राज्यशास्त्र भारतीय संविधान

भारतीय संघराज्य पद्धती म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

भारतीय संघराज्य पद्धती म्हणजे काय?

0
:

 


.

 संघराज्य पद्धती :

 



भारताच्या संघराज्य पद्धतींचा स्वीकार हा कॅनडाच्या घटनेतून करण्यात आला आहे. देशात वेगवेगळी घटकराज्ये व त्यांचे एक संयुक्तिक राष्ट्र ही संकल्पना कॅनडाच्या घटनेतून स्वीकारण्यात आली आहे.

५ )सुप्रीम कोर्ट :

हे भारतातील न्यायदान व्यवस्थेचं तसेच घटनात्मक संचलनाचं महत्वपूर्ण केंद्र आहे. भारतीय लोकशाहीचा पाया आहे.

 



भारतीय सुप्रीम कोर्ट व त्याचा रचनेची प्रेरणा ही अमेरिकन कोर्टाच्या व न्यायव्यस्थेच्या रचनेतुन अंगिकरण्यात आली आहे.

६) पंचवार्षिक योजना :

 



भारतात आधी अस्तित्वात असलेली पंचवार्षिक योजना व नियोजन आयोग जे भारताचे पंचवार्षिक धोरण ठरवायचे, आता त्याची जागा नीती आयोगाने घेतली असून १ वर्षाचे धोरण नीती आयोग ठरवत असते.पण त्या पंचवार्षिक योजनेचा स्वीकार भारताने रशियन राज्यघटनेतून केला होता.

७) निवडणूक प्रक्रिया :

 



संसदीय निवडणूक ही भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. जनप्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया हाती घेतली जात असते. भारतीय निवडणूक प्रक्रियेचा स्वीकार आणि प्रेरणा ही ब्रिटिश राज्यघटनेतून करण्यात आला आहे.

८) सुप्रीम कोर्टाच्या नियमनासाठी तत्वे :

 



सुप्रीम कोर्टाकडे अमर्याद अधिकार नसतात. ती जरी एक मोठी व्यवस्था असली तरी तिच्या संचलनाचे, अधिकारांचे नियमन केलेले असते, काही कायदे व तरतुदी असतात ज्यांचा आधारावर सुप्रीम कोर्टाचे संचलन होते.

भारतीय राज्यघटनेत सुप्रीम कोर्टाच्या नियमनासाठी जी तत्वे घालुन देण्यात आली आहेत त्यांचा स्वीकार जपानच्या घटनेचा अभ्यास करून करण्यात आला आहे.

९) आणीबाणी :

 



जेव्हा देशात आणीबाणी लागू करण्यात येते त्याप्रसंगी कोणत्या मुलभूत अधिकारांवर गदा आणायची, कोणत्या अधिकारांना कायम करायचे, त्याची पद्धत काय असेल, यासाठीच्या तरतुदी ज्या संविधानात केल्या गेल्या आहेत. त्यांची प्रेरणा ही जर्मन राज्यघटनेतून घेण्यात आली आहे.

१०) लोकसभा अध्यक्ष :

 


 अध्यक्ष हे लोकसभेतील महत्वपूर्ण पद आहे. लोकसभेच्या संचलनाची जबाबदारी ही लोकसभा अध्यक्षांवर असते. लोकसभा अध्यक्ष ह्या पदाची निर्मिती ब्रिटिश संसदेच्या प्रेरणेतून करण्यात आली आहे.

११) समावर्ती सूची : 

 



भारतीय राज्यघटनेचा महत्वपूर्ण भाग असलेल्या समावर्ती सूचीच्या निर्मितीची प्रेरणा ही ऑस्ट्रेलियन राज्यघटनेतून घेण्यात आली आहे.

१२) मुलभूत अधिकार :

 



संविधानात समाविष्ट असलेले मुलभूत अधिकार हे भारतीय नागरिकाच्या मूलभूत स्वातंत्र्यासाठी अत्यावश्यक आहेत. ह्या मूलभूत अधिकारांची प्रेरणा देखील अमेरिकन राज्यघटनेतून घेण्यात आली आहे.

१३) लिखित स्वरूपातील संविधानाची प्रेरणा :

 




 

लिखित संविधान हे भारताचे वैशिष्ट्य आहे. भारताचे संविधान हे लिखित स्वरूपात असून त्याची एकदम साचेबद्ध मांडणी करण्यात आली आहे. ह्या लिखित स्वरूपातील संविधानाची प्रेरणा ब्रिटीश संविधानातून घेण्यात आली आहे.

अश्याप्रकारे भारतीय राज्यघटनेतील अनेक मूलभूत मूल्यांचा व लोकशाही रचनेतील मूलभूत अंगांचा स्वीकार हा परकिय राज्यघटनेच्या अभ्यासातून करण्यात आला आहे. परंतू असं असून देखील भारतीय राज्यघटना ही तिचं वेगळं वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप जपून आहे.

===



उत्तर लिहिले · 4/5/2022
कर्म · 53720
0

भारतीय संघराज्य पद्धती म्हणजे एक शासनप्रणाली आहे ज्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात अधिकार विभागलेले असतात.

संघराज्य पद्धतीची काही वैशिष्ट्ये:
  • अधिकार विभागणी: केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अधिकार वाटलेले असतात. राज्य सरकारला स्वतःचे कायदे बनवण्याचा अधिकार असतो.
  • लिखित संविधान: भारताचे संविधान लिखित आहे आणि ते देशातील सर्वोच्च कायदा आहे.
  • स्वतंत्र न्यायपालिका: न्यायपालिका स्वतंत्रपणे काम करते आणि कायद्यांचे उल्लंघन झाल्यास हस्तक्षेप करू शकते.
  • द्विसदनीय विधानमंडळ: संसदेत दोन सभागृह असतात - लोकसभा आणि राज्यसभा.

भारतीय संघराज्य पद्धती ही कॅनडा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या इतर संघराज्य पद्धतींपेक्षा वेगळी आहे.

अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

भारतीय राज्यघटनेच्या भाग १ वर निबंध लिहा?
भारतीय घटनेची उगमस्थाने स्पष्ट करा?
सतत टीव्हीसमोर बसून जेवण केल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम कोणते? योगासनाचे फायदे व मर्यादा कसे स्पष्ट कराल? भारतीय घटनेतील मूलभूत तत्त्वे कोणती?
भारतीय कायदे मंडळ कार्यकारी मंडळ यापासून स्वतंत्र ठेवण्यात आले आहे का?
भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे यावर तुमचे मत कसे स्पष्ट कराल?
भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये कोणती आहे?
भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांविषयी मत कसे स्पष्ट कराल?