2 उत्तरे
2
answers
दगडी रोग होऊ नये, म्हणून दूध काढण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?
0
Answer link
स्तनदाह : या रोगात कास दगड टणक होते . खूप या रोगाला दगडी म्हणतात . मध्ये कसेला सुज कास लाल होते . दुध अत्यंत तीव्र किंवा लालसर तर कधी पुमिश्री वी . जनावर कासेला हात लावु देत नाही .
उपाय : ज्याला सडातुन खराब दुध वेडा त्या सडातल्या संपुर्ण दुध काढुन घ्याव्यात आणि त्या सदात प्रतिजैविकाची टयुब सोडावी , असे ४ ते ५ दिवस करावे . दुध काढण्यापुर्वी कास सेव्हलॉनच्या द्रावणाने धुवून सडावर काही मुले असल्यास त्यांची योग्य ती काळजी घ्यावी .
कासदाह होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी
दगडी रोग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी
1) गोठ्याची स्वच्छता रोज ठेवावी. गोठा कोरडा ठेवल्याने जिवाणूंचा प्रादुर्भाव कमी होतो.
2) गोठ्यात हवा खेळती असावी. सूर्यकिरण आतपर्यंत येतील अशी गोठ्याची रचना असावी.
3) दूध काढणाऱ्या माणसाने आपले हात स्वच्छ साबणाने धुऊन घ्यावेत.
4) दूध काढण्यापूर्वी कासेला पोटॅशियम परमॅगनेटच्या द्रावणाने स्वच्छ करावे.
5) कास आणि सड धुतल्यावर दूध काढण्यापूर्वी व दूध काढल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यावेत.
6) दूध काढण्याचे यंत्र वापरण्यापूर्वी व वापर झाल्यानंतर स्वच्छ करावे.
7) दूध काढण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ असावीत.
8) दूध काढताना चारी बोटे सडावर समान दाबाने आणि अंगठा आकाशाच्या दिशेने ठेवावा.
9) दूध काढल्यानंतर गाई, म्हशीला लगेच जमिनीवर बसू देऊ नये. त्यांना हिरवा चारा खाण्यास द्यावा.
10) दूध काढण्यापूर्वी गाईला किंवा म्हशींना कोरडा खुराक द्यावा.
11) वासरू दूध पीत असेल तर कासेला किंवा सडाला जखम होणार नाही याची काळजी घ्यावी.
13) गाय, म्हैस व्यायल्यानंतर चीक लगेचच काढावा.
14) गाई, म्हशीची सुरवातीची व शेवटची धार दुधाच्या भांड्यात न घेता वेगळी काढावी.
15) जास्त दूध देणाऱ्या गाईंची धार दिवसातून ठराविक अंतराने 3 ते 4 वेळेस काढावी.
16) दुधाळ गाईचे धारा काढण्याचे रोजचे वेळापत्रक पाळावे.
17) कास किंवा सडामध्ये दूध शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी.
18) कासदाह झालेल्या गाई, म्हशीचे दूध शेवटी काढावे.
19)) दुधाबद्दल शंका वाटत असेल तर लगेच पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.
0
Answer link
दुभत्या जनावरांना दगडी रोग होऊ नये म्हणून दूध काढण्यापूर्वी घ्यावयाची काळजी:
- जनावरांची स्वच्छता:
- दूध काढण्यापूर्वी जनावरांचे शरीर आणि विशेषतः मागचा भाग व कास स्वच्छ पाण्याने धुवावा.
- कास आणि सडांवरील केस काढावेत, ज्यामुळे घाण जमा होणार नाही.
- दूध काढणाऱ्या व्यक्तीची स्वच्छता:
- दूध काढणाऱ्या व्यक्तीने आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
- नखे कापलेली असावीत.
- उपकरणे निर्जंतुकीकरण:
- दूध काढण्याची भांडी आणि इतर उपकरणे निर्जंतुक करावीत.
- त्यासाठी गरम पाण्याचा किंवा निर्जंतुकीकरण द्रव्यांचा वापर करावा.
- सडांची तपासणी:
- दूध काढण्यापूर्वी सडांना सूज किंवा लालसरपणा आहे का ते तपासावे.
- असा कोणताही बदल दिसल्यास पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.
- पहिला धार काढावी:
- दूध काढताना सुरुवातीची धार (milk strip) खाली काढावी, ज्यामुळे सडांमधील जंतू बाहेर निघून जातील.
या उपायांमुळे जनावरांना दगडी रोग होण्याचा धोका कमी होतो आणि दुधाची गुणवत्ता सुधारते.
अधिक माहितीसाठी, आपण पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.