अन्न भेसळ

अन्नभेसळ म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

अन्नभेसळ म्हणजे काय?

3


अन्न भेसळ म्हणजे काय ?

भेसळ प्रतिबंधक कायद्याप्रमाणे पुढील बाबींना भेसळ म्हणतात. :अन्नपदार्थातील काही घटक काढून घेणे. उदा. दुधातील स्निग्धांश काढून घेणे, लवंगा- वेलदोडयातील अर्क काढून घेणे एखाद्या अन्नपदार्थात कमी प्रतीचा माल मिसळणे. उदा. गोडेतेलात करडईचे तेल मिसळणे, शुध्द तुपात वनस्पती तूप मिसळणे. अन्नपदार्थात अपायकारक पदार्थ मिसळणे. उदा. मिठाईत विषारी रंग मिसळणे.मूळ पदार्थाऐवजी बनावट माल वापरणे उदा. केशराच्या ऐवजी मक्याच्या कणसाचे रंगवलेले तुरे वापरणे. चहाच्या ऐवजी लाकडाचा भुसा रंगवून वापरणे. कायद्याने ठरवून दिलेल्या पदार्थांऐवजी दुसराच पदार्थ मिसळणे. उदा. साखर मिसळण्याऐवजी एक दुसराच गोड पदार्थ (सॅकरिन) मिसळणे. एखाद्या अन्नपदार्थात सडलेले, कुजलेले, खराब किंवा किडलेले पदार्थ असणे. एखाद्या पदार्थात विषारी अंश असणे. एखाद्या पदार्थात मर्यादेपेक्षा जास्त अयोग्य रंग मिसळलेला असणे. एखाद्या पदार्थात ते टिकवण्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त रासायनिक अंश सापडणे. ठरलेल्या गुणवत्तेपेक्षा कमी गुणवत्तेचा पदार्थ असणे.
 


उत्तर लिहिले · 9/11/2022
कर्म · 53750
0

अन्नभेसळ म्हणजे अन्नाच्या वस्तूंची गुणवत्ता कमी करणे किंवा त्यात भेसळयुक्त पदार्थ मिसळणे होय.

  • भेसळयुक्त पदार्थ: हे स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचे असू शकतात, ज्यामुळे अन्नाची गुणवत्ता घटते.
  • उदाहरण: दुधात पाणी मिसळणे, मसाल्यांमध्ये भेसळ करणे, तेलात स्वस्त तेल मिसळणे.

अन्नभेसळ मानवी आरोग्यासाठी धोकादायक असू शकते, कारण भेसळयुक्त पदार्थांमध्ये विषारी रसायने असू शकतात.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2960

Related Questions

रेशन मध्ये नाव आपण मोबाईल द्वारे ऍड करू शकतो का?
रेशन कार्ड मध्ये ऑनलाइन नाव ॲड कसे करावे?
दुय्यम शिधापत्रिका मिळवण्याकरता व नाव समाविष्ट करण्याकरीता काय करावे लागेल?
खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते?
बंद असलेले रेशन सुरु करायचे आहे तर काय करावे लागेल व अर्ज कसा करावा लागेल?
मराठी जेवण खातक्षणी तुम्हाला इतर पदार्थांपेक्षा किती वेगळे वाटते?
एका किल्ल्यावर 12000 सैनिकांना 60 दिवस पुरेल इतके अन्न आहे. जर 30 दिवसांनी 300 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले, तर ते अन्न किती दिवस पुरेल?