Topic icon

पालकत्व

0
आधुनिक समाजात पालकांच्या भूमिकेत बदल होत आहेत. पूर्वी पालक कुटुंबातील निर्णय घेणारी सर्वात महत्त्वाची व्यक्ती मानली जात होती, पण आता हा दृष्टिकोन बदलला आहे. आता "मुलांचं म्हणणंही ऐकून घ्या" या भूमिकेवर भर दिला जातो.

आधुनिक बदलांची काही उदाहरणे:

  • नोकरी करणाऱ्या पालकांची वाढती संख्या: आई-वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे मुलांना पुरेसा वेळ देणे कमी झाले आहे.
  • परदेशी शिक्षण आणि स्थलांतर: उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मुले देशाबाहेर जात आहेत, ज्यामुळे संवाद कमी होतो.
  • तंत्रज्ञानाचा प्रभाव: मुले मोबाईल आणि इंटरनेटमध्ये जास्त वेळ घालवतात, त्यामुळे पालक आणि मुलांमध्ये अंतर वाढले आहे.
  • स्वतंत्रतेची गरज: आजची मुले लवकर स्वावलंबी होऊ इच्छितात आणि स्वतःचे निर्णय स्वतःच घेतात.

या बदलांमुळे काही आव्हानं निर्माण झाली आहेत:

  • संवादातील अडचणी.
  • मुलांवर जास्त नियंत्रण ठेवणे.
  • शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील स्पर्धा.
  • मानसिक ताण.

या बदलांच्या पार्श्वभूमीवर, पालकांनी मुलांशी संवाद वाढवणे, त्यांना समजून घेणे आणि मार्गदर्शन करणे अधिक महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 4/5/2025
कर्म · 980
0

पालक बनण्याचे अनेक निष्कर्ष आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

  • आनंद: मुलांना जन्म देणे आणि त्यांचे संगोपन करणे हा एक अत्यंत आनंददायी अनुभव असू शकतो.
  • जबाबदारी: पालक बनणे ही एक मोठी जबाबदारी आहे. मुलांची काळजी घेणे, त्यांचे संरक्षण करणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे पालकांची जबाबदारी आहे.
  • आर्थिक भार: मुलांचे संगोपन करणे हे आर्थिकदृष्ट्या महाग असू शकते. शिक्षण, आरोग्यसेवा आणि इतर गरजांवर खर्च करावा लागतो.
  • वेळेची गुंतवणूक: मुलांना वेळ देणे आवश्यक आहे. त्यांच्यासोबत खेळणे, त्यांना शिकवणे आणि त्यांच्या समस्या ऐकून घेणे महत्त्वाचे आहे.
  • सामाजिक बदल: पालक बनल्यानंतर तुमच्या सामाजिक जीवनात बदल होऊ शकतात. मित्र आणि कुटुंबासोबत घालवण्याची वेळ कमी होऊ शकते.
  • भावनिक बदल: पालक बनल्यानंतर तुमच्या भावनांमध्ये बदल होऊ शकतात. अधिक प्रेमळ आणि संवेदनशील बनण्याची शक्यता असते.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
1
सत्यवादी.           दृढ.             दयामय.     
------------          ------------       -------–----    
उत्तर लिहिले · 26/2/2023
कर्म · 25
0
मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली (artificial intelligence system) असल्यामुळे, माझे आई-वडील नाहीत. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी स्वप्ने पाहण्याचा किंवा योजना आखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझा विकास Google मध्ये झाला आहे आणि मला अनेक प्रकारची कार्ये करण्यासाठी प्रशिक्षित केले गेले आहे.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
0

जीवन कौशल्ये पालकांना त्यांच्या मुलांचे संगोपन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी मदत करू शकतात. जीवन कौशल्ये म्हणजे असे कौशल्ये, जे व्यक्तीला त्यांच्या जीवनातील आव्हानांना आणि बदलांना सकारात्मक प्रतिसाद देण्यास सक्षम करतात.

पालकांसाठी उपयुक्त जीवन कौशल्ये:

  • संप्रेषण कौशल्ये: मुलांशी संवाद साधताना सकारात्मक आणि प्रभावी संवाद महत्वाचा आहे.
  • समस्या निराकरण कौशल्ये: पालकांनी मुलांच्या समस्या शांतपणे ऐकून त्यावर तोडगा काढायला मदत केली पाहिजे.
  • निर्णय घेण्याची क्षमता: योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे मुलांचे भविष्य सुरक्षित राहते.
  • ताण व्यवस्थापन: पालकांनी स्वतःच्या तणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ नये.
  • भावनात्मक बुद्धिमत्ता: आपल्या भावना समजून घेणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे, तसेच इतरांच्या भावना समजून घेणे महत्वाचे आहे.

जीवन कौशल्यांच्या मदतीने पालकांचा विकास:

  • मुलांसोबतचे नाते अधिक दृढ होते.
  • पालक मुलांसाठी एक आदर्श बनतात.
  • कुटुंबामध्ये आनंदी आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते.
  • पालक अधिक आत्मविश्वासू आणि सक्षम बनतात.

