कायदा मानवी विकास मानवाधिकार

मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातील पाच कलमे कोणती आहेत?

2 उत्तरे
2 answers

मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातील पाच कलमे कोणती आहेत?

0



कलम २: या जाहीरनाम्यात नमूद केलेले सर्व अधिकार व सर्व प्रकारचे स्वातंत्र्य प्रत्येकास आहे व त्या बाबतीत वंश, वर्ण, स्त्री-पुरुषभेद, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मतप्रणाली, राष्ट्रीय किंवा सामाजिक मूलस्थान, संपत्ती, जन्म किंवा इतर दर्जा यासारखा कोणताही भेदभाव केला जाता कामा नये.


कलम ३: प्रत्येकास जगण्याचा, स्वातंत्र्य उपभोगण्याचा व सुरक्षित असण्याचा अधिकार आहे.

कलम ४ : कोणालाही गुलामगिरीत किंवा दास्यात ठेवता कामा नये; सर्व प्रकारच्या गुलामगिरीस व गुलामांच्या व्यापारास मना‌ई-करण्यात आली पाहिजे.


कलम ४ : कोणालाही गुलामगिरीत किंवा दास्यात ठेवता कामा नये; सर्व प्रकारच्या गुलामगिरीस व गुलामांच्या व्यापारास मनाई करण्यात आली पाहिजे

कलम ५: कोणाचाही छळ करता कामा नये. किंवा त्यास क्रूर, अमानुष किंवा कमीपणा आणणारी वागणूक देता कामा नये.


कलम ६: प्रत्येकाला सर्वत्र कायद्याच्या दृष्टीने माणूस म्हणून मान्यता मिळण्याचा अधिकार आहे.

कलम ७: सर्व लोक कायद्याच्या दृष्टीने समान आहेत व कोणताही भेदभाव न करता कायद्याचे समान संरक्षण मिळण्याचा त्यांना हक्क आहे .


कलम ९: कोणालाही अटक, स्थानबद्ध किंवा हद्दपार करता कामा नये.

कलम ११: दंडनीय अपराधाचा आरोप ज्यावर ठेवण्यात आला आहे अशा प्रत्येक इसमास जाहीर न्याय चौकशीत तो दोषी असल्याचे सिद्ध होईपर्यंत, तो निरपराध आहे असे गृहीत धरले जाण्याचा अधिकार आहे.


कलम १३: प्रत्येकास प्रत्येक राष्ट्राच्या हद्दीत संचार व वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे.

कलम १५: प्रत्येकांस राष्ट्रीयत्व मिळण्याचा अधिकार आहे. कोणाचेही राष्ट्रीयत्व स्वच्छंदतः हिरावून घेतले जाता कामा नये, तसेच कोणासही आपले राष्ट्रीयत्व बदलण्याचा अधिकार नाकारता कामा नये.


कलम १९: प्रत्येकास मत स्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे.

कलम २१: प्रत्येकास आपण स्वतः अथवा आपल्या इच्छेनुरूप निवडलेल्या आपल्या प्रतिनिधीमार्फत आपल्या देशाच्या शासनात भाग घेण्याचा अधिकार आहे. प्रत्येकास आपल्या देशाच्या शासकीय सेवेत प्रवेश मिळण्याचा समान अधिकार आहे.


कलम २३: प्रत्येकास काम मिळण्याचा, आपल्या इच्छेनुरूप काम निवडण्याचा, कामाच्या न्याय्य व अनुकूल शर्तींचा फायदा मिळवण्याचा व बेकारीपासून संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे. कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता प्रत्येकास समान कामाबद्दल समान वेतन मिळण्याचा अधिकार आहे.

कलम २६: प्रत्येकास शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे. निदान प्राथमिक व मूलावस्थेतील शिक्षण मोफत असले पाहिजे, माध्यमिक शिक्षण सक्तीचे असले पाहिजे.


>> भारतीय संविधानाच्या भाग-३ मध्ये भारतीय नागरिकांसाठी मूलभूत हक्क व अधिकार नमूद करण्यात आले आहेत. भारतीय संविधानाने प्रदान केलेले मुलभूत अधिकार:

१. समतेचा अधिकार


२. स्वातंत्र्याचा अधिकार

३. शोषणाविरुद्धचा अधिकार


४. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार

५. संस्कृती व शिक्षणाचा अधिकार


६. न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार

    

उत्तर लिहिले · 29/6/2022
कर्म · 53750
0

मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातील पहिली पाच कलमे खालीलप्रमाणे आहेत:

  1. कलम 1: सर्व माणसे स्वतंत्र आणि समान जन्माला आले आहेत. त्यांना विचारशक्ती आणि सद्सद्विवेकबुद्धी आहे; त्यामुळे त्यांनी एकमेकांशी बंधुभावाने वागावे.
  2. कलम 2: या जाहीरनाम्यात नमूद केलेले सर्व अधिकार आणि स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीस वंश, वर्ण, लिंग, भाषा, धर्म, राजकीय विचार, राष्ट्रीयत्व, मालमत्ता, जन्म किंवा इतर कोणत्याही आधारावर कोणताही भेदभाव न करता प्राप्त आहेत.
  3. कलम 3: प्रत्येक व्यक्तीला जीवन, स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेचा अधिकार आहे.
  4. कलम 4: कोणालाही गुलामगिरीत किंवा वेठबिगारीत ठेवले जाणार नाही; गुलामगिरी आणि गुलामगिरीच्या व्यापारावर पूर्णपणे बंदी असेल.
  5. कलम 5: कोणालाही क्रूर, अमानुष किंवा अपमानजनक वागणूक दिली जाणार नाही.

अधिक माहितीसाठी, संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी हक्क उच्चायुक्तालयाच्या (OHCHR) वेबसाइटला भेट द्या: मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा (UDHR)

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 4820

Related Questions

Give thedefinition of human rights and explain the role of social reformsers to protecting human rights?
मानवी हक्कांची ऐतिहासिक प्रगती आणि विकास?
मानवी हक्कांसाठी समाजसुधारकांचे योगदान?
मानवी हक्कासाठी हक्कांची व्याख्या मानवी हक्कांसाठी समाजसुधारकांचे योगदान?
ये जाहीरनामा मानवी हक्काचा आंतरराष्ट्रीय जाहीरनामा 1948 चे महत्व स्पष्ट करा?
हिंदू धर्माचा मानवाधिकार विषयी दृष्टिकोन काय आहे?
मानवाधिकार कार्यालय कुठे आहे?