2 उत्तरे
2
answers
भारुड म्हणजे काय?
0
Answer link
. |
संतांनी आपापल्या परीने विविध माध्यमातून जसे भजन, कीर्तन करून कधी प्रेमाने तर कधी कठोर शब्दात त्या वेळी समाजाचे प्रबोधन करण्याचे मौलाचे कार्य केलेले आहे त्यातीलच एक माध्यम म्हणजेच "भारूड" हे होय.
भारूड हा मराठी पद्यवाड:याचा एक प्रकार आहे. भारूड या शब्दाचा शब्दकोषातील अर्थ ' धनगर ' असा मानला जातो. या भारूडातून साध्या रुपकांमधून धार्मिक व नैतिक तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले गेलेले आहे. काहींच्या मते बहुरूड या शब्दाचा अपभ्रश करून भारूड हा शब्द प्रचलित झाला आहे.
भारूडाचे मुख्यतः तीन प्रकार मानले जातात. भजनी भारूड, सोंगी भारूड व कूट भारूड. यापैकी भजनी भारूड हे कीर्तनासारखे असते. महाराष्ट्रातील संतांनी लोकशिक्षणासाठी भरुडाची रचना केली होती.
भारूड काव्यरचनेचा उगम हा मराठी भाषेतूनच झालेला आहे. भारूडाचे विषय हे सर्वसमान्यांच्या ओळखेचे व दैनंदिन जीवनातील व्यवहारात आढळणारे विषय असतात. समाज व त्याचे वृत्तीदर्शन, नाती-गोती, व्यवसाय, पशु- पक्षी, सणवार असे अनेक विषय भरुडामध्ये दिसून येतात.
भारूड हे नुसते गायनाने दाखवाची रचना नसून त्याचे संपादन ही करावे लागते. भारूड या काव्यप्रकारात ब्रम्हज्ञानाला गोष्टीचे रूप देऊन मनोरंजनात्मक पद्धतीने सादर करावे लागते. त्याचप्रमाणे भारूड सादर करणाऱ्या व्यक्तीला अध्ययानाचे चांगले ज्ञान तर असावेच परंतु त्याचबरोबर एक नट ही असावे लागते.
संत एकनाथ महाराजांनी भारूड या काव्यरचनेला यशाच्या शिखरावर नेऊन पोहचविले आहे. संत एकनाथांनी त्यांचा आध्यात्मिक अनुभव अगदी साध्या आणि सरळ भाषेत मांडला होता. त्यांच्या भारूडात समाजाला समजणारे सोप्या भाषेतील तत्वज्ञान आढळते त्याचबरोबर त्यांच्या भारूडमध्ये विविधता आढळून येते. संत एकनाथ महाराजांनी 'एडका' या भरुडाची रचना केली होती. राज्यात आजही जनजागृतीसाठी व लोकजागृतीसाठी भारुडाचा उपयोग केला जातो.
काहींच्या मते संत ज्ञानेश्वर हे भारूडाचे आद्यरचनाकार होते असे म्हंटले जाते. तर काहींच्या मते, भारूडचे उगमस्थान म्हणजेच हरिकीर्तन व कीर्तन परंपरेचे जनक म्हणजेच संत नामदेव महाराज मानले जातात म्हणून संत नामदेव महाराज जे नाचून कीर्तन करायचे त्याला लळीत म्हणतात व या लळीतातूनच रुपकाचा जन्म झाला आहे. त्याचमुळे आध्यात्म सांगायला एक गोष्ट किंवा या रुपकाच्या माध्यमातून सांगू शकतो, व भारुड काव्यरचनेचा मुख्य हेतू हाच होता.
पूर्वीच्या काळी फक्त पुरुषाच भारूड सादर करीत होते परंतु आता मात्र काळ बदलला आहे आता स्त्री भारूडकर्त्या ही भारुडे सादर करू लागल्या आहेंत. यामध्ये संत साहित्य अभ्यासक गंगुबाई जाधव, लक्ष्मीबाई गिराम व चंदाबाई तिवाडी या भारुडे सादरकर्त्या आहेत. यातील चंदाबाई तिवाडी यांना तर संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ही मिळाला आहे.
असा हा भारूड काव्यप्रकार लोक प्रबोधनासाठी अत्यंत उपयुक्त असल्यामुळे जनजागृतीसाठी बऱ्याच संप्रदायांनी त्याचा उपयोगी करून घेतला आहे.
0
Answer link
भारुड हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय लोककला प्रकार आहे. हे एक प्रकारचे Kleinartig u> आहे, ज्यामध्ये अध्यात्मिक आणि नैतिक विचार सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवले जातात.
भारुडाची वैशिष्ट्ये:
- हे एक नाट्यमय सादरीकरण आहे, ज्यात एक किंवा अधिक कलाकार भाग घेतात.
- भारुडात विनोदाचा वापर केला जातो, ज्यामुळे ते अधिक आकर्षक बनते.
- यात आध्यात्मिक संदेश असतो, जो लोकांना चांगल्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त करतो.
- भारुड हे सहसा संत एकनाथांनी रचलेले असतात.
भारुड हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: