सण धार्मिक सण

12 नोव्हेंबर: गुरुनानक जयंती आहे का?

2 उत्तरे
2 answers

12 नोव्हेंबर: गुरुनानक जयंती आहे का?

2
*शीख धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले गुरुनानक*

*✡️गुरू नानक जयंती*

🙏गुरू नानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त देशातील असंख्य भाविक अमृतसरमध्ये दाखल झाले आहेत. शीख धर्माचे संस्थापक आणि शीखांचे पहिले गुरू नानक देव यांचा आज जन्मदिवस आहे.
🙏आजचा दिवस शिखधर्मियांसाठी पवित्र मानला जातो. गुरू नानक यांच्या जयंतीनिमित्त असंख्य शीख बांधव माथा टेकण्यासाठी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसरात आले आहेत.
🙏ईश्वर एक आहे आणि त्याचे वास्तव्य चराचरात असल्याचा संदेश गुरु नानकांनी समाजाला दिला.
गुरू नानक यांचा जन्म 1469 मध्ये पंजाबमध्ये झाला. सध्या हा भाग पाकिस्तानात येतो.
🙏संसारात रमलेले गुरू नानक वयाच्या 30 व्या वर्षी अध्यात्म यात्रेला निघाले. देव हा एक असतो आणि त्याच्यासाठी सर्व समान असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणूनच त्यांनी शीख धर्माची स्थापना केली आणि ते शिखांचे पहिले गुरू बनले.
🙏कार्तिक पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी नोव्हेंबर महिन्यात त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी शीख भाविक एकत्र येऊन सर्वांसाठी जेवण बनवतात. हजारो भाविक लंगरमध्ये पोटभर जेवतात.

शीख धर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले पहिले धर्म गुरु आणि पहिले धर्म संस्थापक गुरु नानक देवजी यांच्या जन्मादिनानिमित्त गुरु नानक जयंती साजरी केली जाते. त्यांच्या जन्मदिनी शीख धर्मीय गुरु पर्व, गुरुपुरब, प्रकाश पर्व, जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. 1526 मध्ये कार्तिक पोर्णिमेला गुरु नानक देवजी यांचा जन्म पंजाबच्या तलवंडी येथे झाला. त्यांचे हे जन्म स्थान ननकाना साहिब यांच्या नावाने ओळखले जाते. इंग्रजी वर्षाच्या कॅलेंडर प्रमाणे गुरु नानक यांचा जन्म सवंत 15 एप्रिल 1469 मध्ये झाला होता.
हिंदु आणि मुस्लीम धर्मींयांना गुरुनानक यांनी आयुष्यभर एकतेचा संदेश दिला. मानवता हाच खरा धर्म असल्याचा संदेश त्यांनी वेळोवेळी दिला. मानवतेवर त्यांची दृढ श्रद्धा होती. त्यामुळे धर्म, जात या पलिकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे असा संदेश त्यांनी दिला. हे संपूर्ण जग बनवणारा एकच ईश्वर आहे, धर्म हे दर्शन असून दिखावा नाही अशी त्यांची धारणा होती.
*जगाला एकतेचा संदेश दिला*

गुरुनानक यांचे वयाच्या 16 व्या वर्षी लग्न झाले, तर वयाच्या 32 व्या वर्षी त्यांना पहिले मुल झाले, श्रीचंद आणि लखमीदास या दोन मुलांच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्यांनी तीर्थ यात्रेला सुरवात केली. जगभरात धर्म आणि मानवता तसेच एकतेचा प्रचार करताना गुरुनानक यांनी शीख धर्माचा प्रसार केला आणि लोकांना शिकवण दिली. आपल्या प्रवचनांमधुन त्यांनी सदैव जातीवाद, भेदभाव नष्ट करणे, सत्याच्या मार्गावर चालण्याचा उपदेशही दिले.
*लंगर परंपरेची सुरवात*
लंगर म्हणजे मराठीत बोलायच झाल तर पंगत. जवळपास 15 व्या शतकात गुरुनानक यांनी लंगर परंपरेची सुरवात केली. धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी संपूर्ण भारत भर प्रवासा बरोबरच जगभरात देखील अनेक धार्मिक स्थळांना भेट दिली. यावेळी प्रवासा दरम्यान, भोजन करण्यासाठी ते कुठेही खाली बसायचे. जगभरातील वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक उच्च-निच्च, गरीब श्रीमंत यासारखा कोणताही भेद मनात न ठेवता सर्व जणांनी एकत्र बसून जेवावे हा त्यामागचा उद्देश होता. शीख धर्मीयांचा कोणताही सण हा लंगर शिवाय पुर्ण होत नाही. पंजाब मधील गोल्डन टेंपल म्हणजेच सुवर्ण मंदिराच्या लंगरमध्ये दररोज हजारो लोक जमीनीवर बसून भोजन करतात. स्वयंपाक गृहात दररोज तब्बल दोन- लाख पोळ्या बनवल्या जातात.
उत्तर लिहिले · 12/11/2019
कर्म · 569225
0

उत्तर: होय, 12 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1040

Related Questions

वसंत पंचमी म्हणजे काय?
श्रावण महिन्यात कोणता सण येत नाही?
शिवजयंतीला मटण दुकान चालू असते का?
धर्मराज बिजी हा सण का साजरा करतात?
"डोल ग्यारस" हा कोणता सण/उत्सव आहे?
झोका पंचमी म्हणजे कोणता सण?
काश्मीरमध्ये गणपती बसवतात का?