शिक्षण शब्दाचा अर्थ व्याकरण

धडा शिकणे या वाक्यप्रचाराचा उपयोग कसा कराल?

2 उत्तरे
2 answers

धडा शिकणे या वाक्यप्रचाराचा उपयोग कसा कराल?

0
:

एखाद्याची खोड मोडणे किंवा त्याला शिक्षा देणे.



वाक्यात उपयोग -

• नेहमी दुसऱ्यांच्या डब्यात जाणाऱ्या दिनेशला मीठ न घातलेली भाजी खाऊ घालून त्याला

धडा शिकवला.
•सतत दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करणाऱ्या मीनाक्षीला सर्वांसमोर तिला काही येत नाही हे सिद्ध करून तिच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तिला चांगलाच धडा शिकवला.

•नेहमी खोटे कारण देऊन रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणाऱ्या महेशला रात्रभर दरवाजा न उघडता बाहेरच ठेवून त्याच्या आईवडिलांनी त्याला चांगलाच धडा शिकवला.

• सतत काही ना काही कारण देऊन गृहपाठ न देणाऱ्या प्रतिभाला भर वर्गात सर्वांसमोर अपमानित करून चांगलाच धडा शिकवला.
उत्तर लिहिले · 1/7/2022
कर्म · 53750
0

'धडा शिकणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे: एखाद्या चुकीच्या अनुभवातून बोध घेणे, Improvement करणे किंवा शिक्षा होणे.


उदाहरणार्थ:
  1. परीक्षेत नापास झाल्यावर रमेशला चांगलाच धडा मिळाला, आणि त्याने अधिक अभ्यास करायला सुरुवात केली.
  2. trafficचे नियम मोडल्यामुळे पोलिसांनी दंड भरल्यावर त्याला चांगला धडा मिळाला.
  3. व्यवसायात नुकसान झाल्यावर त्याला धडा मिळाला आणि त्याने अधिक विचारपूर्वक निर्णय घ्यायला सुरुवात केली.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5220

Related Questions

भविष्यकाळी परस्मैपदी प्रत्यय?
द्वितीय गण-आत्मनेपदी धातू?
विशेषणाचे प्रकार किती व कोणते?
६ गण.प.प.लिख धातूची भूतकाळी क्रियापदे स्पष्ट करा.?
६ गण.प.प.लिख धातुची भुतकाळी क्रियापदे स्पष्ट करा.?
क्रियापदाच्या मूळ रूपाला काय म्हणतात?
दशम (१० व्या) गणाचे विकरण कोणते आहे?