व्याकरण म्हणी सुविचार

नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीची वाक्ये कोणती येतील?

2 उत्तरे
2 answers

नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीची वाक्ये कोणती येतील?

0
'नाचता येईना अंगण वाकडे', ही मराठीमधील एक प्रसिद्ध म्हण आहे.

▪️या म्हणीचा अर्थ असा आहे की, जर आपल्याला एखादे काम किंवा गोष्ट करता येत नसेल, तर अशा वेळी लोकांपासून आपला कमीपणा लपवण्यासाठी आपण त्या कामावर किंवा गोष्टीवर आरोप करतो, पण स्वतःचा कमीपणा स्वीकारायला तयार नसतो.

▪️आपल्यामधील बरेच जण असे असतात ज्यांना असे वाटते की त्यांना सगळे काही येते, पण खरं तर त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल काहीच ज्ञान नसते, पण तरीही असे लोकं स्वतःचा कमीपणा स्वीकारत नाही. अशा लोकांसाठी आपण ही म्हण वापरतो.
उत्तर लिहिले · 5/6/2022
कर्म · 53720
0

नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ असा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या कामातील अक्षमतेमुळे दुसऱ्या गोष्टींना दोष देते.

या म्हणीची काही वाक्ये खालीलप्रमाणे:
  • मोहनला परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर तो म्हणाला, "पेपरच खूप कठीण होता." याला म्हणतात नाचता येईना अंगण वाकडे.
  • एका कार्यक्रमात कविता म्हणाली की तिला गाता येत नाही कारण माईक व्यवस्थित नाही.
  • Builders वेळेत काम पूर्ण करू शकले नाही आणि त्यांनी खापर government च्या माथी फोडले.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

टाळीत कावळा सापडला, यांचा नेमका अर्थ काय?
म्हणीचे योगदान लक्षणीय आहे कारण काय?
मामा वरून म्हण?
घर की मुर्गी दाल बराबर?
छोटा मुंह बड़ी बात?
खालील आप्तसंबंधदर्शक शब्दांवर आधारलेल्या दहा म्हणी लिहा: नवरा, बायको, मामा, बाप, जावई, आई.
खालील आप्तसंबंधदर्शक शब्दांवर आधारलेल्या दहा म्हणी लिहा (उदाहरणार्थ, माय मरो पण मावशी जगो.)?