2 उत्तरे
2
answers
मूल्यमापन म्हणजे काय?
1
Answer link
मूल्यमापन म्हणजे केवळ निरीक्षण नव्हे तर एक वस्तुनिष्ठ पद्घतशीर प्रक्रिया आहे. ज्या शैक्षणिक कार्यक्रमाचे मूल्यमापन करावयाचे असते, त्या कार्यक्रमाची काही उद्दिष्टे अगोदर ठरविलेली असतात.
: मूल्यमापन म्हणजे केवळ वेगवेगळी साधने तयार करून त्यांच्या साहाय्याने मिळविलेले वृत्त नव्हे. ती एक प्रक्रिया असून उदयोगधंद्यांमध्ये ज्या तृहेने विचार करतात, तसाच विचार शिक्षणामध्येही करणे आवश्यक मानले जाते. उदा., या व्यवहारामध्ये कोणती गुंतवणूक करण्यात आलेली आहे, या व्यवहारातील प्रकियेचे स्वरूप काय आहे, तसेच या प्रकियेचे फलित कोणते आहे अशा तृहेने विचार करणे शिक्षणामध्येही आवश्यक असते. गुंतवणूक प्रक्रिया फलित या पद्धतीने मूल्यमापनाची काही सर्वसाधारण तत्त्वे पुढीलप्रमाणे सांगता येतील : (अ) आपण मूल्यमापन कशासाठी करतो आहोत, हे नक्की ठरल्याखेरीज मूल्यमापनाची साधने तयार करू नयेत किंवा वापरू नयेत. (ब) वेगवेगळी उद्दिष्टे तपासण्यासाठी वेगवेगळी मूल्यमापनसाधने वापरावी लागतात. उदा., रसायनशास्त्रातील ज्ञानाची प्रगती तपासत असताना केवळ लेखी परीक्षा पुरेशी ठरणार नाही. त्यासाठी प्रयोगपरीक्षेचाही अवलंब करावा लागेल. एम्.फिल्., पीएच्.डी.सारख्या परीक्षांमध्ये लेखी परीक्षेबरोबर तोंडी परीक्षा, स्वतंत्रपणे प्रबंध लिहिण्याची परीक्षा अशा अनेक गोष्टी सामावलेल्या असतात. उद्दिष्टांशी सुसंगत अशीच मूल्यमापनसाधने निवडावी लागतात. (क) सर्वसमावेशक मूल्यमापनासाठी एकाच मूल्यमापनसाधनाचा उपयोग करून चालत नाही. विदयार्थ्यांची जी विविधांगी प्रगती झालेली असते, तिचे सम्यक चित्र हवे असल्यास विविध मूल्यमापन तंत्रांचा उपयोग करावा लागतो. (ड) प्रत्येक मूल्यमापनसाधनाचे काही एक वैशिष्टय् असते, तसेच त्याची काहीएक मर्यादाही असते. त्यामुळे एखादे साधन किंवा तंत्र वापरताना त्याच्या या दोन्ही बाजू लक्षात घेणे इष्ट ठरते. लेखी परीक्षेचा वापर केला असता त्यातून कारक-कौशल्ये तपासली जाणार नाहीत, हे उघडच आहे. तसेच प्रयोगशाळेतील प्रयोगातून विदयार्थ्याने योग्य अभिवृत्ती धारण केली की नाही, ते कळेलच असे नाही. (इ) अलीकडच्या काळात संपूर्ण शैक्षणिक प्रक्रिया परीक्षार्थी झाली आहे, असे वाटते. प्रत्येक गोष्ट ही परीक्षेतील यशाक रिता व त्यामुळे मिळणाऱ्या प्रतिष्ठेकरिता चाललेली आहे, असे दिसते. मूल्यमापनाचा हा विपरीत परिणाम म्हटला पाहिजे. मूल्यमापन हे साध्य नव्हे, ते साधन आहे. (फ) मूल्यमापनाकरिता वेगवेगळ्या साधनांप्रमाणेच वेगवेगळ्या पद्धतीही वापरता येतात. उदा., चाचण्या घेणे, स्वयं अहवाल-तंत्रे आणि निरीक्षणतंत्रे वापरणे इत्यादी. मूल्यमापनासाठी साधनांचे प्रकार आणि ती वापरावयाची तंत्रे या दोहोंचाही साकल्याने विचार करावा लागतो.
0
Answer link
मूल्यमापन (Evaluation) म्हणजे काय:
मूल्यमापन म्हणजे एखाद्या गोष्टीची गुणवत्ता, महत्त्व, उपयुक्तता किंवा मूल्यमापन करण्याची प्रक्रिया होय. हे एक पद्धतशीर प्रक्रिया आहे ज्यामध्ये माहिती गोळा करणे, विश्लेषण करणे आणि त्या आधारावर निष्कर्ष काढणे समाविष्ट असते.
मूल्यमापनाची व्याख्या:
- एखाद्या वस्तूची किंमत ठरवणे.
- एखाद्या व्यक्तीच्या कामाचे मूल्यमापन करणे.
- शैक्षणिक कार्यक्रमांचे मूल्यमापन करणे.
- नवीन धोरणांचे मूल्यमापन करणे.
मूल्यमापनामुळे सुधारणा करता येतात आणि चांगले निर्णय घेण्यास मदत होते.
मूल्यमापनाचे काही सामान्य प्रकार:
- फॉर्मेटिव्ह्ह मूल्यमापन (Formative evaluation): हे मूल्यमापन प्रक्रिया सुधारण्यासाठी केले जाते.
- समेटिव्ह्ह मूल्यमापन (Summative evaluation): हे मूल्यमापन अंतिम निष्कर्षांवर आधारित असते.
- डायग्नोस्टिक मूल्यमापन (Diagnostic evaluation): हे मूल्यमापन अडचणी आणि समस्या ओळखण्यासाठी केले जाते.
मूल्यमापनामध्ये वस्तुनिष्ठता (objectivity) आणि अचूकता (accuracy) असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता: