2 उत्तरे
2
answers
पालकत्वाची जबाबदारी देण्यासाठी आवश्यक असलेले निकष स्पष्ट करा?
0
Answer link
पालकांनी फक्त मुलांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्याला घडविण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आपल्या अंगी बाळगण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असे पालक आपल्या मुलांना योग्य दिशेने घेऊन जाऊ शकतात. मुलांची काळजी करणे सहाजिक आहे, त्यासोबत स्वतः मध्येही अपेक्षित सुधारणा करून या काळजीला योग्य प्रकारे कृतीत उतरविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
पालकत्व हा एक अनुभवसिद्ध प्रवास असतो. त्यात शास्त्र व कला यांचा मिलाफ असतो. पालक आणि मुले यांच्यात दरी निर्माण होण्यास दोन गोष्टी कारणीभूत असतात. एक पालक मुलांशी बोलण्यासाठी वापरतात ती भाषा आणि दुसरी पालकांची देहबोली. मुलांची अभ्यासातील अडचण ही फक्त मुलांची नसून आपली आहे आणि आपण दोघांनी मिळून ती सोडवायची आहे, असा दृष्टिकोन पालकांनी ठेवला पाहिजे. त्यातूनच विद्यार्थ्यांची उमेद वाढण्यासाठी मदत होईल. पालकांनी मुलांच्या यशापयशात वाटेकरी होण्याची मानसिक तयारी ठेवली पाहिजे. मुलांसोबत शिकण्याचा निखळ आनंदही मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलाला समाजून घेताना आपल्यात लपलेले मुलंही ओळखलं पाहिजे.
अनेक पालकांचा असा गैरसमज आहे की मुलांना परीक्षेची भीती वाटते. मात्र, ही भीती निर्माण होण्यामागे पालकांचा दृष्टिकोन कारणीभूत असतो, हे विसरून चालणार नाही. खरे तर पालकांच्या अपेक्षांमुळे मुलांना परीक्षेची नव्हे, तर निकालाची भीती वाटत असते. निकालाचा दिवस हा खरा त्यांच्यासाठी परीक्षेचा दिवस ठरत असतो. परीक्षेच्या दिवशी मुलांना आशिर्वाद देणारे, देवाचा अंगारा लावणारे, प्रसाद देणारे पालक निकालाच्या दिवशी पूर्णपणे बदललेले असतात. परीक्षा आणि निकालांना दिलेले अवास्तव महत्व, त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याने हे प्रकार घडत आहेत. वास्तविक पाहता परीक्षेतून विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीची नव्हे, तर आकलनशक्तीची कल्पना यायला हवी. त्याला नेमके काय समजले, काय समजले नाही, हे लक्षात यावे यासाठीच परीक्षा आहेत. त्यामुळे निकालानंतर राहून गेलेल्या गोष्टी समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मुलांना आदेश देण्यापेक्षा त्यांना विश्वासात घेऊन साधलेला संवाद अधिक उपयुक्त ठरतो. अशा पद्धीतने आपण एकमेकांना अधिक चांगल्या पद्धतीने समजावून घेऊ शकतो. अशा सकस नातेबंधातून मुलांचे व्यक्तीमत्व घडत जाते. मात्र, परीक्षेच्या निकालानंतर आपण त्यांना भूतकाळातील अनेक उदाहरणे देऊन खिंडीत पकडतो. उपदेशांचे डोस पाजतो. त्यातून मूल मानसिकदृष्ट्या खचून जाते. परीक्षेचा धसका घेतलेले विद्यार्थी परीक्षेत पास होतात खरे, मात्र पालक घरच्या परीक्षेत नापास झालेले असतात, असेच म्हणावे लागेल.
