मंदिर हिंदु धर्म प्रथा व परंपरा धर्म

महिलांनी हनुमान मंदिरात प्रवेश करणे कितपत योग्य आहे?

3 उत्तरे
3 answers

महिलांनी हनुमान मंदिरात प्रवेश करणे कितपत योग्य आहे?

3
हनुमान बाल ब्रम्हचारी आहेत असे मानतात. म्हणून स्रीयांनी त्यांचे मंदीरात जाउ नये असे सांगतात. पण ह्याला कुठलाही शास्त्राधार नाही.

एखादी स्री हनुमाना समोर गेल्याने त्याचे विचारात व वर्तणुकीत बदल होउन चारित्र्य हनन होईल असे समजणे हा तद्दन मुर्खपणा आहे. आपणच आपल्या आराध्याची किंमत कमी करण्या सारखे आहे.

खर तर हनुमानजी विवाहित आहेत. सुर्य कन्या सुवरचला व हनुमानजींचा लौकिक विवाह झाला आहे. सुर्यदेव हे हनुमानजींचे गुरु आहेत. त्यांचे कडून सर्व शास्त्र, वेद, पुराण ह्यांचे शिक्षण घेत असतांना श्री विद्येचे शिक्षण गरजेचे होते.

मात्र श्री विद्याची उपासना नियमा प्रमाणे फक्त विवाहिता साठींच आहे. सुवरचला साध्वी होत्या. त्यामुळे त्यांची विवाह करण्याची मानसिकता नव्हती. पण श्री विंद्येच्या उपासनेस विवाहीत असण गरजेचे होते.

या कारणास्तव हनुमानजी व सुवरचलाह्यांचा विवाह करण्यात आला. तदनंतर त्यांना सुर्यदेवाने श्री विद्येची दिक्षा दिली.

तेलंगणातील खम्मम ह्या गावी हनुमानजींचे सपत्नीक मंदीर आहे. हे गांव हैद्रबादहून २२० किमी अंतरावर आहे. ज्यांचे दांपत्य जीवनात अडीअडचणी असतात ते ह्या मंदीरात दर्शन घेतात.
उत्तर लिहिले · 17/9/2022
कर्म · 53710
0
याला मनी नाही भाव देवा मला पाव असंच म्हणावं लागेल.
उत्तर लिहिले · 17/9/2022
कर्म · 115
0
स्त्रियांचे हनुमान मंदिरात प्रवेश करणे योग्य आहे की नाही, हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. मतानुसार काही माहिती खालीलप्रमाणे: * प्रवेश करू शकतात: काही लोकांच्या मते स्त्रिया हनुमान मंदिरात प्रवेश करू शकतात आणि पूजा करू शकतात. या मतानुसार, हनुमान हे भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी लिंगभेद नसावा. * प्रवेश करू शकत नाहीत: काही लोकांच्या मते स्त्रियांनी हनुमान मंदिरात प्रवेश करू नये. त्यांचे म्हणणे आहे की हनुमान ब्रह्मचारी होते आणि स्त्रियांच्या उपस्थितीमुळे त्यांची तपश्चर्या भंग होऊ शकते. विशेषतः रजस्वला स्त्रियांनी प्रवेश टाळावा, असे मानले जाते. * मंदिराचे नियम: काही हनुमान मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश करण्याची परवानगी आहे, तर काही मंदिरांमध्ये नाही. हे नियम मंदिराच्या परंपरेवर आणि व्यवस्थापनावर अवलंबून असतात. या संदर्भात अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: * जागरणjagrannews.com () हे सर्व विचार आणि नियम लक्षात घेऊन, स्त्रियांनी हनुमान मंदिरात प्रवेश करायचा की नाही, हे त्यांनी स्वतःच्या श्रद्धेनुसार आणि मंदिराच्या नियमांनुसार ठरवावे.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040

Related Questions

कन्या पूजनात मुलगा असणे आवश्यक आहे का?
एकादशीला पितर जेऊ घालतात का?
उजव्या हाताने जेवण का वाढू नये?
हिंदू धर्मात स्त्रियांनी नारळ फोडणे का निषिद्ध मानले जाते?
होळी दहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालत जाणे योग्य आहे की अयोग्य?
चुलत भावाचं चुलत बहिणीला सुतक असतं का?
नवीन बाळ जन्माला येते तेव्हा आनंद असतो, मग सोयर का पाळतात? देवाची पूजा वगैरे का करत नाही? सुतक ठीक आहे, कुणाचाही मृत्यू झाला तर पाळणे, पण सोयर का पाळतात?