3 उत्तरे
3
answers
शरीरातील कोणता भाग जळत नाही?
3
Answer link
बहुतेकदा हात आणि पायांची परिधीय हाडे शरीराच्या मध्यभागी, जिथे सर्वाधिक चरबी असते तितक्या तीव्रतेने जळत नाहीत.
दहन केल्यावर मनुष्याची हाडे जळतात. बहुतेक सर्व हाडांची राख होते. पण तोपर्यंत लाकडे जर पूर्ण विझली असतील तर जी मोठी हाडे असतात त्यांचा आतील काही भाग तसाच राहू शकतो.
दुसरे म्हणजे सर्व जळून गेल्यावर ज्या पोझिशन मध्ये माणसाला ठेवलेला असतो त्याच स्थितीत त्या जळलेल्या हाडांची राख बऱ्याच वेळा त्याच आकारात राहते पण त्याला हलवले तर ती राख एकदम पडते. लाकडाचेही तसेच होते त्यामुळे जळत नाहीत असा गैरसमज होऊ शकतो. कदाचित लाकडे कमी असतील तर कुठलाही भाग जळाल्या शिवाय राहू शकतो.
मी हे सर्व माझ्या आईच्या अस्थी गोळा केल्या त्यावेळी प्रत्यक्ष अनुभवलेले आहे. तिच्या फक्त गुढग्याची एक वाटी थोडीशी न जळता राहिली होती.
0
Answer link
मानवी शरीरातील दात हा भाग जळत नाही.
वैज्ञानिक कारण:
- दात हे मुख्यतः कॅल्शियम फॉस्फेट आणि इतर खनिजांपासून बनलेले असतात.
- हे घटक उच्च तापमानाला देखील टिकून राहू शकतात.
- जळण्यासाठी कार्बनिक पदार्थ (Organic matter) आवश्यक असतात, जे दातांमध्ये फारच कमी प्रमाणात असतात.
त्यामुळे, उच्च तापमानाला exposure झाल्यास दात जळून राख होण्याऐवजी ते केवळ calcify होतात.