पर्यावरण स्वमत संवाद

माणूस व झाड एकमेकांशी बोलत आहेत, अशी कल्पना करू. त्यांच्यातील संवाद थोडक्यात कसा लिहाल?

3 उत्तरे
3 answers

माणूस व झाड एकमेकांशी बोलत आहेत, अशी कल्पना करू. त्यांच्यातील संवाद थोडक्यात कसा लिहाल?

1
एकदा  एक माणूस झाड तोडायला गेला तर ते झाड म्हणाल मला तोडू नका मी तुमा सगळ्यांना हवा श्वास असे इत्यादी फळे देतो आम्हा सगळ्यांना काही तोडू नका तर माणूस म्हणाला माफ कर झाड देवा तू आमच्यासाठी फळं जेवायला काही पण देतो परत आम्ही तुम्हाला तोडतो मी सगळ्या गाव कारण सांगतो व ते झाड तोडू नका सुकलेले झाड तोडा मला तोडले तर    माणसाचं म्हणजे तुमचं नुकसान करून घेता. मी भर उन्हात पावसात थंडीत मी जमिनीवर पाय रोवून उभा आहे मी तुमचं नुकसान तर करत नाही ना उलट मी उन्हातून पावसातून डोक्यावर सावली धरतो  माझ्यामुळे तर माणूस या जमिनीवर श्वास घेतो आहे . तुम्ही जेव्हा मला इजा करता तेव्हा मला किती त्रास होत असेल
माणसाला जरा लागले कि त्रास होतो डोळ्यातून पाणी येत तसंच आमचं झाडाच आहे आम्हाला हि भावना आहेत मन आहे  आमच्या हि डोळ्यातून पाणी येत  आता तुम्ही म्हणाल झाड रडत ते आम्हाला दिसत नाही मी माणसारखा रडत नसलो तरी जेव्हा झाडावर पहिला घाव घालतो तेव्हा पटकन पाणी येत जसं माणसाच्या डोळ्यांतून पटकन टचकन पाणी येत तसं जसा माणसाला भावना आहेत तशाच आम्हाला झाडांना भावना आहेत झाड 🌲 म्हणून मी सांगतो 🌲 लावा मी सदैव माणसाला सुखी आयुष्य देईन  एक झाड 🌲 लावा मी माणसाच्या मुलांपर्यंत त्यांची काळजी घेईन
झाड 🌲 मला तोडू नका  झाड 🌲 आहे तर माणसा तु आहेस हे लक्षात असु दे.
झाड 🌲🌲 लाव माणसा.
उत्तर लिहिले · 19/6/2022
कर्म · 53710
0
धन्यवाद.
उत्तर लिहिले · 19/6/2022
कर्म · 5
0

माणूस: काय झाडदादा, कसे आहात?

झाड: मी ठीक आहे. तू कसा आहेस? खूप दिवसांनी आलास!

माणूस: होय, जरा कामात व्यस्त होतो. श्वास घ्यायला उसंत मिळत नाही. तुमच्यामुळेच आम्हाला शुद्ध हवा मिळते, हे विसरून कसे चालेल?

झाड: अरे, त्यात काय एवढे! ते तर माझे कामच आहे. पण मला एक खंत आहे, माणसे आता झाडे तोडत आहेत, नवीन लावत नाही.

माणूस: हो, ते खरे आहे. विकास महत्त्वाचा आहे, पण पर्यावरणाचा ऱ्हास करून नको. आम्ही लवकरच झाडे लावण्याची मोहीम सुरु करणार आहोत.

झाड: ते ऐकून खूप आनंद झाला. तुमच्या प्रयत्नांना यश मिळो, हीच माझी इच्छा!

माणूस: धन्यवाद झाडदादा! येतो मी आता.

झाड: ठीक आहे, भेटत राहा.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1200

Related Questions

परिणामकारक बोलता येण्यातील अडथळे स्पष्ट करा?
मानवी जीवनात संवादाचे महत्त्व याविषयी तुमचे मत लिहा?
संज्ञापन म्हणजे काय, ते सांगून संज्ञापन प्रक्रियेचे विविध प्रकार कोणते ते सांगा?
जाहीर सभा आणि बंदिस्त सभागृहातील भाषांविषयी माहिती द्या?
संज्ञापन क्रांतीमुळे पूर्वीच्या तुलनेत काय बदल घडले आहेत?
लिखित आणि मौखिक संदेशवहनातील फरक स्पष्ट करा?
व्यवसाय संदेशवहनाची उद्दिष्ट्ये लिहा?