Topic icon

डोळ्यांची काळजी

0

सर्दीमुळे डोळ्यांवर आणि भुवया दुखत असल्यास, खालील उपाय करून आराम मिळू शकतो:

  1. गरम पाण्याचे शेक:
    • स्वच्छ কাপड्याने डोळ्यांवर आणि भुवयांवर गरम पाण्याचा शेक द्या.
    • यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि वेदना कमी होतात.
  2. steam (वाफ घेणे):
    • गरम पाण्याची वाफ घेतल्याने नाक मोकळे होते आणि डोळ्यांवरील तसेच भुवयांवरील दाब कमी होतो.
  3. पुरेशी विश्रांती:
    • शरीराला आराम मिळणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे पुरेशी झोप घ्या.
  4. hydration (पुरेसे पाणी पिणे):
    • दिवसभर भरपूर पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि डोकेदुखी कमी होते.
  5. painkillers (वेദനशामक औषधे):
    • जर वेदना असह्य होत असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक औषधे (Painkillers)घ्या.
  6. डॉक्टरांचा सल्ला:
    • जर आराम मिळत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

इतर उपाय:

  • सूप आणि गरम पेये: गरम सूप आणि हर्बल चहा प्यायल्याने आराम मिळतो.
  • आहार: संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या.

टीप: हा सल्ला केवळ सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 3/3/2025
कर्म · 1220
0

डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी खालील पदार्थ खावेत:

  • गाजर: गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन असते, जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी खूप महत्वाचे आहे.
  • पालक: पालकमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन भरपूर प्रमाणात असतात, जे डोळ्यांना हानिकारक किरणांपासून वाचवतात.
  • बदाम: बदामामध्ये व्हिटॅमिन ई असते, जे डोळ्यांना फ्री रॅडिकल्सपासून वाचवते.
  • संत्री: संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे डोळ्यांतील रक्तवाहिन्या मजबूत करते.
  • मासे: माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
  • अंडी: अंड्यांमध्ये ल्युटीन, झेक्सॅन्थिन आणि व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांसाठी खूप चांगले असते.

या पदार्थांव्यतिरिक्त, नियमितपणे डोळ्यांची तपासणी करणे देखील महत्त्वाचे आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 2/3/2025
कर्म · 1220
2
डोळ्यांमध्ये जळजळ होत असेल आणि सतत पाणी येत असेल तर, यासाठी पाण्यात मीठ मिसळा आणि या पाण्यात कपडा भिजवून डोळ्यांवर ठेवा. जेव्हा कधी डोळ्यांना पाणी येण्याची समस्या येत असेल, तेव्हा त्यावेळी डोळे थंड पाण्याने धुवा. यामुळे डोळ्यातील घाणही निघून जाईल. कधीकधी या घाणीमुळे डोळ्यांमध्ये जळजळ देखील होते.
डोळ्यांना थंडावा देण्यासाठी बटाटा खूप फायदेशीर आहे. यासाठी बटाट्याचे पातळ काप करून डोळ्यांवर ठेवा आणि अर्ध्या तासानंतर काढा. डोळ्याचे पाणी थांबवण्यासाठी काकडीचे घरगुती उपाय करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी काकडीचे काप डोळ्यांवर ठेवा आणि काही वेळाने काढा.
उत्तर लिहिले · 26/6/2023
कर्म · 53710
2
मोतीबिंदू वर घरगुती उपचार 
मुळात हा आजार होऊच नये ह्यासाठी आपली जीवनशैली चांगली ठेवणे आणि नियमित डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. शिवाय आपल्या डोळ्यांची अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे.

परंतु तरीही वयोपरत्वे हा आजार उद्भवलाच तर तो भराभर वाढू नये म्हणजेच मोतीबिंदू लवकर पिकू नये ह्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.

ह्या उपायांबी मोतिबिंदूची तीव्रता कमी होतो. त्याची वाढ हळूहळू होते. दृष्टी टिकून राहण्यास मदत होते.

आज आपण हे घरगुती उपाय कोणते ते पाहूया

१. बडीशेप आणि धने समप्रमाणात घेऊन त्यात पिठीसाखर मिसळून ठेवाली. हे मिश्रण दररोज सकाळ संध्याकाळ १० ग्राम सेवन करावे.
सकाळ संध्याकाळ १० ग्राम संपन फसल

ह्याचा मोतीबिंदू लवकर न पिकण्यासाठी खूप फायदा होतो.



१. ६ बदाम आणि ७ काळी मिरीचे दाणे कुढून त्यात पाणी घालून ते गाळून घ्यावे. त्या पाण्यात पिठीसाखर मिसळून ते प्यावे. मोतिबिंदुवर गुणकारी आहे.

3. १० ग्राम गुळवेलीच्या रसात १ चमचा सैंधव आणि एक चमचा मध घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट काजळाप्रमाणे डोळ्यात घालावी.
त्रिफळ्याची पाणी घालून घट्ट पेस्ट करून ती डोळ्यावर ठेवून मग त्यावर पट्टी बांधून ठेलाली. नंतर डोळे धुवून टाकावेत. खूप उपयोग होतो.



५. १० मिलि कांद्याचा रस. १० मिलि मध आणि १ ग्राम भीमसेनी कापूर एकत्र मिसळून ते मिश्रण सकाळ संध्याकाळ डोळ्यांना लावावे.

६. गाजर पालक आणि आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन करावे.

७. एक चमचा धने बारीक कुटून एक कप पाण्यात उकळून घ्यावे. हे पाणी गाळून घेऊन सकाळ संध्याकाळ डोळ्यात घालावे.

८. नियमितपणे गाईचे दूध प्यावे. तसेच आहारात मेथी, भेंडी, पालक, केळी, द्राक्षे, सफरचंद, संत्रे, डाळिंब ह्यांचे नियमित सेवन करावे. फार आंबट व तिखट पदार्थ खाऊ नयेत.

११. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा. त्याचा देखील डोळ्यांवर थेट परिणाम होतो.

११. सतत कम्प्युटरवर काम करणे आवश्यक असेल तर दर अर्ध्या तासाने ५ मिनिटे ब्रेक घ्याला. तसेच डोळ्यांचे व्यायाम नियमित करावेत.

हे आहेत मोतीबिंदू वाढू न देण्याचे घरगुती उपाय. ते जरूर करून पहा. हयाबरोबरच आपल्या डोळ्यांची नियमित तपासणी डॉक्टरांकडून करत राहणे देखील आवश्यक •आहे. ती देखील करत रहा. आपल्या डोळ्यांची काळजी घ्या.
उत्तर लिहिले · 11/1/2023
कर्म · 53710
0


सतत लॅपटॉपवर काम करताना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी


बापरे! डोळे किती लाल झालेत... डोळ्यांची भयंकर आग होतेय!.. कुठे बघवतही नाही, एवढे डोळे चुरचुरतायत!.. ही अशी वाक्य रोज तुमच्या तोंडी असतात का? डोळ्यांना एवढा त्रास होत असताना काम करण्यासाठी रोज लॅपटॉप समोर बसावचं लागतं का? जर तुमचं उत्तर हो असेल तर डोळ्यांच्या बाबत निष्काळजीपणा महागात पडू शकतो.





