व्याकरण मुद्रण तंत्रज्ञान

मुदित शोधनाचे महत्व थोडक्यात कसे स्पष्ट कराल?

मराठी गोष्ट लिहिताना आवश्यकतेची गरज म्हणजे लेखनातील मजकूर शुद्धता. लेखनात लेखन शुद्धतेबरोबरच अचूक संपादन करणे तितकेच आवश्यक असते. कोणत्याही मजकुरातील आशयाची शुद्धता आणि ते प्रामाणिक असणे आवश्यक असले तरी व्याकरणाच्या अनिवार्यतेसाठी लेखन निर्दोष असणे आवश्यक असते. त्यामुळे मुद्रितशोधनाची गरज असते. तसेच लेखनाचे सखोल ज्ञान लेखकाला असणे आवश्यक असते. आपण लिहिण्याच्या ओघात अनवधानाने काही शब्द चुकीचे लिहितो आणि शब्दांची पुनरावृत्ती होऊ शकते, यासाठी मुद्रितशोधनाची गरज असते.


1 उत्तर
1 answers

मुदित शोधनाचे महत्व थोडक्यात कसे स्पष्ट कराल?

0
मुद्रिकशोधक हा घटक महत्त्वाचा असतो.

हस्तलिखित मजकुरापेक्षा छपाईतील मजकूर हा वाचकांच्या मनावर चांगला परिणाम करतो. आज वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, पुस्तके, हस्तपुस्तिका, दिवाळी अंक, लहान मोठी पत्रके, संस्थाचे अहवाल, स्मरणिका, शुभेच्छा पत्रे, इत्यादी विविध प्रकारांमध्ये मुद्रित साहित्याचीइत्यादी विविध प्रकारांमध्ये मुद्रित साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यात काळानुसार वाढच होणार आहे. ही वाढ समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील जागृतीचे आणि प्रगतीचे लक्षण मानले जाते.

कोणत्याही प्रकारच्या लेखनाचे अंतिम मुद्रण होण्यापूर्वी मुद्रिते बारकाईने वाचून त्यातील त्रुटी दूर करुन ते लेखन वाचनीय व निर्दोष होणे, यासाठी मुद्रितशोधकाची भूमिका फार महत्त्वाची आहे. मुद्रितशोधक व्यावसायिक दृष्टीने प्रभावी कार्य करु शकतो. स्थानिक ते जागतिक स्तरावर संगणक युगातदेखील वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी त्याचे स्वरूप, मांडणी, त्यातील आशय उत्तमरित्या वाचकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

मुद्रितशोधन ही एक कला असून ते एक शास्त्रही आहे तसेच तो एक व्यवसायसुद्धा आहे. उत्तम मुद्रितशोधक या व्यवसायाला आपल्या अभ्यासातील सातत्याने, अनुभवाने उत्तम दर्जा प्राप्त करून देऊ शकतो.
उत्तर लिहिले · 13/5/2022
कर्म · 53710

Related Questions

माझ्या भावाचा मोबाईल नंबर माझ्या मोबाईलमधून ब्लॉक झाला आहे, तर मी तो अनब्लॉक कसा करू शकतो?
माझ्याकडून माझ्या भावाचा नंबर ब्लॉक झालेला आहे, तर मी तो कसा अनब्लॉक करावा?
जर कोणाचा मोबाईल नंबर ब्लॉक झाला असेल तर अनब्लॉक कसा करावा?
मोबाईल नंबर अनलॉक कसा करावा?
मोबाईल नंबर अनलॉक कसा करायचा?
मोबाईल नंबर अनब्लॉक कसा करावा?
मोबाईलमधील जुने डिलीट केलेले फोटो आणि व्हिडिओ कसे परत मिळवता येतील?