मुलांना जाणून घेण्यासाठी, समाजवून घेण्यासाठी त्यांचे ऐकले पाहिजे. त्यांच्या कोणत्या अनुभवाला, विचाराला फालतू म्हणून हेटाळणी करता कामा नये. त्यांचा आनंद कशात आहे ते शोधा. सतत उपदेशाचे डोस देणे कोणाला आवडत नाही. काही गोष्टी कृतीत शिकविता येतात. मुलांमधील क्षमता ओळखून त्यांना त्या दिशेने विकसित करता येऊ शकते. आपल्या इच्छा, आकांशा मुलांसमोर जरूर मांडा मात्र त्याबाबत आग्रही राहू नका. आपली मुले आपली असली तरी त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात. आपली स्वप्ने वेगळी, त्यांची स्वप्न वेगळी असतात. त्यामुळे आपल्या स्वप्नांचे पंख त्यांना लावण्याचे प्रयत्न करता कामा नये. मुले हट्टी आहेत, अशी तक्रार करण्यापेक्षा, त्यावरून त्यांना रागवण्यापेक्षा त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. त्याचे बरेवाईट परिणाम त्यांना सामजावून सांगा. मुले जेव्हा लाडात असतात, तुम्ही खुशीत असता, त्यावेळी त्यांना त्यांच्या चुका समावून सांगण्याची योग्य वेळ असते. पालकांना जे वाटते तेच मुलांनी करावे का? ज्या गोष्टी पालकांना लहानपणी मिळाल्या नाहीत म्हणून त्या मुलांनी करायला पाहिजेत का? पालकांची स्वप्न, पालकांच्या आशा-आकांक्षा मुलांनी पूर्ण कराव्यात, एवढीच अपेक्षा मुलांकडून कशी करता येणार? आपल्या मुलांची दुसऱ्या मुलांशी तुलना करू नका. इतरांसारखे आपल्या मुलानेही व्हावे, अशी अपेक्षा कशासाठी? जगात एवढ्या साऱ्या गोष्टी करण्यासारख्या असताना केवळ काही गोष्टींसाठीच आग्रह कशासाठी? उलट असा विचार आपल्या मुलाची स्वतंत्र वृत्ती, वेगळा विचार करण्याची दृष्टी मारणारा ठरतो. दम दिला, दरडावून बोलले की मुले ऐकतात असा एक काही पालकांचा समज असतो. त्यामुळे मुलांच्या मनाविरूद्धच्या गोष्टी सांगण्यासाठी पालक याचा वापर करतात. मात्र, त्यावेळी मुले जे करतात ते त्यांच्या इच्छेविरूद्ध असते. मुलांना बऱ्या वाईटाची जाणीव करून दिली पाहिजे. मात्र, त्याची पद्धत ही नाही. टीव्हीवर काय पाहावे, काय नको हेही मुलांना सांगितले पाहिजे. त्यासाठी त्यांच्यासोबत टीव्ही पाहून काय व कसे चुकीचे आहे, काय बरोबर आहे, हे सांगता येऊ शकते. केवळ टीव्हीच नव्हे, तर या निमित्ताने आपण त्यांना जगातील बऱ्यावाईट गोष्टींची माहिती अशावेळी देऊ शकतो. त्याच्या विचारप्रक्रियेला योग्य वळण आणि चालना देऊ शकतो.
मुलांना त्यांची बाजू स्वतः होऊन मांडू दिली पाहिजे. पालकांनी त्यांची वकीली करण्यापेक्षा त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून मदत केली पाहिजे. त्यांची जिज्ञासा, त्यांचे कुतूहल जागे होईल असे प्रश्न विचारण्यास मुलांना प्रवृत्त करा. शाळेतील नवनीन गोष्टी शिकण्यासाठी मुलांच्या मनात गोडी निर्माण करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. त्यासाठी शाळा, शिक्षक यांच्याबद्दल त्यांच्या मनात विश्वासाचे वातावरण हवे. शाळेबद्दल राग व्यक्त करणारे कोणतेही विधान मुलांसमोर करता कामा नये. मुलांची जी शिस्त लावायची आहे, त्याची सुरवात आपल्यापासून आणि घरापासून केली पाहिजे. कोरड्या उपदेशांपेक्षा प्रत्यक्ष वातावरण आणि कृतीचा परिणाम अधिक होतो. मुलांना शिक्षा करण्याची वेळ येऊ नये, असे वातावरण हवे. शारीरिक आणि मानसिक शिक्षेचाही मुलांवर खूप मोठा परिणाम होतो. त्यातून मुले कोडगी बननण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी शाळा आणि घर येथून केल्या जाणाऱ्या सुधारणांच्या प्रय़त्नांना प्रतिसाद मिळू शकत नाही.
0
Answer link
पालकत्वाची जबाबदारी (Parental Responsibility) देण्यासाठी आवश्यक असलेले काही महत्त्वाचे निकष खालीलप्रमाणे आहेत:
-
पालकाची क्षमता:पालकांमध्ये मुलांचे योग्य संगोपन करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. यामध्ये मुलांची शारीरिक, मानसिक आणि भावनिक काळजी घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
-
आर्थिक स्थिरता:पालकांकडे मुलांचे पालनपोषण करण्यासाठी पुरेसे आर्थिक साधन असणे आवश्यक आहे.
-
मुलाचे हित:कोर्ट (Court) नेहमी मुलाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देते. त्यामुळे, पालकत्वाची जबाबदारी देताना मुलाचे कल्याण कशात आहे, हे पाहिले जाते.
-
पालकांचे आरोग्य:पालक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे, जेणेकरून ते मुलांची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकतील.
-
गुन्हेगारी पार्श्वभूमी:पालकाला कोणताही गंभीर गुन्हेगारी इतिहास नसावा, ज्यामुळे मुलाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो.
-
मुलाची इच्छा:जर मुल समजूतदार असेल, तर त्याची इच्छा देखील विचारात घेतली जाते की त्याला कोणत्या पालकासोबत राहायचे आहे.
-
पालकांचे संबंध:पालकांचे एकमेकांशी असलेले संबंध मुलाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे, कोर्ट या गोष्टीचाही विचार करते.
हे निकष Lawrato च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत.
Lawrato - Child Custody Laws in India