2 उत्तरे
2
answers
गरज म्हणजे काय? गरजेची वैशिष्ट्ये सविस्तर कशी स्पष्ट कराल?
0
Answer link
गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून,त्या कधीही न संपणाऱ्या असतात.एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पुन्हा निर्माण होते. गरजा सातत्याने निर्माण होतात.
पुनरुद्भवी गरजा
काही गरजा पुन्हापुन्हा निर्माण होतात.तर काही गरजा प्रसंगानुरूप निर्माण होतात.
वयानुसार गरजा
वेगवेगळ्या गरजा व त्यांचे समाधान वयोपरत्वे बदलत असते.
लिंगानुसार गरजा
स्त्री पुरुषांच्या गरजा अवशक्यता नुसार बदलतात.
पसंतीनुसार गरजा
प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी,आवडीनिवडी आणि पस पसंतीनुसार गरजांची निवड करतो.
हवामानानुसार गरजा
गरजा या वेगवेगळ्या हवामानानुसार, ऋतुमानानुसार बदलत असतात.
संस्कृतीनुसार गरजा
गरजा या संस्कृतीनुसार बदलत असतात.गरजांच्या निवडीवर संस्कृतीचा प्रभाव पडतो. विशेषत: आहार,वेशभूषा इत्यादी.
गरजांचे वर्गीकरण
गरजांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते.
आर्थिक आणि अर्थिकेत्तर गरजा
ज्या गरजांची पूर्तता पैशांच्या साहाय्याने केली जाते त्यांना आर्थिक गरजा असे म्हणतात.वेयक्तिकरित्या त्यांचा मोबदला पैशांच्या स्वरूपात दिला जातो.उदा. अन्न,औषध इत्यादी.
ज्या गरजा पैशाशिवाय पूर्ण करता येतात त्या म्हणजे आर्थिकेत्तर गरजा होय.उदा.हवा,सूर्यप्रकाश इत्यादी.
वैयक्तिक गरजा आणि सामुहिक गरजा संपादन करा
ज्या गरजा वेयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात त्यांना वैयक्तिक गरजा असे म्हणतात.
गरजा
- (१) गरजा अमर्यादित असतात :
गरजा कधीही न संपणाऱ्या असतात. एका गरजेची पूर्तता करीत असतानाच दुसरी गरज
निर्माण होते. (३) गरजा वयानुसार बदलतात :
गरजा व्यक्तीच्या वयोमानानुसार बदलतात. उद खेळणी, गोष्टींची पुस्तके इत्यादी लहान मुलाच्य गरजा असतात; तर संगणक, संदर्भपुस्तके इत्यादी मोठ्या वयाच्या व्यक्तीच्या गरजा असतात..
(४) गरजा लिंगभेदानुसार बदलतात:
स्त्रिया व पुरुष यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. उदा., साडी, पर्सेस इत्यादी स्त्रियांच्या गरजा असतात. शर्ट, बॅग्ज् इत्यादी पुरुषांच्या
गरजा असतात.
(५) गरजा पसंतीक्रमानुसार बदलतात : प्रत्येक व्यक्तीच्या सवयी व आवडीनिवडी
वेगवेगळे असतात. म्हणजेच व्यक्तीच्या पसंतीनुसार गरजा बदलत जातात.(५) गरजा पसंतीक्रमानुसार बदलतात :
प्रत्येक व्यक्तीच्या सवयी व आवडीनिवडी वेगवेगळे असतात. म्हणजेच व्यक्तीच्या पसंतीनुसार गरजा बदलत जातात.
(६) गरजा हवामानानुसार बदलतात :
हवामानानुसार, ऋतूनुसार देखील गरजा बदलत जातात. उदा. उन्हाळ्यात सुती कपड्यांची गरज निर्माण होते, तर हिवाळ्यात लोकरी कपड्यांची गरज निर्माण होते.
(७) गरजा संस्कृतीनुसार बदलतात :
गरजांवर संस्कृतीचाही प्रभाव पडतो. उदा., खाद्यपदार्थं, कपड्यांच्या गरजा संस्कृतीनुसार
१) सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात.
कारणे: (१) मानवी गरजा अमर्याद असतात व गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असणारी साधने मर्यादित असतात. (२) गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असणारी साधने मर्यादित असल्यामुळे काही गरजा पूर्ण होतात, तर काही गरजा पूर्ण होत नाहीत. (३) उदा. उपलब्ध उत्पन्नातून विजयने दूरदर्शन संच विकत घेतला व त्याच्याजवळील क्रयशक्ती (पैसे) संपली असता, त्याच वेळी त्याला दुचाकी वाहन विकत घेता येत नाही. त्यामुळे सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत नाहीत.नाहीत.
२) मानवी गरजा ह्या हवामान व पसंतीक्रमानुसार बदलत असतात. उत्तर:- या विधानाशी मी सहमत आहे.
कारणे : (१) गरजांवर हवामान, ऋतू, सवयी, आवडीनिवडी, पसंती इत्यादी घटकांचा मोठा प्रभाव पडतो. (२) हवामानातील बदलांनुसार गरजा बदलतात. उदा. उन्हा सुती कपड्यांची गरज निर्माण होते, तर हिवाळ्यात लोकरी कपड्यांची गरज निर्माण होते. (३) आवडीनिवडी, पसंती यांनुसार गरजांच्या बाबतीत व्यक्तींमध्ये भिन्नता आढळते. उदा., कार्यालयात नोकरी करणाऱ्या व्यक्तीस शर्ट-पँट इत्यादी औपचारिक पोशाखाची गरज असते; पाउलट, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीस टी-शर्ट, जीन्स इत्यादी अनौपचारिक/ प्रासंगिक पोशाखाची गरज असते. मानवी गरजा या हवामानानुसार व पसंतीक्रमानुसार बदलत असतात. म्हणुन,
0
Answer link
गरज (Need) म्हणजे काय:
गरज म्हणजे अशी वस्तू किंवा सेवा जी आपल्या जीवनाश्यक असते आणि ती मिळवण्याची तीव्र इच्छा आपल्या मनात असते. गरज ही मनुष्याच्या जीवनातील एक मूलभूत आणि अविभाज्य भाग आहे.
गरजेची वैशिष्ट्ये:
- अस्तित्व (Existence): गरज ही अस्तित्वात असते. ती केवळ कल्पना किंवा विचार नाही, तर ती एक वास्तविक गरज असते.
- तीव्र इच्छा (Intense desire): गरज ही एक तीव्र इच्छा असते. व्यक्तीला ती गरज पूर्ण करण्याची तीव्र इच्छा असते.
- अभाव (Lack): जेव्हा एखाद्या गोष्टीची कमतरता असते तेव्हा गरज निर्माण होते.
- प्रेरणा (Motivation): गरज व्यक्तीला कृती करण्यास प्रवृत्त करते. ती व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शन करते.
- सापेक्षता (Relativity): गरज सापेक्ष असते आणि ती व्यक्तीनुसार बदलते.
- समाधान (Satisfaction): गरज पूर्ण झाल्यावर व्यक्तीला समाधान मिळते.
उदाहरण:
उदाहरणार्थ, अन्नाची गरज. जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपल्याला अन्नाची गरज असते. ही गरज आपल्याला अन्न मिळवण्यासाठी प्रेरित करते आणि अन्न खाल्ल्यानंतर आपले समाधान होते.
टीप: गरजा या मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि त्या व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम करतात.