राजकारण राज्यपाल राज्यशास्त्र

राज्यपालाच्या कार्यकाळाबद्दल माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

राज्यपालाच्या कार्यकाळाबद्दल माहिती मिळेल का?

2
राज्यपाल किंवा गव्हर्नर (Governor) हा एखाद्या देशाच्या विभागाचा (राज्य, प्रांत, इत्यादी) विभागप्रमुख आहे. भारत देशामध्ये सर्व राज्यांचे राज्यप्रमुख राज्यपाल असतात. उदा. महाराष्ट्राचे राज्यपाल. भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे. राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यापालाच्या हाती असते. राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असते.

जगात इतर अनेक देशांमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात असून प्रत्येक देशाच्या घटनेप्रमाणे राज्यपालाला विविध अधिकार असतात. अमेरिका देशाच्या सर्व राज्यांचे सरकारप्रमुख राज्यपाल असतात.राज्यपाल हा घटकराज्याचा नामधारी प्रमुख असतो.

भारतातील नियुक्ती

राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो. 

भारतीय राज्यपालपदासाठीची पात्रता

राज्यपालाच्या नेमणुकीसाठी पुढील पात्रता आवश्यक असते -

१. ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
२. त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
३. ती व्यक्ती राज्यातील किंवा केंद्रातील कायदेमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सभासद असता कामा नये समजा ती व्यक्ती कायदेमंडळाच्या कोणत्यातरी सभागृहाची सभासद असेल तर तिने राज्यपाल पद ग्रहण केल्यानंतर तिला त्या सभासदत्वाचा राजीनामा द्यावा लागतो.

भारतातील कार्यकाल

सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. मुदतीपूर्वी तो राजीनामा देऊ शकतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती राष्ट्रपती करू शकतो. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो त्या पदावर राहु शकतो.

मृत्यूने ते पद रिक्त होऊ शकते

राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात


धन्यवाद...!!
उत्तर लिहिले · 16/8/2022
कर्म · 19610
0

राज्यपालाचा कार्यकाल:

भारतीय राज्यघटनेनुसार, राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षांचा असतो. (भारतीय संविधान, अनुच्छेद १५६) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. याचा अर्थ असा की राष्ट्रपती त्यांना ५ वर्षांचा कार्यकाल पूर्ण होण्याआधीही पदावरून दूर करू शकतात.

कार्यकाल आणि इतर माहिती:

  • राज्यपालांना पुन्हा त्याच पदावर नियुक्त केले जाऊ शकते.
  • त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर करावा लागतो.
  • राज्यपालाचा कार्यकाल संपल्यानंतर, त्याच व्यक्तीला पुन्हा राज्यपाल म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2200

Related Questions

माझे पंतप्रधान कोण?
राणीचा नवरा कोण?
2025 चे उद्योग मंत्री कोण आणि पत्ता काय?
उद्योगमंत्री कोण व सध्या काय आहे?
निवडणूक कार्यालय हे कुठे असते?
पियुष गोयल यांनी राज्यसभेची निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढवली होती?
पियुष गोयल यांनी कुठून निवडणूक लढवली होती?