प्रेरणा स्वप्न मानसशास्त्र

स्वप्न पुर्ण करणे म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

स्वप्न पुर्ण करणे म्हणजे काय?

0
 स्वप्न पूर्ण करणे म्हणजे काय

स्वप्न म्हणजे काय?
स्वप्न ही दोन प्रकारची असतात. एक जे स्वप्न ते आपल्याला झोपेत असताना पडतात आणि दुसरं जे स्वप्न ते आपल्याला झोपू देत नाही. त्यांच्या व्याख्या आपण पुढीलप्रमाणे सांगू शकतो:

झोपेत असताना पडणारी स्वप्न:
स्वप्न पडणे म्हणजे आपण झोपेत असतांना आपल्या मेंदूमध्ये अनैश्चिकपणे उद्भवणाऱ्या प्रतिमा, कल्पना, भावना आणि संवेदना होय. 

  ही स्वप्न अनेक प्रकारची असू शकतात. जसे कि भीतीदायक, आनंदी, दुःखी किंवा विचित्र म्हणजेच कधीही न अनुभवलेली असे हे झोपेत पडलेली स्वप्न.



झोपू न देणारी स्वप्न:
'झोपू न देणारी स्वप्न' हे वेगळ्या प्रकारचे स्वप्न आहे. 
 झोपल्यावर पडतात ते स्वप्न नाही, जे झोपू देत नाही ते खरं स्वप्न. - 
   झोपू न देणारी स्वप्न म्हणजे अशी स्वप्नं जे आपण जागे असताना बघितलेली असतात. ती स्वप्न आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी, आपल्या भवितव्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी आपण बघत असतो. त्यांना पुर्ण करण्यासाठी आपण धडपडत असतो. असंच एक छान स्वप्न तुमचं नक्कीच असेल. बरोबर ना! 


 
 


स्वप्न पूर्ण करणे म्हणजे काय
  प्रत्येक प्राण्याकडे मेंदू आहे. पण आकलन करण्याची आणि विचार करण्याची क्षमता ही फक्त मानवाकडे आहे. या क्षमतेच्या जोरावर मानव आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी, आपल्या भवितव्यासाठी किंवा आपल्या परिवारासाठी स्वप्न बघत असतो. 

   ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा साकार करण्यासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करत असतो आणि ते स्वप्न पुर्ण देखील करतो यालाच आपण स्वप्न पूर्ण करणे असे म्हणू शकतो.


 
   स्वप्न पूर्ण करणे म्हणजे काय हे आपण एका उदाहरणाच्या द्वारे समजून घेऊया...

--------------------------------------------

   रवी नावाचा एक मुलगा आहे. त्याचे वडील शेतकरी आहे. रवी एक मोठा अधिकारी व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे. रवीच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू नये म्हणून त्याचे वडील रात्रंदिवस शेतीत कष्ट करत आहेत.

स्वप्न पूर्ण करणे म्हणजे काय 
रवीचे एक स्वप्न आहे की तो एक मोठा अधिकारी होऊन त्याच्या वडिलांची अपेक्षा/स्वप्न पूर्ण करावे. ते स्वप्न साकार करण्यासाठी तो खूप अभ्यास करत आहे. 

  काही वर्षांनंतर रवीच्या अफाट कष्टांमुळे तो एक मोठा अधिकारी बनतो आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करतो.

--------------------------------------

वरच्या उदाहरणाद्वारे आपण समजू शकतो की स्वप्न पूर्ण करणे म्हणजे काय.




उत्तर लिहिले · 1/7/2022
कर्म · 53710
0
स्वप्न पूर्ण करणे म्हणजे ध्येय गाठणे किंवा एखादी इच्छा प्रत्यक्षात आणणे. हे एक वैयक्तिक आणि भावनात्मक उद्दिष्ट असू शकते, ज्यामुळे व्यक्तीला आनंद आणि समाधान मिळते. स्वप्न पूर्ण करण्याच्या काही व्याख्या: * ध्येय गाठणे: एखादे ध्येय निश्चित करून ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यात यश मिळवणे. * इच्छा पूर्ण करणे: मनात असलेली कोणतीतरी तीव्र इच्छा प्रत्यक्षात आणणे. * क्षमतांचा विकास: आपल्या क्षमता आणि कौशल्यांचा पुरेपूर वापर करून काहीतरी महत्त्वपूर्ण साध्य करणे. * समाधान मिळवणे: स्वतःच्या कामातून आणि ध्येयांमधून आंतरिक समाधान आणि आनंद प्राप्त करणे. स्वप्न पूर्ण करणे हे एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. यात अनेक अडचणी येतात, पण त्यावर मात करून पुढे जाणे महत्त्वाचे असते.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1780

Related Questions

मी एका मुलीवर खूप प्रेम करतो, ती पण माझ्यावर खूप प्रेम करते, पण आमचं बोलणं दोन-तीन महिन्यांनी होतं. मग मला वाटतंय हे सगळं संपून टाकावं, कारण मला तिची सारखी आठवण येते?
दोन-तीन दिवसांपूर्वी एक जण मला खूप वाईट बोलला, त्या दिवसापासून माझ्या डोक्यात तेच चालू आहे की तो मला असं का बोलला?
मी समाज किंवा जग बदलण्याचा जसा विचार केला होता, हे जग तसे नाहीये?
ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या प्रभावी पद्धती आहेत? स्वाध्याय लेखनासाठी सविस्तर माहिती द्या.
कोणत्याही व्यक्तीकडे लगेच आकर्षण होण्याची कारणे काय असू शकतात?
ताणतणावाची कारणे काय आहेत? व्यक्तीच्या जीवनातील ताण-तणावाचे मुख्य स्त्रोत कोणते आहेत?
मी लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण लोकांना माझ्या बोलण्यात काही तथ्य वाटत नाही, त्यामुळे लोक माझ्याशी बोलणे टाळतात. त्यामुळे मला माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवता येत नाही?