शरीर जीवशास्त्र मानवी शरीर रचना विज्ञान

मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती?

2 उत्तरे
2 answers

मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती?

2
चेतापेशी (neuron) ही मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे.


 


एका सर्वसाधारण चेतापेशीचे तीन अवयव असतात मुख्य शरीर (सोमा),चेतातंतू आणि चेताक्ष. चेतापेशीचा विकास होत असतानाच्या अवस्थेमध्ये चेतातंतू आणि चेताक्ष, हे वेगवेगळे दाखवता येत नाहीत त्या अवस्थेमध्ये त्यांना एकत्रितपणे "चेतागर्भ" असे म्हणतात. चेतातंतू हे नावाप्रमाणेच तंतूमय असतात आणि ते चेतापेशीच्या मुख्य शरीराला जोडलेले असतात. त्यांची लांबी शेकडो मायक्रोमिटर एवढी असू शकते. चेतातंतू हे एकसलग नसतात, त्यांचे अनेक ठिकाणी विभाजन झालेले असते, अशा विभाजनामुळे त्यांचा आकार एखाद्या वृक्षासारखा दिसतो. चेताक्ष हा चेतापेशीच्या मुख्य शरीराला जोडलेला दंडगोलाकार भाग असतो. मुख्य शरीर आणि चेताक्षाच्या जोडणीच्या जागेला चेताधार म्हणतात. चेताक्षाची लांबी मनुष्यामध्ये जास्तीत-जास्त १ मीटर एवढी असू शकते (इतर काही प्राण्यांमध्ये याहीपेक्षा लांब चेताक्ष सापडतात). चेतापेशीच्या मुख्य शरीराला अनेक चेतातंतू जोडलेले असतात, परंतु चेताक्ष एकच असतो. अर्थात या एकाच चेताक्षाच्या शेकडो शाखा असू शकतात. एका चेतापेशीच्या दुसरीशी असलेल्या विद्युत जोडणीला "चेतन बिंदू" असे म्हणतात. चेतापेशींमधील संदेशवहन चेतन बिंदू मार्फत होते, सहसा एका चेतापेशीच्या चेताक्षातून दुसरीच्या चेतातंतू मध्ये हे संदेश पाठवले जातात. अर्थात या नियमाला काही अपवाद आहेत, उदाहरणार्थ काही चेतापेशींमध्ये चेतातंतू नसतात तसेच काहींमध्ये चेताक्ष नसतो, अशा परिस्थिती मध्ये "चेताक्ष ते चेताक्ष" किंवा "चेतातंतू ते चेतातंतू" अशी जोडणी असू शकते. 
उत्तर लिहिले · 18/8/2022
कर्म · 44255
0
मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी चेतापेशी (nerve cell) आहे, जिला न्यूरॉन (neuron) असेही म्हणतात. काही चेतापेशींची लांबी 1 मीटर पर्यंत असू शकते.
उदाहरणासाठी, सायटॅटिक नर्व्ह (sciatic nerve) जी पाठीच्या कण्यापासून पायांपर्यंत जाते, ती मानवी शरीरातील सर्वात लांब चेतापेशी आहे.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टच्या दोन्ही बाजूला दोन बारीक गोळ्या असतात, त्याला काय म्हणतात?
शरीरामध्ये ७० टक्के पाणी असून जखम झाल्यास पाणी का निघते?
मानवी शरीरात हाडे असतात?
शरीरातील कोणता भाग जळत नाही?
आपल्या हाडांमध्ये किती भार असतो आणि तो आपल्याला जाणवत का नाही?
कोणते अवयव लवकर कमकुवत होतात?
मानव शरीराची सर्वात मोठी पेशी कोणती?