वजन व्यवस्थापन
आरोग्य
आहार
माझं वय 24, उंची 5 फूट 10 इंच, वजन 81 किलो आहे, तर वजन कमी करण्यासाठी कोणता उपाय करावा?
2 उत्तरे
2
answers
माझं वय 24, उंची 5 फूट 10 इंच, वजन 81 किलो आहे, तर वजन कमी करण्यासाठी कोणता उपाय करावा?
3
Answer link
तुम्हाला तुमचे वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी व्यायाम करणे आवश्यक आहे. शक्य झाल्यास जिमला जाण्यास सुरुवात करा, यामुळे तुमचे वजन लवकर कमी होण्यास मदत होईल तसेच पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. हे झाले शारीरिकदृष्ट्या यासोबत मानसिकदृष्ट्या वजन कमी होऊ शकते यासाठी सकारात्मक विचारशक्ती असणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही मनातून काढून टाका की मी (स्वतः) जाड/माझे वजन जास्त आहे याउलट असा विचार करा की मला पहिजे तितके वजन माझे आहे. रोज सकाळी उठल्यावर आरश्यात जाऊन पहा आणि बोला मी तंदुरूस्त आहे, माझी शारीरिक रचना सुदृढ आहे, माझे वजन कमी होत आहे
अश्याप्रकारची अनेक सकारात्मक वाक्ये बोलू शकता. हे सर्व बोलत असताना कोणतीही मनात शंका येऊ देऊ नका कोणतीही याबाबत नकारात्मक विचार येणे म्हणजे तुम्हाला तुमचे वजन कमी होण्याची खात्री कमी होणे म्हणून तुम्ही यावर प्रश्न तयार करु नका याने तुमचे मन विचलित होईल. तुम्हाला आधी आधी थोडे अवघडल्यासारखे होईल पण हळू हळू तुम्हाला याची सवय होईल आणि एकदा सवय झाली की परीणाम हा चांगलाच असेल अशी मी आशा करतो.
माझी माहिती तुम्हाला आवडली किंवा उपयोगी पडली तर नक्की कळवा. धन्यवाद...!
टीप :- जर कोणताही चांगला विचार मनात सारखा सारखा येत असेल तर त्यावर विचार न करता आनंदाने त्यावर क्रिया करणे महत्त्वाचे आहे
0
Answer link
वजन कमी करण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
आहार:
- कॅलरी Deficit: तुमच्या शरीराला गरजेपेक्षा कमी कॅलरी असलेला आहार घ्या.
- प्रथिने: आहारात प्रथिने भरपूर प्रमाणात घ्या. त्यामुळे पोट भरलेले राहते.
- फळे आणि भाज्या: फळे आणि भाज्या भरपूर खा.
- जंक फूड टाळा: जंक फूड आणि process केलेले पदार्थ खाणे टाळा.
व्यायाम:
- कार्डिओ: नियमितपणे कार्डिओ व्यायाम करा, जसे की धावणे, पोहणे किंवा सायकल चालवणे.
- वजन प्रशिक्षण: आठवड्यातून दोन ते तीन दिवस वजन प्रशिक्षण करा.
- सक्रिय राहा: दिवसभर सक्रिय राहा. लिफ्टऐवजी पायऱ्या वापरा.
जीवनशैली:
- पुरेशी झोप: दररोज रात्री 7-8 तास झोप घ्या.
- तणाव कमी करा: तणाव कमी करण्यासाठी योगा किंवा ध्यान करा.
- भरपूर पाणी प्या: दिवसभर भरपूर पाणी प्या.
इतर उपाय:
- नेहमी नाश्ता करा: सकाळी नाश्ता करणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
- छोटे-छोटे घास घ्या: जेवताना छोटे-छोटे घास घ्या आणि हळू हळू खा.
- लक्षपूर्वक खा: टीव्ही बघता बघता किंवा मोबाईल वापरता वापरता जेवण टाळा.
टीप: कोणताही नवीन आहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.