 सतत लॅपटॉपवर काम करत असताना डोळ्याची आपण विशेष काळजी घ्यायला हवी. त्यासाठी काय करायचं, हे जाणून घेऊया आजच्या लेखात.
१. प्रकाशाची व्यवस्था कशी असावी?
आपण ज्या ठिकाणी लॅपटॉपवर काम करायला बसतो त्या ठिकाणी योग्य प्रकाश असणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्या आजूबाजूला अधीक तीव्र प्रकाश असेल किंवा अगदीच काळोख असेल तर त्यामुळे लॅपटॉपवर काम करताना आपल्या डोळ्यावर जास्त ताण येऊ शकतो. त्यामुळे आपण जिथे बसत आहोत तिथे योग्य प्रमाणात प्रकाश असणं महत्त्वाचं आहे. आपल्या लॅपटॉपचा ब्राइटनेस अगदीच जास्त किंवा अगदीच कमी असता कामा नये नाहीतर त्यानेही डोळ्यावर ताण येऊ शकतो.
२. डोळ्यांचा मसाज –
सतत लॅपटॉपवर काम करत असू तर दिवसातून साधारण दोन वेळातरी आपण डोळ्यांचा मसाज करायला हवा. मसाज करण्यासाठी हातावर ॲलोव्हेरा जेल घेऊन अनामिकेने (करंगळीच्या बाजूचं बोट) डोळे बंद करून डोळ्यांच्या बुबुळांच्या ठिकाणी उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे असा घड्याळाकृती पद्धतीत मसाज करा. त्याने सतत लॅपटॉपकडे बघून आपले ताठरलेले डोळे जड वाटणार नाहीत. डोळ्यांना सूज येणार नाही. रोज दहा मिनिटे हा मसाज करावा.
३. स्क्रीनची वॉलपेपर सेटिंग अशी करा –
स्क्रीनवर आपण आपल्या आवडीनुसार वॉलपेपर लावतो पण तज्ञ सांगतात की, स्क्रीनवर कधीही हिरवा, नीला, पिवळा असे डोळ्याला टोचणाऱ्या रंगाचे वॉलपेपर लावू नये. वॉलपेपर फिकट रंगाचा असावा. सोबतच स्क्रीनवरची अक्षरं ही सामान्य फॉन्टमध्ये असावीत. अक्षरांचा आकार ही अधीक मोठा किंवा अधीक छोटा नसावा.
४. २० – २० - २० चा फॉर्म्युला –
हा फॉर्म्युला अगदी सोप्पा आहे. आपण २० मिनिटे लॅपटॉपवर काम केल्यानंतर आपल्यापासून २० फुट दूर असलेल्या कोणत्याही गोष्टीकडे २० सेकंदासाठी पहायचं याने डोळ्यांना स्क्रीनचा त्रास होत नाही.
५. अंतर किती असावं –
लॅपटॉपवर सतत काम करत असताना आपल्यात आणि लॅपटॉपमध्ये तीन फुटाचं अंतर ठेवा. जर ते शक्य नसेल तर दूसरा किबोर्ड घ्या आणि तो लॅपटॉपला जोडा म्हणजे लॅपटॉप योग्य अंतरावर ठेवून आपल्याला काम करता येईल आणि डोळ्यांना त्रासही होणार नाही.
६. चांगल्या डोळ्यांसाठी हे करायला हवं -
लॅपटॉपवर काम करता करता अनेकांना काही खाण्याची सवय असते. आपण एका हाताने खातो आणि तोच हात कसा तरी पुसुन पुन्हा किबोर्डला लावतो. त्यामुळे किबोर्डवर जंतु निर्माण होतात. किबोर्डला लावलेला तोच हात आपण डोळ्याला लावला त्यामुळे डोळ्याला खाज येणं, डोळ्यातून पाणी येणं. डोळ्यांच्या कडांना फोड येणं सुरू होतं त्यामुळे लॅपटॉप वापरताना डोळ्याला हात लावणं टाळा. डोळ्यांना हात लावण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवा. लॅपटॉप वेळोवेळी मऊसूत कापडाने स्वच्छ करा.
७. डोळ्यांचा ओलावा कायम ठेवण्यासाठी –
सतत लॅपटॉपवर काम केल्यामुळे आपल्या डोळ्यांना कोरडेपणा येतो आणि डोळ्यांची आग होते त्यासाठीच लॅपटॉपवर काम करताना दर एक दोन तासाने आपल्या डोळ्यांवर पाणी मारणं हे डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं शिवाय डोळ्यांचा ओलावा टिकून राहतो डोळे चुरचुरत नाहीत किंवा डोळा येणं किंवा रांजनवाडी येत नाही.
८. लॅपटॉपची सेटिंग -
लॅपटॉपच्या स्क्रीनपासून आपल्या डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवर ॲटी रिफ्लेक्शन काच लावून घेऊ शकतो. विशेष करून ज्या लोकांना चष्मा असतो त्या लोकांसाठी हा चांगला पर्याय आहे कारण स्क्रीनचा प्रकाश चष्म्यावर परावर्तित होत नाही.
९. व्यायाम महत्त्वाचा –
जेव्हा आपलं लॅपटॉपवरचं काम होईल तेव्हा एक अर्धातास शांत बसा. डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या. दोन्ही तळहात एकमेकांवर घासून डोळ्यावर ठेवा. डोळे वर–खाली, डावीकडे-उजवीकडे फिरवा. गोलाकार फिरवा. आपल्या नाकाच्या टोकाला तीनचार सेकंद पाहणं असे रोज डोळेचे व्यायाम करा.
१०. चष्मा असेल तर लावा –
अनेक लोक लॅपटॉपवर काम करताना चष्मा असूनही तो लावत नाही पण त्याने आपल्या डोळ्याचा नंबर वाढण्याची शक्यता जास्त असते. चष्म्यामुळे आपल्या डोळ्यांच्या बुबुळांना सुरक्षित ठेवता येतं आणि डोळ्यावर ताण येऊन डोळे आणि डोकं दुखत नाही.
तर या आहेत काही गोष्टी ज्या काटेकोरपणे पाळून आपण डोळ्याची चांगली निगा राखू शकतो आणि लॅपटॉपवर उत्तमरीत्या कामही करू शकतो. 
उत्तर लिहिले · 23/12/2022
कर्म · 53710
1
१. डोळ्यांना मसाज –
दिवसातून किमान २ वेळा डोळ्यांना थंड पाण्याने मसाज करणे उपयुक्त ठरू शकते. कोरफडीचं जेल वापरुन १० मिनटे डोळे मिटून बसावे.

