2 उत्तरे
2
answers
केली म्हणून मला शिव्या ठरवण्याचे ते निष्कर्ष कसे स्पष्ट कराल?
0
Answer link
शिव्या
शिवी म्हणजे दुसऱ्या माणसाचा अपमान करण्यासाठी त्याला दुखावतील असे असभ्य, अश्लील किंवा अपमानकारक शब्द वापरून टोचून बोलणे. शिव्यांचा वापर हा स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो. सार्वजनिक ठिकाणी शिवराळ बोलणे असभ्य समजले जाते, तरीही शिव्या या प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असतात. इतर भाषांप्रमाणेच मराठी भाषेतदेखील अनेक प्रकारच्या शिव्या रूढ झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये निखळ मराठी शिव्या ऐकावयास मिळतील. बाकीच्या भागातील शिव्यांवर हिंदीचा प्रभाव दिसून येतो. साहित्यात किंवा लिखित स्वरुपात शिव्या उतरविणे हे असभ्य समजले जाते. अनेक असभ्य समजणाऱ्या शिव्या या भ या शब्दापासून सुरू होतात म्हणून कोणी यास भकार शब्द असेही म्हणतात.
रागातून, तिरस्कारातून एखाद्या व्यक्तीची, समूहाची, किंवा परिस्थितीची मानखंडना करण्यासाठी शिवी दिली जाते. कधीकधी कारण नसताना पुरूषार्थाचा, पुरूष असण्याचा भाग म्हणून किंवा शाब्दिक सवयीचा भाग म्हणूनही शिव्या दिल्या जातात. शिवी देताना दुसरी व्यक्ती, समूह वा परिस्थिती यांच्या स्त्री नात्यांच्या संदर्भात संभोग वा लिंगनिदर्शक समाज अमान्य अशी वाचिक क्रिया शिवी देताना केली जाते.
प्रमाणभाषेमध्ये शिव्या स्पष्ट लिहू नयेत किंवा वानगीदाखल घ्याव्यात किंवा फुल्या फुल्या लिहाव्यात असा प्रघात आहे.
शिव्या या धर्मावरून, जातीवरून, व्यवसायावरून, शारीरिक आणि मानसिक व्यंगावरून, जनावरांवरून देता येतात. प्रियजनांवरून, लैंगिकतेवरून व विशेषतः या दोहोंच्या एकत्रीकरणातून दिलेल्या शिव्या सर्वांत जास्त अपमानकारक समजल्या जातात. शिवी खाणाऱ्याच्या मातृत्वाबरोबरच्या संबंधाला भाषिक रूपात आव्हान दिले जाते. हे सहन न झाल्याने शिवी लागते, मानखंडना होते असे म्हटले जाते.
प्रकार
धर्म व जातिवाचक शिव्या
भारतात बरेचदा एखाद्याला कनिष्ठ जाति-धर्माचा मानून त्याच्या जातीचा किंवा धर्माचा उल्लेख शिवी म्हणून केला जाई. कायद्यानुसार असे करणे गुन्हा समजले जाते.[ संदर्भ हवा ]
कृपा करून अशा शिव्या (विशेषतः जातिवाचक) येथे उद्धृत करू नयेत. असे केल्यास विकिपीडियावर भारतीय कायद्यानुसार (ऍट्रोसिटीज ऍक्ट, इ.) कारवाई होउ शकते. चर्चा पानावरील 'धर्म व जातिवाचक शिव्या हा विभाग पहा.'
त्यातल्यात्यात थोड्या साध्या शिव्यांची उदाहरणे
गाढव, नालायक, बेशरम, हरामखोर, हलकट, चावट, कृतघ्न, बावळट, मूर्ख, बेअक्कल, पागल
0
Answer link
मला माफ करा, मला तुमच्या प्रश्नाची नोंद नाही. अधिक उपयुक्त प्रतिसाद देण्यासाठी, कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा किंवा वेगळ्या पद्धतीने मांडा.