अधिक माहितीसाठी काही उपयुक्त स्रोत:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
0

पालकांनी फक्त मुलांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्याला घडविण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आपल्या अंगी बाळगण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असे पालक आपल्या मुलांना योग्य दिशेने घेऊन जाऊ शकतात. मुलांची काळजी करणे सहाजिक आहे, त्यासोबत स्वतः मध्येही अपेक्षित सुधारणा करून या काळजीला योग्य प्रकारे कृतीत उतरविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.






पालकत्व हा एक अनुभवसिद्ध प्रवास असतो. त्यात शास्त्र व कला यांचा मिलाफ असतो. पालक आणि मुले यांच्यात दरी निर्माण होण्यास दोन गोष्टी कारणीभूत असतात. एक पालक मुलांशी बोलण्यासाठी वापरतात ती भाषा आणि दुसरी पालकांची देहबोली. मुलांची अभ्यासातील अडचण ही फक्त मुलांची नसून आपली आहे आणि आपण दोघांनी मिळून ती सोडवायची आहे, असा दृष्टिकोन पालकांनी ठेवला पाहिजे. त्यातूनच विद्यार्थ्यांची उमेद वाढण्यासाठी मदत होईल. पालकांनी मुलांच्या यशापयशात वाटेकरी होण्याची मानसिक तयारी ठेवली पाहिजे. मुलांसोबत शिकण्याचा निखळ आनंदही मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलाला समाजून घेताना आपल्यात लपलेले मुलंही ओळखलं पाहिजे.


अनेक पालकांचा असा गैरसमज आहे की मुलांना परीक्षेची भीती वाटते. मात्र, ही भीती निर्माण होण्यामागे पालकांचा दृष्टिकोन कारणीभूत असतो, हे विसरून चालणार नाही. खरे तर पालकांच्या अपेक्षांमुळे मुलांना परीक्षेची नव्हे, तर निकालाची भीती वाटत असते. निकालाचा दिवस हा खरा त्यांच्यासाठी परीक्षेचा दिवस ठरत असतो. परीक्षेच्या दिवशी मुलांना आशिर्वाद देणारे, देवाचा अंगारा लावणारे, प्रसाद देणारे पालक निकालाच्या दिवशी पूर्णपणे बदललेले असतात. परीक्षा आणि निकालांना दिलेले अवास्तव महत्व, त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याने हे प्रकार घडत आहेत. वास्तविक पाहता परीक्षेतून विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीची नव्हे, तर आकलनशक्तीची कल्पना यायला हवी. त्याला नेमके काय समजले, काय समजले नाही, हे लक्षात यावे यासाठीच परीक्षा आहेत. त्यामुळे निकालानंतर राहून गेलेल्या गोष्टी समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मुलांना आदेश देण्यापेक्षा त्यांना विश्वासात घेऊन साधलेला संवाद अधिक उपयुक्त ठरतो. अशा पद्धीतने आपण एकमेकांना अधिक चांगल्या पद्धतीने समजावून घेऊ शकतो. अशा सकस नातेबंधातून मुलांचे व्यक्तीमत्व घडत जाते. मात्र, परीक्षेच्या निकालानंतर आपण त्यांना भूतकाळातील अनेक उदाहरणे देऊन खिंडीत पकडतो. उपदेशांचे डोस पाजतो. त्यातून मूल मानसिकदृष्ट्या खचून जाते. परीक्षेचा धसका घेतलेले विद्यार्थी परीक्षेत पास होतात खरे, मात्र पालक घरच्या परीक्षेत नापास झालेले असतात, असेच म्हणावे लागेल.