ह्याने सलग स्क्रीन पाहून डोळ्यांवर आलेला ताण कमी होतो.

कोरफड नसल्यास काकडीचे काप डोळ्यावर ठेऊन १० मिनिटे डोळे बंद करून बसावे. डोळ्यांना अराम मिळून पुन्हा डोळे टवटवीत होतील.

२. नियमीत अन ठराविक वेळेनंतर ब्रेक –
दिवसभर आणि सलग काम करण्याने डोळ्यांवर अतिरिक्त ताण येऊन त्रास होऊ शकतो, हे टाळायचे असेल तर किती ही महत्वाचे काम असो, ओण ठराविक वेळे नंतर ब्रेक घेणे आवश्यक आहे.

ह्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.

 




३. पुरेसा प्रकाश आणि योग्य उपकरणांचा वापर –
आपण जिथे लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वर काम करत असू, त्या खोलीत पुरेसा प्रकाश असावा.

आजकाल डोळ्यां प्रमाणे कॉम्पुटर ला पण कव्हर मिळतं तो लावला असता स्क्रीन मधून येणारी किरणे अडतात आणि कमी त्रास होतो.

४. लॅपटॉप किंवा कॉम्पुटर स्क्रीन सेटिंग –
लॅपटॉप किंवा कॉम्पुटर सेटिंग हवी तशी बदलता येते. लेटर चे फॉन्ट मोठे असावे, फार भडक रंगात काही टाईप करून नये अथवा लिहू नये.

ब्राईटनेस हा डोळ्यांवर ताण येईल असा नसावा. बाहेरील प्रकाश पाहून ब्राईटनेस कमी अथवा जास्त करावा. शक्यतो बॅक ग्राउंड कलर हा हिरवा अथवा फिकट निळा असावा.



५. २०-२०-२० नियम –
ह्याचा अर्थ २० मिनिट काम केल्यानंतर २० सेकंदा साठी २० फूट दूर असलेल्या कुठल्याही वस्तू कडे पाहावे. ह्यामुळे डोळयांना त्रास होत नाही.

काम करत असताना ठराविक वेळेनंतर विश्रांती घ्यावी. प्रत्येक २० मिनिट काम करून झाल्यावर हिरव्या रंगाकडे पाहावे ज्याने डोळ्यांना आराम पडतो.

 

६. कॉम्पुटर स्क्रीनला सुद्धा कव्हर बसवून घ्यावे –
 



 

ज्यांना आधीच नंबर चा चष्मा असेल त्यांनी अँटी रिफ्लेक्षण काच वापरावी. रोज डोळ्यातील बुबुळ डोळे मिटून घड्याळाकृती आणि त्या विरुद्ध अशी प्रत्येकी २० वेळा फिरवावी!

ह्या व्यायामाने डोळयांना आराम मिळतो.

 

७. एर्गोनॉमिक्स –
मित्रानो ईंडस्त्री मध्ये काम करत असताना वरील संज्ञेचा अनेक दा वापर केला जातो.

वरील प्रकारात आपल्याला आपण कसे बसावे, कॉम्पुटर डोळ्या पासून किती अंतरावर असावे, खुर्चीचा बाक किती असावा, स्क्रीन कडे पाहताना मानेचा कोन कोटी अंशात असावा,

 आपल्या बसण्यात योग्य तो बदल करा जेणेकरून डोळ्यांना त्रास होणार नाही.

 
उत्तर लिहिले · 10/5/2022
कर्म · 53710
0
मला माफ करा, मी वैद्यकीय सल्ला देण्यासाठी योग्य नाही. तुमच्या डोळ्यांतील बुबुळाच्या कडेला पांढरा थर जमा झाला असेल, तर तो कमी करण्यासाठी काही घरगुती किंवा आयुर्वेदिक उपाय खालील प्रमाणे:
  1. त्रिफळा चूर्ण: त्रिफळा चूर्ण रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्या पाण्याने डोळे धुवा. त्रिफळा चूर्ण डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.
  2. गुलाब जल: शुद्ध गुलाब जल नियमितपणे डोळ्यात टाकल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो आणि पांढरा थर कमी होण्यास मदत होते.
  3. मध: मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. मध नियमित डोळ्यात घातल्याने आराम मिळतो.
हे उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1220