शिक्षण अध्ययन

अध्ययन म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

अध्ययन म्हणजे काय?

0
अध्ययन म्हणजे काय व्याख्या
'सराव आणि अनुभव यांच्या द्वारे वर्तनात घडून येणारे सापेक्षत: टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन होय. ' 'अध्ययन म्हणजे नवीन प्रतिक्रियेचे संपादन आणि जुन्या प्रतिक्रियेचे विस्तारित प्रवर्तन म्हणजे अध्ययन होय

💡अध्ययन म्हणजे काय?
व्याख्या :-
"सराव किंवा अनुभव यांच्याद्वारे वर्तनात घडून येणारे सापेक्षता टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन होय."
   या व्याखेवरून आपल्याला लक्षात येईल की अध्ययनामुळे वर्तनात सुधारात्मक बदल होत असतात. अध्ययनाने घडणारे बदल ही टिकाऊ स्वरूपाचे असतात.

🎯अध्ययनाचे प्रकार
1.शाब्दिक अध्ययन -
2.कारक अध्ययन -
3.समस्या परिहार -
1.शाब्दिक अध्ययन -
"शब्दाचा वापर भाषेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अध्ययनाला भाषिक अध्ययन असे म्हणतात." 
    शाब्दिक अध्ययनात लिहिणे, वाचणे, बोलणे, उतारा वाचन करणे, कविता पाठांतर करणे, हे शाब्दिक अध्ययनाचे उदाहरणे आहेत. शाब्दिक अध्ययन मानवला मिळालेले एक वरदान आहे. कारण मानवाजवळ शब्दसंपत्ती किंवा शब्दसंग्रह असतो. म्हणून याचा वापर करून, शाब्दिक अध्ययन करणे सोपे जाते. शालेय जीवनात महाविद्यालयांमध्ये शाब्दिक अध्ययनाला याला खूप महत्व असून त्याशिवाय अध्ययन प्रभावी होत नाही.

2. कारक अध्ययन।Motor Learning
"शारीरिक हालचालीमधून किंवा स्नायूंच्या हालचाली च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अध्ययनाला कारक अध्ययन असे म्हणतात." 
  या अध्ययन प्रकारात विविध क्रीडा प्रकार, वाद्य वाजवणे, यंत्र हाताळणी, भरतकाम ,विणकाम इ. कारक अध्ययनाचा वापर यामध्ये होतो. कारकअध्ययन पद्धती मानवेतर प्राणी यांना जास्त प्रमाणात उपयोग करताना आढळून येते.

3.समस्या परिहार
  आपल्याला शाब्दिक अध्ययन आणि कारक अध्ययन या दोन्ही पद्धतीमध्ये योग्य प्रतिक्रिया कोणती आणि योग्य प्रतिक्रिया कोणती याची ओळख लगेच होते. परंतु 

"समस्या परिहार या अध्ययन पद्धतीमध्ये अनेक प्रतिक्रियांमधून अचूक प्रतिक्रिया शोधून काढावी लागते आणि त्याच्या वरील प्रश्नांची उकल शोधून उत्तर शोधून काढावे लागते. यालाच समस्या परिहार अध्ययन पद्धती असे म्हटले जाते." 

 
    म्हणजे अनेक वेगवेगळे गुंतागुंतीचे प्रश्नांमधून योग्य त्या त्या प्रश्नाचे उत्तर शोधून उत्तर किंवा मार्ग काढावा लागतो. यालाच समस्या पर्याय परिहार अध्ययन पद्धती असे म्हणतात.

उत्तर लिहिले · 27/6/2022
कर्म · 53750
0

अध्ययन म्हणजे नवीन ज्ञान, कौशल्ये, क्षमता, मूल्ये आणि समज प्राप्त करण्याची प्रक्रिया.

हे खालील प्रकारे घडू शकते:

  • शिकणे: पुस्तके, शिक्षक किंवा इतर स्त्रोतांकडून माहिती मिळवणे.
  • अनुभव: प्रत्यक्ष कृतीतून किंवा अनुभवातून शिकणे.
  • प्रशिक्षण: विशिष्ट कौशल्ये शिकण्यासाठी आयोजित केलेले कार्यक्रम.

अध्ययन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जी आपल्याला आयुष्यभर नवीन गोष्टी शिकण्यास आणि विकसित होण्यास मदत करते.

अध्ययनाचे काही महत्त्वाचे पैलू:

  • ज्ञान आणि माहिती मिळवणे.
  • कौशल्ये विकसित करणे.
  • समस्या सोडवण्याची क्षमता वाढवणे.
  • सर्जनशीलता आणि कल्पनाशीलता वाढवणे.
  • व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5220

Related Questions

अध्ययन म्हणजे काय? अध्ययनाचे स्वरूप, वैशिष्ट्ये आणि मूलभूत तत्वे स्पष्ट करा.
अध्ययन म्हणजे काय? अभिजात अभिसंधान सविस्तर स्पष्ट करा?
लक्षात ठेवण्यासाठी काय करावे?
अध्ययनाचे मानसशास्त्र म्हणजे काय? अध्ययनावर परिणाम करणारे घटक सविस्तर स्पष्ट करा.
ज्ञान कसे वाढवावे?
वाचलेलं लक्षात राहण्यासाठी काय करायचं?
जनरल नॉलेज वाढवण्यासाठी काय करता येईल?