डोळे डोळ्यांची काळजी आरोग्य

दिवसभर लॅपटॉप किंवा कंप्यूटरवर काम करून संध्याकाळी घरी गेल्यावर डोळे दुखायला लागतात, डोळ्यातून पाणी येते, काय करावे?

2 उत्तरे
2 answers

दिवसभर लॅपटॉप किंवा कंप्यूटरवर काम करून संध्याकाळी घरी गेल्यावर डोळे दुखायला लागतात, डोळ्यातून पाणी येते, काय करावे?

1
१. डोळ्यांना मसाज –
दिवसातून किमान २ वेळा डोळ्यांना थंड पाण्याने मसाज करणे उपयुक्त ठरू शकते. कोरफडीचं जेल वापरुन १० मिनटे डोळे मिटून बसावे.

ह्याने सलग स्क्रीन पाहून डोळ्यांवर आलेला ताण कमी होतो.

कोरफड नसल्यास काकडीचे काप डोळ्यावर ठेऊन १० मिनिटे डोळे बंद करून बसावे. डोळ्यांना अराम मिळून पुन्हा डोळे टवटवीत होतील.

२. नियमीत अन ठराविक वेळेनंतर ब्रेक –
दिवसभर आणि सलग काम करण्याने डोळ्यांवर अतिरिक्त ताण येऊन त्रास होऊ शकतो, हे टाळायचे असेल तर किती ही महत्वाचे काम असो, ओण ठराविक वेळे नंतर ब्रेक घेणे आवश्यक आहे.

ह्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.

 




३. पुरेसा प्रकाश आणि योग्य उपकरणांचा वापर –
आपण जिथे लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वर काम करत असू, त्या खोलीत पुरेसा प्रकाश असावा.

आजकाल डोळ्यां प्रमाणे कॉम्पुटर ला पण कव्हर मिळतं तो लावला असता स्क्रीन मधून येणारी किरणे अडतात आणि कमी त्रास होतो.

४. लॅपटॉप किंवा कॉम्पुटर स्क्रीन सेटिंग –
लॅपटॉप किंवा कॉम्पुटर सेटिंग हवी तशी बदलता येते. लेटर चे फॉन्ट मोठे असावे, फार भडक रंगात काही टाईप करून नये अथवा लिहू नये.

ब्राईटनेस हा डोळ्यांवर ताण येईल असा नसावा. बाहेरील प्रकाश पाहून ब्राईटनेस कमी अथवा जास्त करावा. शक्यतो बॅक ग्राउंड कलर हा हिरवा अथवा फिकट निळा असावा.



५. २०-२०-२० नियम –
ह्याचा अर्थ २० मिनिट काम केल्यानंतर २० सेकंदा साठी २० फूट दूर असलेल्या कुठल्याही वस्तू कडे पाहावे. ह्यामुळे डोळयांना त्रास होत नाही.

काम करत असताना ठराविक वेळेनंतर विश्रांती घ्यावी. प्रत्येक २० मिनिट काम करून झाल्यावर हिरव्या रंगाकडे पाहावे ज्याने डोळ्यांना आराम पडतो.

 

६. कॉम्पुटर स्क्रीनला सुद्धा कव्हर बसवून घ्यावे –
 



 

ज्यांना आधीच नंबर चा चष्मा असेल त्यांनी अँटी रिफ्लेक्षण काच वापरावी. रोज डोळ्यातील बुबुळ डोळे मिटून घड्याळाकृती आणि त्या विरुद्ध अशी प्रत्येकी २० वेळा फिरवावी!

ह्या व्यायामाने डोळयांना आराम मिळतो.

 

७. एर्गोनॉमिक्स –
मित्रानो ईंडस्त्री मध्ये काम करत असताना वरील संज्ञेचा अनेक दा वापर केला जातो.

वरील प्रकारात आपल्याला आपण कसे बसावे, कॉम्पुटर डोळ्या पासून किती अंतरावर असावे, खुर्चीचा बाक किती असावा, स्क्रीन कडे पाहताना मानेचा कोन कोटी अंशात असावा,

 आपल्या बसण्यात योग्य तो बदल करा जेणेकरून डोळ्यांना त्रास होणार नाही.

 
उत्तर लिहिले · 10/5/2022
कर्म · 53750
0
दिवसभर लॅपटॉप किंवा कंप्यूटरवर काम करून संध्याकाळी घरी गेल्यावर डोळे दुखणे आणि डोळ्यातून पाणी येणे या समस्येसाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:

1. 20-20-20 नियम:

दर 20 मिनिटांनी, 20 सेकंदांसाठी 20 फूट दूर असलेल्या वस्तूवर लक्ष केंद्रित करा. यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी होतो.

2. स्क्रीन सेटिंग्ज बदला:

  • स्क्रीनची ब्राइटनेस (Brightness) कमी करा.
  • ब्लू लाईट फिल्टर (Blue light filter) वापरा.
  • फॉन्ट साइज (Font size) वाढवा.

3. डोळ्यांची स्वच्छता:

दिवसातून 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने डोळे धुवा.

4. पुरेसा प्रकाश:

काम करताना खोलीत पुरेसा प्रकाश असावा. कमी प्रकाशामुळे डोळ्यांवर ताण येतो.

5. पाण्याचे सेवन:

दिवसभर पुरेसे पाणी प्या. डिहायड्रेशनमुळे (Dehydration) डोळे कोरडे होऊ शकतात.

6. डोळ्यांचे व्यायाम:

डोळ्यांचे साधे व्यायाम करा. जसे की, डोळे घड्याळाच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने फिरवणे.

7. डॉक्टरांचा सल्ला:

जर समस्या गंभीर असेल, तर नेत्ररोग तज्ञांचा सल्ला घ्या.

ते डोळ्यांची तपासणी करून योग्य उपचार देऊ शकतील.

8. मध:

तुम्ही मध आपल्या डोळ्यांवर लावू शकता. मध लावल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5460

Related Questions

Penis जास्त वेळ मजबूत राहण्यासाठी काय केले पाहिजे?
Vajan kse kmi krayche?
लहान मुलाचे केस वाढवण्यासाठी काय करावे?
निर्भरणीकरणाची कारणे स्पष्ट करा?
भारतातील औद्योगिक चिकित्सा करा भाषाची?
योग साधनेसाठी नैसर्गिक औषधी वनस्पतींचे महत्त्व?
योग साधनेसाठी नैसार्गिक ओषधी वनस्पतींचे?