Topic icon

राज्यपाल

1
तुमचे खाते डिलीट करण्यासाठी:

प्रथम Facebook apps/किव्हा site open करा

 वर उजवीकडे Facebook वर टॅप करा.

 खाली स्क्रोल (जा) करा आणि सेटिंग्ज आणि गोपनीयता वर टॅप करा. , Setting


 गक्तिक आणि खाते माहिती वर टॅप करा.
Personal and my account 

 खाते मालकी आणि नियंत्रण वर टॅप करा.
My account and control

 निष्क्रिय करा आणि हटवा वर टॅप करा.
Active account and Deactivate Account 

 खाते निष्क्रिय करा वर टॅप करा.
Deactivate Account 


लगेचच account Delete होत नाही
त्या साठी 7 दिवसात तुम्ही account Open करू नका नाहीतर ते account Delete होणार नाही
उत्तर लिहिले · 8/10/2022
कर्म · 7440
2
राज्यपाल किंवा गव्हर्नर (Governor) हा एखाद्या देशाच्या विभागाचा (राज्य, प्रांत, इत्यादी) विभागप्रमुख आहे. भारत देशामध्ये सर्व राज्यांचे राज्यप्रमुख राज्यपाल असतात. उदा. महाराष्ट्राचे राज्यपाल. भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे. राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यापालाच्या हाती असते. राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असते.

जगात इतर अनेक देशांमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात असून प्रत्येक देशाच्या घटनेप्रमाणे राज्यपालाला विविध अधिकार असतात. अमेरिका देशाच्या सर्व राज्यांचे सरकारप्रमुख राज्यपाल असतात.राज्यपाल हा घटकराज्याचा नामधारी प्रमुख असतो.

भारतातील नियुक्ती

राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो. 

भारतीय राज्यपालपदासाठीची पात्रता

राज्यपालाच्या नेमणुकीसाठी पुढील पात्रता आवश्यक असते -

१. ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
२. त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
३. ती व्यक्ती राज्यातील किंवा केंद्रातील कायदेमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सभासद असता कामा नये समजा ती व्यक्ती कायदेमंडळाच्या कोणत्यातरी सभागृहाची सभासद असेल तर तिने राज्यपाल पद ग्रहण केल्यानंतर तिला त्या सभासदत्वाचा राजीनामा द्यावा लागतो.

भारतातील कार्यकाल

सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. मुदतीपूर्वी तो राजीनामा देऊ शकतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती राष्ट्रपती करू शकतो. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो त्या पदावर राहु शकतो.

मृत्यूने ते पद रिक्त होऊ शकते

राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात


धन्यवाद...!!
उत्तर लिहिले · 16/8/2022
कर्म · 19610