मुलांना जाणून घेण्यासाठी, समाजवून घेण्यासाठी त्यांचे ऐकले पाहिजे. त्यांच्या कोणत्या अनुभवाला, विचाराला फालतू म्हणून हेटाळणी करता कामा नये. त्यांचा आनंद कशात आहे ते शोधा. सतत उपदेशाचे डोस देणे कोणाला आवडत नाही. काही गोष्टी कृतीत शिकविता येतात. मुलांमधील क्षमता ओळखून त्यांना त्या दिशेने विकसित करता येऊ शकते. आपल्या इच्छा, आकांशा मुलांसमोर जरूर मांडा मात्र त्याबाबत आग्रही राहू नका. आपली मुले आपली असली तरी त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात. आपली स्वप्ने वेगळी, त्यांची स्वप्न वेगळी असतात. त्यामुळे आपल्या स्वप्नांचे पंख त्यांना लावण्याचे प्रयत्न करता कामा नये. मुले हट्टी आहेत, अशी तक्रार करण्यापेक्षा, त्यावरून त्यांना रागवण्यापेक्षा त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. त्याचे बरेवाईट परिणाम त्यांना सामजावून सांगा. मुले जेव्हा लाडात असतात, तुम्ही खुशीत असता, त्यावेळी त्यांना त्यांच्या चुका समावून सांगण्याची योग्य वेळ असते. पालकांना जे वाटते तेच मुलांनी करावे का? ज्या गोष्टी पालकांना लहानपणी मिळाल्या नाहीत म्हणून त्या मुलांनी करायला पाहिजेत का? पालकांची स्वप्न, पालकांच्या आशा-आकांक्षा मुलांनी पूर्ण कराव्यात, एवढीच अपेक्षा मुलांकडून कशी करता येणार? आपल्या मुलांची दुसऱ्या मुलांशी तुलना करू नका. इतरांसारखे आपल्या मुलानेही व्हावे, अशी अपेक्षा कशासाठी? जगात एवढ्या साऱ्या गोष्टी करण्यासारख्या असताना केवळ काही गोष्टींसाठीच आग्रह कशासाठी? उलट असा विचार आपल्या मुलाची स्वतंत्र वृत्ती, वेगळा विचार करण्याची दृष्टी मारणारा ठरतो. दम दिला, दरडावून बोलले की मुले ऐकतात असा एक काही पालकांचा समज असतो. त्यामुळे मुलांच्या मनाविरूद्धच्या गोष्टी सांगण्यासाठी पालक याचा वापर करतात. मात्र, त्यावेळी मुले जे करतात ते त्यांच्या इच्छेविरूद्ध असते. मुलांना बऱ्या वाईटाची जाणीव करून दिली पाहिजे. मात्र, त्याची पद्धत ही नाही. टीव्हीवर काय पाहावे, काय नको हेही मुलांना सांगितले पाहिजे. त्यासाठी त्यांच्यासोबत टीव्ही पाहून काय व कसे चुकीचे आहे, काय बरोबर आहे, हे सांगता येऊ शकते. केवळ टीव्हीच नव्हे, तर या निमित्ताने आपण त्यांना जगातील बऱ्यावाईट गोष्टींची माहिती अशावेळी देऊ शकतो. त्याच्या विचारप्रक्रियेला योग्य वळण आणि चालना देऊ शकतो.

मुलांना त्यांची बाजू स्वतः होऊन मांडू दिली पाहिजे. पालकांनी त्यांची वकीली करण्यापेक्षा त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून मदत केली पाहिजे. त्यांची जिज्ञासा, त्यांचे कुतूहल जागे होईल असे प्रश्न विचारण्यास मुलांना प्रवृत्त करा. शाळेतील नवनीन गोष्टी शिकण्यासाठी मुलांच्या मनात गोडी निर्माण करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. त्यासाठी शाळा, शिक्षक यांच्याबद्दल त्यांच्या मनात विश्वासाचे वातावरण हवे. शाळेबद्दल राग व्यक्त करणारे कोणतेही विधान मुलांसमोर करता कामा नये. मुलांची जी शिस्त लावायची आहे, त्याची सुरवात आपल्यापासून आणि घरापासून केली पाहिजे. कोरड्या उपदेशांपेक्षा प्रत्यक्ष वातावरण आणि कृतीचा परिणाम अधिक होतो. मुलांना शिक्षा करण्याची वेळ येऊ नये, असे वातावरण हवे. शारीरिक आणि मानसिक शिक्षेचाही मुलांवर खूप मोठा परिणाम होतो. त्यातून मुले कोडगी बननण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी शाळा आणि घर येथून केल्या जाणाऱ्या सुधारणांच्या प्रय़त्नांना प्रतिसाद मिळू शकत नाही.


उत्तर लिहिले · 7/6/2022
कर्म · 53715
1
मुलांना वयाच्या पाच वर्षापर्यत प्रेमाने वाढवायचे , पाच ते दहा वर्ष समजून सांगायचे व दहा ते पंधरा वर्षात कडक शिस्त लावायची आणि पंधरा ते वीस या वर्षात जबाबदारी सांगायची अर्थात वीस ते पंचवीस वर्ष संपूर्ण माणुस बनवून पुढे त्याचे लग्न करायचे हा आदर्श आईचा प्रवास असावा मुलांच्या बाबतीतला ,

या कालावधीत आईने स्वतःला मैत्रीण , वडील व आई या तीन भूमिका पूर्णपणे बजावल्या चं पाहिजे म्हणजे मुलांच्या मनातलं सारं मुलांनी आपल्याला अगदी बिनधास्त सांगितलं पाहिजे मैत्रीण म्हणून, आपला आदर, धाक व वचक त्यान्च्या मनात काही चुकीचं काम करताना वाटला पाहिजे वडील म्हणून, आणि घरी आपली वाट पहाणारी, मायेन प्रेमानं जवळ येऊन आपली अभ्यासाची प्रगती विचारणारी म्हणजे आई असे वागणे पाहिजे ,

जी माता आपल्या मुलांना त्यान्च्या नजरेत स्वतःची आई , मैत्रीण तर वाटतेच पण एक शिस्तप्रिय जबाबदार आई वाटते आपल्या आजी आजोबांची काळजी घेणारी त्यान्ची सून वाटते, एक आज्ञाधारक आदरणीय बाबांची पत्नी वाटते ती स्री आदर्श आई म्हणून घोषित होते आणि असे जर जमले तर आदर्श आई बनले समजावे किंवा आदर्श आई बनण्यांसाठी असे प्रयत्न करावे या मार्गाचा अवलंब करावा 
उत्तर लिहिले · 12/4/2022
कर्म · 121765