2 उत्तरे
2
answers
ग्रंथालय म्हणजे काय?
2
Answer link
ग्रंथालय म्हणजे काय
ग्रंथालय म्हणजे ग्रंथसंग्रहाचे स्थान. ग्रंथालय ही प्राचीन सामाजिक संस्था असून तिला मोठा इतिहास आहे आणि तो मानवसंस्कृतीशी समांतर आहे. ग्रंथवाचक आणि ग्रंथालयातील सेवक हे ग्रंथालयाचे तीन प्रमुख घटक होत. या घटकांचे स्वरूप व त्याविषयाच्या कल्पना कालमानानुसार बदलत गेल्याचे आढळून येते. याबरोबरच ग्रंथालयाची वास्तू, ग्रंथालयीन प्रशासन, आंतरग्रंथालयीन सहकार्य व आंतरराष्ट्रीय ग्रंथालयीन संघटना इ. घटकही आधुनिक ग्रंथालयविचारात येतात. ग्रंथालयाचे प्रकार आणि कार्य यांचाही विचार या संदर्भात महत्त्वाचा असतो.
प्राचीन ग्रंथालयात इष्टिका,पपायरस व चामडे यांवर लिहिलेले ग्रंथ असत. त्यात पुढे हस्तलिखित ग्रंथांची व नंतर मुद्रित ग्रंथांची भर पडली. आधुनिक ग्रंथालयांत ग्रंथांबरोबर नियतकालिके, कागदपत्रे, हस्तलिखिते,नकाशे, छायाचित्रे, शिल्पाकृती, शिलालेख, नाणी, तिकीटे, ध्वनिमुद्रिका, मुद्रित फीता, सूक्ष्मपट (मायक्रोफिल्म), सूक्ष्मपत्र (मायक्रोकार्ड), लेखछायाचित्रे, कात्रणे इ. प्रकारचे दृक्श्राव्य ज्ञानसाहीत्य संग्रहीत केले जाते. प्राचीन ग्रंथालयातील इष्टिका, शिला, चर्म अथवा तत्सम साधनांद्वारे तयार केलेले ग्रंथ दुर्मिळ असल्यामुळे त्यांचे रक्षण करणे एवढेच कार्य ग्रंथपालाला यापूर्वी असे; परंतु आधुनिक युगात ग्रंथ सुलभ झाल्यामुळे ग्रंथपालाच्या कार्याची व्याप्ती वाढली आहे. वाचकांना ग्रंथांचा अधिकाअधिक उपयोग करू देऊन ज्ञानाचा प्रसार समाजात कसा करता येईल, वाचकांशी आपुलकीने वागून त्यांच्या जिज्ञासा व गरजा तत्परतेने कशा पुऱ्या करता येतील, जिज्ञासूंना यथायोग्य मार्गदर्शन करून ज्ञान, मनोरंजन तसेच नागरिकत्वाची व सुसंस्कृतपणाची जाणीव त्यांच्यात कशी वाढेल, त्यांचे व्यक्तिमत्त्व सुसंपन्न कसे होईल यांसाठी सदैव सिद्ध राहणारा ग्रंथपाल आजच्या ग्रंथालयाचा प्रमुख घटक मानला गेला आहे.
रम्य व सोयीची जागा, तज्ञ व तत्पर ग्रंथपाल, उपयुक्त ग्रंथांचा संग्रह, ग्रंथांची शास्त्रशुद्ध रचना व आर्थिक सुस्थिरता ही आदर्श ग्रंथालयाची पाच महत्त्वाची अंगे मानली जातात. अशा ग्रंथालयाकडून पुढील कार्याची अपेक्षा करण्यात येते : (१) शैक्षणिक कार्य : समाजातील कोणत्याही लहान-मोठ्या, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत व्यक्तीला स्वतः ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ज्ञान-साहित्य उपलब्ध करून देणे. (२) संशोधनात्मक कार्य : प्रत्येक विषयावर संशोधनयोग्य असे अद्ययावत ज्ञानसाहित्य संग्रहित करणे. (३) राजकीय कार्य : स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरील माहिती कोणताही पूर्वग्रह न बाळगता सर्वांना उपलब्ध करून देणे. (४) औद्योगिक कार्य : उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक ती माहिती, नवे विचार, वैज्ञानिक व तांत्रिक संशोधन यांची अद्ययावत माहिती संशोधक, संयोजक व तंत्रज्ञ यांना उपलब्ध करून देणे. (५) सांस्कृतिक कार्य : भावी पिढ्यांसाठी ज्ञान जतन करून ठेवणे. या गोष्टी लक्षात घेता ग्रंथालय म्हणजे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा मानदंड होय, असे म्हणावे लागेल.
ग्रंथालयांचा इतिहास
जागतिक ग्रंथालये : अलीकडील उत्खननांत प्राचीन काळातील शहरांचे जे अवशेष सापडले त्यांवरून जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथालये सुमेरियन व बॅबिलोनियन संस्कृतींच्या काळात अस्तित्वात होती, असे सिद्ध होते. उदा., ख्रि. पू. २७०० वर्षे धार्मिक व शासकीय ग्रंथालये होती. टेयो येथील एका ग्रंथालयात तीस हजार ग्रंथ होते. चुनखडीपासून तयार केलेल्या विटांवर, धातू अथवा लाकूड यांपासून तयार केलेल्या लेखणीने क्यूनिफॉर्म लिपीत लिहिलेल्या इष्टिकाग्रंथांचा संग्रह म्हणजे जगातील पहिला ग्रंथसंग्रह होय. धार्मिक वचने, प्रार्थना, मंत्रतंत्र, लोककथा, न्यायनिवाडे यांबरोबरच तत्कालीन सामाजिक, राजकीय व तात्त्विक वाङ्मयाचे नमुनेही या इष्टिकाग्रंथात आढळले आहेत.
0
Answer link
ग्रंथालय म्हणजे पुस्तके, लेख, चित्रपट, संगीत आणि इतर माहिती स्रोतांचा संग्रह असतो, जो लोकांना वाचण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी उपलब्ध असतो.
ग्रंथालयांचे प्रकार:
- सार्वजनिक ग्रंथालय: हे लोकांसाठी खुले असतात.
- शैक्षणिक ग्रंथालय: हे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये असतात.
- विशेष ग्रंथालय: हे विशिष्ट विषयांवर आधारित असतात.
ग्रंथालयाचे फायदे:
- ज्ञान आणि माहितीचा प्रसार.
- शिक्षणाला प्रोत्साहन.
- संशोधनाला मदत.
- सांस्कृतिक जतन.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: