धर्म गुरु आणि पहिले धर्म संस्थापक गुरु नानक देवजी यांच्या जन्मादिनानिमित्त गुरु नानक जयंती साजरी केली जाते. त्यांच्या जन्मदिनी शीख धर्मीय गुरु पर्व, गुरुपुरब, प्रकाश पर्व, जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. 1526 मध्ये कार्तिक पोर्णिमेला गुरु नानक देवजी यांचा जन्म पंजाबच्या तलवंडी येथे झाला. त्यांचे हे जन्म स्थान ननकाना साहिब यांच्या नावाने ओळखले जाते. इंग्रजी वर्षाच्या कॅलेंडर प्रमाणे गुरु नानक यांचा जन्म सवंत 15 एप्रिल 1469 मध्ये झाला होता.
हिंदु आणि मुस्लीम धर्मींयांना गुरुनानक यांनी आयुष्यभर एकतेचा संदेश दिला. मानवता हाच खरा धर्म असल्याचा संदेश त्यांनी वेळोवेळी दिला. मानवतेवर त्यांची दृढ श्रद्धा होती. त्यामुळे धर्म, जात या पलिकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे असा संदेश त्यांनी दिला. हे संपूर्ण जग बनवणारा एकच ईश्वर आहे, धर्म हे दर्शन असून दिखावा नाही अशी त्यांची धारणा होती.
*जगाला एकतेचा संदेश दिला*

गुरुनानक यांचे वयाच्या 16 व्या वर्षी लग्न झाले, तर वयाच्या 32 व्या वर्षी त्यांना पहिले मुल झाले, श्रीचंद आणि लखमीदास या दोन मुलांच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्यांनी तीर्थ यात्रेला सुरवात केली. जगभरात धर्म आणि मानवता तसेच एकतेचा प्रचार करताना गुरुनानक यांनी शीख धर्माचा प्रसार केला आणि लोकांना शिकवण दिली. आपल्या प्रवचनांमधुन त्यांनी सदैव जातीवाद, भेदभाव नष्ट करणे, सत्याच्या मार्गावर चालण्याचा उपदेशही दिले.
*लंगर परंपरेची सुरवात*
लंगर म्हणजे मराठीत बोलायच झाल तर पंगत. जवळपास 15 व्या शतकात गुरुनानक यांनी लंगर परंपरेची सुरवात केली. धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी संपूर्ण भारत भर प्रवासा बरोबरच जगभरात देखील अनेक धार्मिक स्थळांना भेट दिली. यावेळी प्रवासा दरम्यान, भोजन करण्यासाठी ते कुठेही खाली बसायचे. जगभरातील वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक उच्च-निच्च, गरीब श्रीमंत यासारखा कोणताही भेद मनात न ठेवता सर्व जणांनी एकत्र बसून जेवावे हा त्यामागचा उद्देश होता. शीख धर्मीयांचा कोणताही सण हा लंगर शिवाय पुर्ण होत नाही. पंजाब मधील गोल्डन टेंपल म्हणजेच सुवर्ण मंदिराच्या लंगरमध्ये दररोज हजारो लोक जमीनीवर बसून भोजन करतात. स्वयंपाक गृहात दररोज तब्बल दोन- लाख पोळ्या बनवल्या जातात.
उत्तर लिहिले · 12/11/2019
कर्म · 569225